भारतीय दिनविशेष-bhartiya dinvishesh-15-10-2020
भारतीय दिनविशेष-bhartiya
dinvishesh-15-10-2020
भारतीय दिनविशेष-bhartiya dinvishesh-थोर संत साईबाबा यांनी समाधी घेतली
15 ऑक्टोबर 1918
अल्पपरिचय
जेथे सगळे दरवाजे बंद होतात तेथे साईंचा दरवाजा कायम उघडा असतो असे म्हणतात, साईबाबा एक महान संत होते. भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणाऱ्या साईबाबांनी लोकांना कायम मानवतेची, समानतेची व भूतदयेची शिकवण दिली. साईबाबांनी लोकांना श्रद्धा व सबुरी हा मंत्र दिला. ते नेहमी म्हणायचे सबका मालिक एक म्हणजेच तुम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवा व संयम राखा ईश्वर तुम्हांला नक्कीच मदत करेल. सबका मालिक एक म्हणजे त्यांच्या ठायी कोणताही धार्मिक अथवा जातीय अभिनिवेश नव्हता, सर्वांचा ईश्वर एकच आहे. सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत असेच त्यांचे सांगणे असायचे. दीनदुबळे,गरीब, अडीअडचणीतील लोक बाबांकडे गाऱ्हाणे मांडायचे व बाबा ही कोणताही अडपडदा न ठेवता त्यांना मदत करायचे. भारतात तसेच भारताबाहेरही साईबाबांचा भक्तसंप्रदाय खूप मोठा आहे. सदैव रामजी भला करे व अल्लाह मालिक म्हणणारे बाबा आजच्याच दिवशी 1918 साली सर्वांना सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले, पण श्रद्धा व सबुरी हा मंत्र लोकांना देऊन गेले या मंत्रावर विश्चास ठेऊन जो अचरण करेल त्याची साईबाबा नक्कीच मदत करतात असा अनेकांचा अनुभव आहे.
साईबाबा 1838 साली शिर्डी या गावी प्रकट झाले.
15-ऑक्टोबर 1918 दसऱ्याच्या दिवशी साईबाबांनी देह ठेवला.
कार्य
- लोकांना मानवता,सद्भावना,एकात्मता, सहिष्णुता या मूल्यांची ओळख नव्याने साईबाबांनी आपल्या आचरणातून व कृतीतून करून दिली.
- साईबाबांनी लोकांना श्रद्धा व सबुरी हा जीवनमंत्र दिला.
- आपल्या किर्तनातून-प्रवचनातून त्यांनी समाज सुधारणेचे महान कार्य केले.
पुस्तके
- दासगणू महारांजकृत साईबाबांचे चरित्र
- आध्यात्मिक गुरु साईबाबा (अनुवादित केलेले पुस्तक मूळ लेखिका सोनवी देसाई; मराठी अनुवाद - गिरीश जोशी यांनी केलेला आहे.)
- तू माझी माऊली (विजय हरी वाडेकर)
- देव जो भूवरी चालिला (अनुवादित)
- शिरडीचे श्री साईबाबा (गणेश ल. केळकर)
- शिर्डीचे श्री साईबाबा यांचे चरित्र (पु.ल. जक्का)
- शिर्डीचे साईबाबा (म.श्री. दीक्षित)
- श्री साईबाबा (जनार्दन ओक)
- साईबाबांची भावपूर्ण भक्तिगीते : साईकृपा (शशिकला साळगांवकर)
- श्री साईबाबांची जीवनकथा (चकोर आजगावकर)
- साईबाबांचे सांगाती (म.श्री. दीक्षित)
- साईबाबांच्या कथा (अनंत पै)
शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीनंतर मोठे मंदिर बांधले असून साईबाबा संस्थान शिर्डी या नावाने ते ओळखले जाते.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, (शिर्डी)
पीओ: शिर्डी ता. राहाता जि. अहमदनगर राज्य - महाराष्ट्र भारत पिन: 423109
शिर्डी येथे तुम्ही रस्ता,रेल्वे,विमानसेवा या तिन्ही मार्गांनी पोहचू शकता. अधिक माहितीसाठी संस्थानची वेबसाईट https://sai.org.in/
वर भेट द्या.
भारतीय दिनविशेष-bhartiya
dinvishesh-भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931
अबुल पाकीर जैनलबदिन अब्दुल कलाम तथा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भारताचे 11 वे राष्ट्रपती व वैज्ञानिक होते. एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक असणारे कलाम सर मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जातात. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस हा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो.
15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर तामीळनाडू
मृत्यू
27 जुलै 2015 शिलाँग
- शालेय शिक्षण-श्वार्ट्झ (Schwartz)
हायस्कूल, रामनाथपुरम.
