02 मे 2021- May 02- जागतिक हास्यदिन विशेष

 

02 मे 2021- May 02- जागतिक हास्यदिन विशेष

जागतिक हास्य दिन.02 मे 2021

    दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो, यावर्षी तो आज म्हणजेच 02 मे 2021 रोजी साजरा केला जातो आहे. जागतिक हास्यदिन हा मानवी जीवनातील हास्याचे महत्व व त्यामुळे होणारे अनेक आरोग्यविषयक फायदे या मूळ उद्देशाने साजरा करण्यात येतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस हसणे विसरला आहे. हसण्यामुळे ताणतणाव नाहीसे होतात हीच जाणीव सर्वांना व्हावी म्हणूनच जागतिक पातळीवर हास्यदिनाची संकल्पना मांडण्यात आली. मानसिक ताणतणावाचे उत्तम पध्दतीने निराकरण करणारे अस्त्र म्हणजे हास्य होय. विविध हास्य क्लब, संस्था यांव्दारे हा दिवस उत्स्फुर्तपणे साजरा केला जातो व हास्यदिनाविषयी  जनजागृती केली जाते. भारतात पहिला हास्यदिन 10 मे 1998 रोजी  वर्ल्डवाइड लाफ्टर योगा चळवळीचे प्रणेते डॉ. मदन कटारिया यांनी साजरा केला. त्यानंतर तो जागतिक पातळीवर साजरा करण्यात येऊ लागला.

प्रसिध्द गायक, नाट्यभिनेते  डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म. 02 मे 1920

अल्पपरिचय

डॉ. वसंतराव देशपांडे हे प्रसिध्द हिंदुस्तानी शास्त्रीय गायक, नाट्यभिनेते होते. कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातील खानसाहेबांची भूमिका विशेष गाजली.

जन्म

02 मे 1920 मूर्तीजापूर, अकोला, ब्रिटीश भारत

मृत्यू

30 जुलै 1983 पुणे, महाराष्ट्र, भारत

शिक्षण

डॉ. वसंतरावांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण असदअली खाँ, सरेशबाबू माने, अमानतअली खाँ, रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे  घेतले.

कार्य

सुरूवातीला संरक्षणविभागात त्यांनी नोकरी करत संगीतसेवा केली.

संगीतसेवा करण्यासाठी नंतर त्यांनी नोकरी सोडली व पूर्णपणे संगीताला वाहून घेतले.

ठुमरी,दादरा,  गझल अशा तीनही गायनप्रकारात त्यांनी अत्यंत सहजतेने सादर केले. हर्मोनियम, तबला या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते.

प्रसिध्द नाटके- अभिनय

  • कट्यार काळजात घुसली
  • वीज म्हणाली धरतीला
  • हे बंध रेशमांचे
  • मेघमल्हार
  • तुकाराम
  • वाऱ्यावरची वरात
  • कालिया मर्दन-चित्रपट-अभिनय
  • अष्टविनायक-चित्रपट-अभिनय
  • दूधभात-चित्रपट-अभिनय

प्रसिध्द चित्रपट-पार्श्वगायन

  • पेडगावचे शहाणे
  • अवघाची संसार
  • गुळाचा गणपती
  • दूधभात अशा 80 हून अधिक चित्रपटांत देशपांडे यांनी पार्श्वगायन केले.

पुरस्कार

संगीत नाटक अकादमी पुरस्कार-1982

मराठी समीक्षक, विचारवंत दिनकर केशव बेडेकर यांचे निधन. 02 मे 1973

अल्पपरिचय

दिनकर केशव बेडेकर हे प्रसिध्द मराठी समीक्षक,विचारवंत होते.

जन्म

08 जून 1910 सातारा, ब्रिटीश भारत

मृत्यू

02 मे 1973 मुंबई, महाराष्ट्र, भारत

शिक्षण

हिंदू विश्वविद्यालय बनारस येथून तत्वज्ञान व अर्थशास्त्र विषयात पदवी

कार्य

मुळशी सत्याग्रहात सहभाग

कम्युनिस्ट पक्षाच्या बो‍ल्शेव्हिक गटात प्रवेश व कम्युनिस्ट पक्षाचे कार्य

गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या अर्थविज्ञान त्रैमासिकाचे संपादन

नाशिक येथे काहीकाळ ते प्राध्यापकही होते.

मराठी विश्वकोश कार्यालयात विभाग संपादक म्हणून त्यांनी 1962 ते 1964 असे कार्य केले.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठात तत्वज्ञानाचे अध्यापन 1969 ते 1973

साहित्य

  • निर्मिती व समीक्षा
  • साहित्यविचार
  • केशवसुतांची काव्यदृष्टी
  • आधुनिक मराठी काव्य: उदय, विकास आणि भवितव्य
  • समाजचिंतन
  • विचारयात्रा
  • हेगेल जीवन आणि तत्वज्ञान
  • अस्तित्ववादाची ओळख
  • संयुक्त महाराष्ट्र
  • सुमित्रानंदन पंत
  • अणूयुगातील मानवधर्म
  • टूवर्ड्स अंडरस्टँडिंग गांधी
  • धर्मचिंतन
  • धर्मश्रध्दा: एक पुर्नविचार

प्रसिध्द मराठी चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांचे निधन. 02 मे 1975

अल्पपरिचय

शांताराम आठवले हे प्रसिध्द मराठी चित्रपट दिग्दर्शक,कवी व गीतलेखक होते. वहिनीच्या बांगड्या, भाग्यरेखा, पडदा असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. शांताराम आठवले यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

अमेरिकन सैन्याकडून कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा. 02 मे 2011

अमेरिकेच्या 09-11 अर्थात 11 सप्टेंबर च्या दहशतवादी हल्ल्याला कारणीभूत असणारा अल-कायदा दहशतवादी संघटनेचा प्रमुख दहशतवादी ओसामा बिन लादेन यांची अमेरिकन सैन्याच्या नेव्ही सिल्स -6 या विशेष तुकडीने पाकिस्तानमधील अबोटाबाद येथील निवासस्थानी घुसून त्याला ठार केले, नंतर लादेनचा मृतदेह समुद्रात दफन केला. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींवर विमाने धडकवून प्रचंड मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला ज्यामुळे प्रचंड जीवितहानी व वित्तहानी झाली हा हल्ला करणाऱ्या अल कायदा संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला पकडण्यासाठी अमेरिकेने अल-कायदाचे मुख्य केंद्र असणाऱ्या अफगाणीस्तावर हल्ला करून तेथे युध्द सुरू केले या युध्दाच्या दहा वर्षानंतर अमेरिकेस लादेनचा सुगावा लागला व अखेरिस पाकिस्तातील अबोटाबाद येथे लपून बसलेल्या लादेनचा विशेष सैन्यकारवाई करून खात्मा केला व इतक्या वर्षाच्या शोधमोहिमेला तिलांजली दिली.

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://vishwakosh.marathi.gov.in/

https://www.marathisrushti.com/

https://www.wikipedia.org/

https://www.dnaindia.com/

Image by Christian Dorn from Pixabay 


संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020