27 जुलै 2021-July 27
27 जुलै 2021-July 27
संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म. 27 जुलै
1911
अल्पपरिचय
प्रसिध्द भारतीय संख्याशास्त्रज्ञ,आहारतज्ञ असणाऱ्या डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांची
आज जयंती. स्टॅटिस्टिकल थिअरी ऑफ सँपलिंग यामध्ये त्यांनी केलेल्या
कामाची विशेष दखल घेतली जाते. भारतीय कृषीसंशोधन व भारताच्या
हरीतक्रांतीसंदर्भात त्यांनी केलेले सांख्यिकीय कार्य नावाजले गेले.
जन्म
27 जुलै 1911 सध्या बुध,ता.खाटाव,जि.सातारा,महराष्ट्र, भारत आधीचे सातारा
संस्थान,ब्रिटीश भारत
मृत्यू
28 जानेवारी 1997 पुणे,महाराष्ट्र, भारत
शिक्षण
बीएस्सी-गणित फर्ग्युसन महाविद्यालय,
पुणे
पीएचडी-लंडन विद्यापीठ,लंडन,इंग्लंड प्रबंधाचा विषय: बायपार्टिशनल
फंक्शन्स
कार्य
प्रसिध्द संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ
बनारस हिंदू विद्यापीठात सांख्यिकी विभागाचे प्रमुख व प्राध्यापक
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हायजीन,कलकत्ता येथे प्राध्यापक
महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स येथे जीवसांख्यिकी विभागाचे प्रमुख
ग्रामीण नियोजन विभाग,पुणे विद्यापीठचे
प्रमुख
भारतीय कृषीसंशोधन परिषदेत सांख्यिकी सल्लागार म्हणून कार्य
इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन, संख्याशास्त्रीय अध्ययन
संस्था, इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, नॅशनल
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (इंडिया), इंडियन
कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च आणि मराठी विज्ञान परिषद या संस्थांवर ते विविध पदांवर
कार्यरत होते.
सुखात्मे यांनी इंडियन सोसायटी फॉर ॲग्रीकल्चरल स्टॅटिस्टिक्स
या संस्थेची स्थापना केली.
अन्न व शेती महामंडळ सांख्यिकी विभाग-संयुक्त राष्ट्रांच्या रोम येथील कार्यालयातही त्यांनी कार्य केले तसेच आयोवा
स्टेट युनिर्व्हसिटी व कॅलिफोर्निया युनिर्व्हसिटी येथेही त्यांनी प्राध्यापक म्हणून
कार्य केले.
पुस्तके
- दि बायपार्टिशन फंक्शन
- थिअरी ऑन मॅनेजमेंट ऑफ अंडरन्यूट्रीशन
- सँपलिंग थिअरी ऑफ सर्व्हेज विथ ॲप्लीकेशन
- थर्ड वर्ल्ड सर्व्हे
- फीडिंग इंडियाज ग्रोईंग मिलियन्स
- दि फूड अँड न्यूट्रिशन सिच्युएशन इन इंडिया
- न्यूअर कन्सेप्ट्स इन न्यूट्रिशन अँड देअर इंप्लीकेशन फॉर पॉलिसी
पुरस्कार
पद्मभूषण पुरस्कार
प्रसिध्द ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ॲलन बॉर्डर यांचा जन्म. 27 जुलै 1955
अल्पपरिचय
ॲलन बॉर्डर हे प्रसिध्द ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व ऑस्ट्रेलियाचे
विश्वचषक विजेते कर्णधार आहेत.
जन्म
27 जुलै 1955 क्रेमोमे, सिडनी,न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया
कार्य
ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट-1978 ते
1994
ॲलन बॉर्डर यांनी ऑस्ट्रेलियाचे 1978 ते 1994 पर्यंत कसोटी व एकदिवसीय प्रकारांत प्रतिनिधित्व केले ते ऑस्ट्रेलियाचे कर्णधारही
होते. 1987 साली त्यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने विश्चचषक
जिंकला.
क्रिकेट कारर्किर्द
ॲलन बॉर्डर यांनी ऑस्ट्रेलियाचे 156 कसोटीत तर 273 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केले त्यामध्ये
कसोटीत 50.56 च्या कारर्किदीतील सर्वोत्तम सरासरीने त्यांनी
11174 धावांचे योगदान दिले ज्यामध्ये 27 शतके व
63 अर्धशतकासहीत दोन व्दिशतकांचा समावेश होता. 205 ही त्यांची सर्वोच्च वैयक्तीक धावसंख्या होती. एकदिवसीय
सामन्यात 30.63 च्या सरासरीने खेळताना त्यांनी 39 अर्धशतके व तीन शतकांसहीत 6524 धावांचे योगदान दिले ज्यामध्ये
त्यांची वैयक्तीक सर्वोच्च धावसंख्या 127 होती.
भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी व्दिपक्षीय
मालिकेस ॲलन बॉर्डर यांचे नाव देण्यात आले असून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असे त्याचे नामकरण केले जाते. ऑस्ट्रेलियातील
सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूस ॲलन बॉर्डर मेडलने गौरविण्यात येते.
स्पर्धात्मक क्रिकेटव्यतरिक्त बॉर्डर हे क्रिकेट निवडकर्ते
म्हणून सक्रीय राहिले.
प्रसिध्द पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांचे
निधन. 27 जुलै 1987
अल्पपरिचय
डॉ. सलीम अली हे जागतिक दर्जाचे पक्षिनिरिक्षक
व पक्षीतज्ञ होते. अनेक दुर्मिळ पक्षांचे शोध,पक्षीनिरिक्षण,पक्षीविज्ञान यांसाठी त्यांनी दिलेले योगदान
आतुलनीय आहे. डॉ. सलीम अली यांच्याविषयी
अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या.
माजी राष्ट्रपती,प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ.
ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे निधन. 27 जुलै 2015
अल्पपरिचय
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून 25 जुलै 2002 रोजी शपथग्रहण केली ते 2007 पर्यंत या पदावर कार्यरत होते राष्ट्रपतीपदी विराजमान होण्यापूर्वी ते एक प्रसिध्द भारतीय शास्त्रज्ञ होते तसेच विविध संस्थावर पदाधिकारी म्हणून
कार्यरत होते. कलाम यांच्या मार्गदर्शनात भारताने केलेल्या स्वदेशी
क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामुळे त्यांना मिसाइल मॅन म्हणून त्यांना जगभर ओळख मिळाली.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.