- महाविद्यालयीन शिक्षण- सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथून विज्ञान शाखेतील पदवी तसेच चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगमध्ये 1960 साली पदवी घेतली.
कार्य
- भारताचे 11 वे राष्ट्रपती-2002 ते 2007-या पदावर विराजमान असलेले भारतरत्न पुरस्कारप्राप्त तिसरे
- डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये सिनीयर सायंटिस्ट,तसेच संचालक
- हॉवक्राफ्टचे प्रोटोटाईप तयार केले.
- बंगलोर मध्ये अवकाश कार्यक्रमात सहभाग व फायबर रिइनफोस्ड प्लस्टिक प्रकल्पात सहभाग
- तिरूअनंतपुरम येथील विक्रम सराभाई स्पेस सेंटर मध्ये सॅटेलाईट लाँच व्हेइकल प्रकल्पाचे प्रमुख
- विक्रम सराभाई व सतिश धवन या शास्त्रज्ञांबरोबर अनेक प्रकल्पात सहभाग
- सॅटेलाईट लाँच व्हेइकल च्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
- थुंबा येथे सॅटेलाईट लाँच व्हेइकल 3 या प्रकल्पाचे प्रमुंख व रोहिणी या प्रक्षेपित केलेल्या कृत्रीम उपग्रहाचे मार्गदर्शक
- त्रिशूल, पृथ्वी, आकाश, नाग या क्षेपणास्त्रांची निर्मिती
- डिआरडिओ चे प्रमुख म्हणून अर्जुन रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट च्या निर्मितीत सहभाग
पुस्तकाचे नाव-अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
पुस्तकाचे नाव-इग्नायटेड माइंड्स-अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया या मूळ इंग्रजी पुस्तकाचा ’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर यांनी केला आहे.
पुस्तकाचे नाव-'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' (हे इंग्रजी पुस्तक ज्याचे सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन आहेत त्याचा भारत २०२० - नव्या सहस्रकाचा भविष्यवेध असा मराठी अनुवाद लेखक अभय सदावर्ते यांनी केला आहे.
पुस्तकाचे नाव-इंडिया - माय-ड्रीम
पुस्तकाचे नाव-उन्नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)
पुस्तकाचे नाव-एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन :फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
पुस्तकाचे नाव-विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.
पुस्तकाचे नाव-सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
पुस्तकाचे नाव-टर्निंग पॉइंट्स याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे यांनी केलेला आहे.
पुस्तकाचे नाव-टार्गेट ३ मिलियन (सहलेखक - सृजनपालसिंग)
पुस्तकाचे नाव-ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्सपिरिअन्सेस विथ प्रमुख स्वामीजी असे असून सहलेखक - अरुण तिवारी आहेत.
पुस्तकाचे नाव- दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी,मराठी अनुवाद कमलेश वालावलकर यांनी केलेला आहे.)
पुस्तकाचे नाव-परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक - व्ही. पोतराज, मराठी अनुवाद - अशोक पाध्ये)
पुस्तकाचे नाव-ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).
पुस्तकाचे नाव-बियॉंण्ड २०१० : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन)
पुस्तकाचे नाव-महानतेच्या दिशेने : एकत्र येऊ या बदल घडवू या
पुस्तकाचे नाव-स्क्वेअरिंग द सर्कल सेव्हन स्टेप्स टू इंडियन रेनेसान्स ( सहलेखक – अरुण तिवारी. मराठी अनुवाद : – भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा. अनुवादक : संजय माळी, बुकगंगा पब्लिकेशन्स
पुरस्कार
- पद्मभूषण 1981
- पद्मविभूषण 1990
- भारतरत्न 1997
- इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार 1997
- वीर सावरकर पुरस्कार 1998
- रामानुजन पुरस्कार 2000
- किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक 2007
- ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी 2007
- सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी 2008
- अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक 2009
- वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी 2010
- न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व 2011
- 2015 च्या सप्टेंबर मध्ये ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
भारतीय दिनविशेष-bhartiya dinvishesh-जेआरडी टाटा यांनी नागरी विमान वाहतुकीची सुरवात केली.-15 ऑक्टोबर 1932
नागरी विमान वाहतुक सेवा
जेआरडी टाटा यांच्या टाटा एअरलाईन्सला 1932 साली हवाईमार्गाने टपाल वाहतुकीचे कंत्राट ब्रिटीश इंडिया गव्हर्नमेंटने दिले, त्यानंतर 15 ऑक्टोबर 1932 रोजी टाटांनी कराची ते मुंबई असे पहिले विमान आणले व नागरी हवाई वाहतुकीची सुरवात केली. स्वातंत्र्यानंतर टाटा एअरलाईन्स ही सरकारी कंपनी बनविली गेली व तिचे नाव एअर इंडिया असे ठेवले गेले, एअर इंडियाला त्यानंतर अंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली व एअर इंडियाचा प्रवास सुरू झाला. एअर इंडियाने मग 8 जून 1948 ला पहिले मुंबई ते लंडन हे विमानोड्डाण केले. व अंतरराष्ट्रीय विमानसेवेची मुर्हुर्तमेढ रोवली.
