07 एप्रिल 2021-07 April- जागतिक आरोग्य दिन विशेष
07 एप्रिल 2021-07
April- जागतिक आरोग्य दिन विशेष
जागतिक आरोग्य दिन 07 एप्रिल 2021
आज जागतिक आरोग्य दिन आहे. दरवर्षी सात एप्रिलला साजरा केला जाणारा जागतिक
आरोग्य दिन निरोगी आरोग्यासाठी जनजागृती, आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी यासाठी साजरा
केला जातो. दिवसेंदिवस होणारे विविध आजार,प्रदूषण,जागतिक तापमानवाढ,महामारी अशांमुळे
मानवी आरोग्य संकटात सापडले आहे. सन 2020 मध्ये आलेल्या कोवीड-19 या महासाथीने तर यात
भरच पडली आहे, त्यामुळेच आजचा जागतिक आरोग्य दिन साजरा करताना आपल्या व इतरांच्याही
आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने व आरोग्य
यंत्रणांनी घातलेल्या विविध निर्बंधांचे पालन करण्याची नितांत आवश्यकता आहे. आजच्या
जागतिक आरोग्य दिनाची मूळ संकल्पना संयुक्त राष्ट्रांनी 1948 साली स्थापन केलेल्या
जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेत आहे. आजच्याच दिवशी विश्वस्वाथ्य व आरोग्याचे संवर्धन
करण्यासाठी या संघटनेची संयुक्त राष्ट्रांनी
स्थापना केली. जगातील अनेक देशात आरोग्याच्या समस्यांमुळे निर्माण होणाऱ्या
साथी, त्यामुळे होणारे मृत्यू यांवर जागतिक स्तरावर उपाय शोधून त्यावर आमंलबाजावणी
करण्याचे महत्वाचे कार्य या संघटनेकडून केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नांचा
भाग म्हणूनच आज अनेक देशांतून पोलिओ सारखे आजार नामशेष झाले आहेत. कोवीड-19 ही महासाथ
ही लवकरच संपुष्टात येईल अशी आशा करूयात त्यासाठी वेळोवेळी मास्कचा वापर,सामाजिक अंतराचा
नियम व वेळोवेळी हातांचे सॅनिटायझेशन या शासनाने व जागतिक आरोग्य संघटनेने आवाहन केलेल्या
त्रिसुत्रीचे पालन करूया.
इंग्लीश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचा जन्म. 07 एप्रिल 1770
अल्पपरिचय
विल्यम वर्डस्वर्थ हे प्रसिध्द इंग्लीश कवी होते. डॅफोडिल्स या कवितेने
त्यांना लोकप्रियता मिळाली.
जन्म
07 एप्रिल 1770 कॉकरमाउथ,कम्बरलॅंड, युनायटेड किंग्डम
मृत्यू
23 एप्रिल 1850 रायडल, वेस्टमोरलँड,युनायटेड किंग्डम
शिक्षण
सेंट जॉन्स कॉलेज,केंब्रीज, युनायटेड किंग्डम
कार्य
प्रसिध्द इंग्लीश कवी
राणी व्हिक्टोरिया व्दारा पोएट लॅव्यूरेट ऑफ युनायटेड किंग्डम कार्यकाळ
06 एप्रिल 1843 ते 23 एप्रिल 1850
साहित्य
- लिरिकल बलाड्स व काही इतर कविता-1798
- लिरिकल बलाड्स व इतर कविता-1800
- पोएम्स,इन टू व्हॉल्युम्स-1807 यातीलच आय वंडर्ड लोनली ॲज ए क्लाउड म्हणजेच डॅफोडिल्स ही कविता प्रचंड गाजली.
- फ्रेंच रिव्हॉल्यशन-1810
- गाइड टू दि लेक्स-1810
- दि एक्सकर्शन-1814
- दि बॉर्डरर्स-एकमेव नाटक
प्रसिध्द भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे निधन. 07 एप्रिल 1935
अल्पपरिचय
डॉ. शंकर आबाजी भिसे हे प्रसिध्द भारतीय शास्त्रज्ञ होते. भारताचे एडिसन
म्हणून त्यांना संबोधले जाते.
जन्म
29 एप्रिल 1867 मुंबई, ब्रिटीश भारत
मृत्यू
07 एप्रिल 1935 न्यूयॉर्क, अमेरिका
कार्य
प्रसिध्द भारतीय शास्त्रज्ञ त्यांनी लावलेल्या दोनशेपेक्षा अधिक मानवोपयोगी
शोधांमुळे त्यांना भारताचे एडिसन म्हणून ओळखले जाते. यातील चाळीस शोधांच पेटंटही त्यांनी
आपल्या नावावर घेतले.
टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेटचे संस्थापक
अमेरिकन भिसे आयडीएल टाइप कास्टर कॉर्पोरेशनचे संस्थापक
आग्रा लेदर फॅक्टरीचे संस्थापक
डॉ. भिसे यांनी घडविलेले विविध अविष्कार
- रेल्वेचे स्वयंचलित दरवाजे-1898
- इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड या मासिकाने घेतलेल्या स्पर्धेसाठी बनविलेले स्वयंचलित वस्तूंचे वजन करणारे यंत्र
- रेल्वे मध्ये व स्थानकावर अगामी स्थानकदर्शक फलक अर्थात इंडिकेटर
- भिसोटाइप हे मुद्रण यंत्र हे मिनिटाला 1200 अक्षरे छापत असे तर याचीच नवीन अवृत्ती म्हणजेच आयडीएल टाइप कास्टर हे 2400 अक्षरे छापणारे मुद्रण यंत्रणही त्यांनी शोधले.
- पगड्या तयार करण्याचे यंत्र, सायकल जागच्या जागी उभे करणारे स्वयंचलित यंत्र,तारेने दूरवर फोटो पाठविण्याची कल्पना
- सदऱ्याची घडी न मोडता बटणे लावू शकणारे छोटे टिंगी नामक यंत्र
- सौर ऊर्जेवर चालणारी मोटार
- समुद्राच्या तळाशी प्रकाश देणारा दिवा
- वातावरणातील अनेक वायू वेगळे करणारे यंत्र
- जखमांवर लावण्याचे बेसलीन तर पोटात घेण्यासाठीचे ॲटोमिडीन ही औषधे
- बॉडी मसाजरचाही शोध त्यांनी लावला जे डोकेदुखीवर परिणामकारक होते.
सन्मान
इंडियन इंडस्ट्रियल काँग्रेसचे अध्यक्षपद -1900
अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ
न्यूयॉर्क विद्यापीठाकडून डी.एस्सी ही सन्माननीय पदवी
माउंट व्हेरनॉनच्या चेंबर ऑफ कॉमर्स व्दारे मानद सदस्यत्व
अमेरिकन वृत्तपत्रांकडून भारताचे एडिसन असा गौरव 1908 पासून
पोस्टाचे तिकिट नाववर निघणारे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन बुकर टी. वॉशिंग्टन हे ठरले.
07 एप्रिल 1940
आजच्याच दिवशी 07 एप्रिल 1940 रोजी अमेरिकेच्या पोस्टल विभागाने बुकर
टी. वॉशिंग्टन यांच्या नावाने पोस्टल तिकिट जारी केले ज्यामुळे पोस्टल तिकिट नावाने
निघणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्णवर्णिय अमेरिकन नागरिक ठरले.
फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचे निधन. 07 एपिल 1947
अल्पपरिचय
हेन्री फोर्ड हे जगप्रसिध्द फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष होते.
त्यांनी आणलेल्या अनेक मोटारगाड्यांमुळे मोटर युगाचा प्रारंभ झाला.
जन्म
30 जुलै 1863 स्प्रिंगवेल्स टाउनशीप, मिशिगन, अमेरिका
मृत्यू
07 एप्रिल 1947 फेअर लेन,डीयरबॉर्न, मिशिगन, अमेरिका
शिक्षण
ब्रायंट अँड स्ट्रॅटॉन कॉलेज, डेट्रॉईट बिझनेस इन्स्टिट्यूट
कार्य
जगप्रसिध्द फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष कार्यकाळ-1906 ते
1919 व 1943 ते 1945
हेन्री फोर्ड यांनी प्रचंड उत्पादन व किफायतशीर किमतींचा मेळ घालून सामान्य
माणसाला परवडणाऱ्या दरात मोटारींचे उत्पादन व विक्रीचे शास्त्र मांडले व ते आमलांत
आणून फोर्ड मोटर कंपनीला शिखरावर नेले. आपल्या मॉडेल ए व मॉडेल टी प्रकारच्या मोटारींमुळे
त्यांनी वाहन उद्योगात क्रांती आणली व मोटार युगाचा पाया घातला.
हेन्री फोर्ड हे वेल्फेअर कॅपॅटिलिझमचे प्रणेते मानले जातात म्हणजे ज्यात
कामगारांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना मोकळिक देऊन त्यांच्यावरचा कामाचा भार कमी
करून त्यांच्या उत्पादकक्षमतेत वाढ केली जाते. त्यानुसार फोर्ड यांनी आपल्या कंपनीत
पाच दिवसांचा आठवडा व कमीत कमी पाच डॉलर मजुरी हे व असे कामगार हिताचे अनेक निर्णय घेतले.
पहिल्या महायुध्दादरम्यान फोर्ड यांनी फोर्ड एअरप्लेन कंपनीची स्थापना
केली ज्यातून त्यांनी फोर्ड 4एटी ट्रायमोटर
तसेच अनेक प्रकारची विमानांची उत्पादन
व विक्री केली यातील अनेक विमानांचा अमेरिकेच्या सैन्यदलानेही वापर केला परंतू
1929 च्या जागतिक मंदीमुळे या विमानांची मागणी घटली व त्यामुळे तोटा होऊन ही कंपनी
बंद करावी लागली.
पुस्तके
माय लाइफ अँड वर्क
टुडे अँड टुमारो
माय फिलॉसॉफी ऑफ इंडस्ट्री
संदर्भ व आभार
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.