30 जुलै 2021-July 30

 30 जुलै 2021-July 30

जर्मन उद्योगपती जॉर्ज विल्हेम फॉन सिमेन्स यांचा जन्म. 30 जुलै 1855

अल्पपरिचय

जॉर्ज विल्हेम फॅान सिमेन्स हे जर्मन उद्योगपती व सिमेन्स या जगप्रसिध्द कंपनीचे प्रमुख होते. जर्मन टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील प्रमुख उद्योगपती म्हणून त्यांना पाहिले जाते. जॉर्ज विल्हेम फॉन सिमेन्स यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक प्रसिध्द अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड यांचा जन्म. 30 जुलै 1863

अल्पपरिचय

हेन्री फोर्ड हे जगप्रसिध्द अमेरिकन मोटर कंपनी फोर्ड मोटर्स चे संस्थापक अध्यक्ष होते, टी-मॉडेल या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या फोर्ड कंपनीच्या गाड्यांमुळे ऑटोमोबाईल्स क्षेत्र अमेरिकेला व पर्यायाने जगाला खुले झाले. हेन्री फोर्ड यांनी अनेक नवनवीन कल्पना फोर्ड कंपनीत राबवून फोर्ड कंपनीला यशाच्या शिखरावर पोचविलेफोर्ड यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

शास्त्रीय,नाट्यसंगीत व पार्श्व गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन. 30 जुलै 1983

ल्पपरिचय

डॉ. वसंतराव देशपांडे हे प्रसिध्द हिंदुस्तानी शास्त्रीय गायक,नाट्याभिनेते,पार्श्चगायक होतेसंगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातील त्यांची खानसाहेबांची भूमिका विशेष गाजली. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

प्रसिध्द साहित्यिक शंकर पाटील यांचे निधन. 30 जुलै 1994

अल्पपरिचय

ंकर पाटील हे प्रसिध्द मराठी कथाकार,कादंबरीकार व चित्रपट कथालेखक होते.

जन्म

08 ऑगस्ट 1926 पट्टण कोडोली, हातकणंगले,कोल्हापूर संस्थान, ब्रिटीश भारत सध्या पट्टणकोडोली, महाराष्ट्र, भारत

ृत्यू

30 जुलै 1994

शिक्षण

बी.. बी. टी. तारदाळ ता. हातकणंगणले तसेच कोल्हापूर येथे

कार्य

रयत शिक्षण संस्थेच्या शाळांतून अध्यापनाचे कार्य

आकाशवाणीच्या पुणे केद्रावर कार्य

बालभारती या महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात मराठी भाषेसाठी विशेष अधिकारी म्हणून कार्य तसेच 1972 मध्ये इतर सहा भाषांसाठी विद्यासचिव म्हणून नियुक्ती

भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव

प्रसिध्द साहित्य

  • वळीव-कथासंग्रह
  • भेटीगाठी-कथासंग्रह
  • आभाळ-कथासंग्रह
  • धिंड-कथासंग्रह
  • ऊन-कथासंग्रह
  • वावरी शेंग-कथासंग्रह
  • खुळ्याची चावडी-कथासंग्रह
  • पाहुणा-कथासंग्रह
  • फक्कड गोष्टी-कथासंग्रह
  • ारफुला-कादंबरी
  • सरपंच-कादंबरी
  • घुंगरू-कादंबरी
  • बेईमान-कादंबरी
  • सुन माझी सावित्री-कादंबरी
  • प्रसिध्द चित्रपट कथा
  • पिंजरा
  • एक गाव बारा भानगडी
  • असला नवरा नको गं बाई
  • वावटळ

पुरस्कार व सन्मान

महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार

नांदेड येथील 1985 च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

आजचे पुरस्कार

गानसम्राज्ञी प्रसिध्द पार्श्वगायिका लता मंगेशकर  यांना  राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार  जाहीर. 30 जुलै 1997

राजस्थानच्या अलवारचे राजेंद्रसिंह यांना पाणी संवर्धनाच्या कार्याबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. 30 जुलै 2001

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://vishwakosh.marathi.gov.in/

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020