एअर इंडियाच्या सेवा
- अंतराष्ट्रीय पातळीवर-39 देशात
- राष्ट्रीय पातळीवर-12 शहरात
प्रमुंख विमाने
- एअरबस ए३१९-१००
- एअरबस ए३२०-२००
- एअरबस ए३२०नीयो
- एअरबस ए३२१-२००
- एअरबस ए३५०-९००
- बोइंग ७४७-४००
- बोइंग ७७७-२००एलआर
- बोइंग ७७७-३००-ईआर
- बोइंग ७८७ ड्रीमलायनर
भारतीय दिनविशेष-bhartiya dinvishesh हिंदी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी उर्फ निराला यांचे निधन.-15 ऑक्टोबर 1961
अल्पपरिचय
सूर्यकांत
त्रिपाठी उर्फ निराला हे प्रसिध्द हिंदी साहित्यिक होते. त्यांचे सरोजस्मृती हे शोकगीत प्रसिध्द आहे.
21
फेब्रुवारी 1896
मृत्यू
15
ऑक्टोबर 1961
हिंदीमध्ये
त्यांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे.
काव्यसंग्रह
- अनामिका
(1923)
- परिमल
(1930)
- गीतिका
(1936)
- अनामिका (द्वितीय) (1939)[8] (इसी संग्रह में सरोज स्मृति और राम की शक्तिपूजा जैसी प्रसिद्ध कविताओं का संकलन है।
- तुलसीदास
(1939)[8]
- कुकुरमुत्ता
(1942)
- अणिमा
(1943)
- बेला
(1946)
- नये
पत्ते (1946)
- अर्चना(1950)
- आराधना
91953)
- गीत
कुंज (1954)
- सांध्य काकली
- अपरा
(संचयन)
कादंबरी
- अप्सरा (1931)
- अलका
(1933)
- प्रभावती
(1936)
- निरुपमा
(1936)
- कुल्ली
भाट (1938-39)
- बिल्लेसुर
बकरिहा (1942)
- चोटी
की पकड़ (1946)
- काले
कारनामे (1950) {अपूर्ण}
- चमेली
(अपूर्ण)
- इन्दुलेखा
(अपूर्ण)
- कहानी
संग्रह
- लिली
(1934)
- सखी
(1935)
- सुकुल
की बीवी (1941)
- निबन्ध-आलोचना
- रवीन्द्र
कविता कानन (1929)
- प्रबंध
पद्म (1934)
- प्रबंध
प्रतिमा (1940)
- चाबुक
(1942)
- चयन
(1957)
- संग्रह
(1963)[9]
- पुराण
कथा
- महाभारत
(1939)
- रामायण
की अन्तर्कथाएँ (1956)
बालोपयोगी
साहित्य
- भक्त
ध्रुव (1926)
- भक्त
प्रहलाद (1926)
- भीष्म
(1926)
- महाराणा
प्रताप (1927)
- सीखभरी
कहानियाँ (ईसप की नीतिकथाएँ)
[1969]
- अनुवाद
- रामचरितमानस
(विनय-भाग)-1948 (खड़ीबोली हिन्दी में पद्यानुवाद)
- आनंद
मठ (बाङ्ला से गद्यानुवाद)
- विष वृक्ष
- कृष्णकांत का वसीयतनामा
- कपालकुंडला
- दुर्गेश नन्दिनी
- राज सिंह
- राजरानी
- देवी चौधरानी
- युगलांगुलीय
- चन्द्रशेखर
- रजनी
- श्रीरामकृष्णवचनामृत
(तीन खण्डों में)
- परिव्राजक
- भारत में विवेकानंद
- राजयोग
(अंशानुवाद)
भारतीय दिनविशेष-bhartiya dinvishesh- आजचे पुरस्कार-15 ऑक्टोबर 2020
15 ऑक्टोबर 1993-नोबेल शांतता पुरस्कार- नेल्सन मंडेला व द. अफ्रिकेचे माजी अध्यक्ष एफ.डब्लू डी क्लर्क यांना वर्णभेदाविरूध्द उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल
15ऑक्टोबर 1997-बुकर पुरस्कार-अरूंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीसाठी
संदर्भ व आभार-भारतीय दिनविशेष-bhartiya dinvishesh-15 ऑक्टोबर 2020
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.