दिनविशेष दिनांक-12 November 2020-Dinvishesh Date-12 नाेव्हेंबर 2020
दिनविशेष दिनांक-12 November 2020-Dinvishesh
Date-12
नाेव्हेंबर 2020
12 नोव्हेंबर 1817 बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचा जन्म.
मिर्झा हुसेन अल नुरी उर्फ बहाउल्ला हे बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला ही एक उपाधी आहे,या शब्दाचा अर्थ बहा म्हणजे प्रकाश,तेज,ऐश्चर्य
असा आहे तसेच बहाउल्ला म्हणजे ईश्वरी तेज असलेला असा आहे. बहाउल्ला यांनी आपण ईश्वरी
अविष्कार आहोत असे सुरवातीला 1863 मध्ये बगदाद-इराक येथे आपल्या अनुयायांसमोर व 1867 मध्ये जाहीररित्या जाहीर करून ब्रिटन,फ्रान्स,इराण,रशिया इ. राष्ट्रांच्या
प्रमुखांना पत्रे लिहून पाठिंबा देण्याची विनंती केली. बहाउल्ला यांची रवानगी अक्का
येथे करण्यात आली व ते तेथेच शेवटपर्यंत राहिले.
जन्म
12 नोव्हेंबर 1817 इराण
29 मे 1892 अक्का पॅलेस्टाइन
- बहाई पंथाचे संस्थापक-ईश्वरी अवतार
- बहाउल्लांनी सर्व मानवजातीचे ऐक्य, विश्र्वशांती, परस्परांवरील प्रेम इ. तत्त्वांचा प्रसार केला.
- कर्मकांड, पुरोहित इत्यादींना स्थान नाही
- सर्व धर्मांचे सार एकच आहे
- विश्वनिर्माता ईश्वर अज्ञेय आहे
- सर्व ईश्वरी दूत एकच आहेत
- ईश्वरी दूत सर्व काळात अवतरतात त्यामुळे कोणीही शेवटचा प्रेषित नाही
- बहाउल्ला यांचा मानवजातीला संकुचितपणापासून व्यापकतेकडे व कलहापासून सहकार्याकडे नेण्याचा प्रयत्न होता.
पवित्र ग्रंथ- अल किताब अल अक-दस
इतर ग्रंथ
- किताब-इ-ईकान (द बुक ऑफ सर्टिट्यूड)
- कलामत-ए-माक्नून (हिड्न वर्डस)
भारतात सुमारे 20 लाख बहाई पंथीय लोक रहात असून बहाई पंथाच्या सात मंदिरापैकी एक असलेले दिल्लीच्या नेहरू प्लेस येथील बहाई उपासना मंदिर अथवा कमल मंदिर हे एक प्रमुख स्थान आहे. येथे ना कोणती मूर्ती आहे, ना कोणी पुजारी तरीही येथे विविध धर्माचे धार्मिक ग्रंथाचे पठण होते. व सुमारे आठ ते दहा हजार पर्यटक प्रतिदिवस या मंदिरास भेट देतात, त्यांना बहाई पंथाची माहिती व ग्रंथ भेट दिले जातात.
12 नोव्हेंबर 1896 जागतिक किर्तीचे पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्म.
डॉ. सलीम अली उर्फ सलीम मोइनुद्दीन
अब्दुल अली हे जागतिक किर्तीचे भारतीय पक्षीतज्ञ, पक्ष्यीविज्ञान तसेच पक्ष्यांचे शोध
यासांठी प्रसिध्द आहेत. दुर्मिळ पक्ष्यांचे शोध, पक्षीनिरिक्षणाला मिळवून दिलेली प्रतिष्ठा
तसेच विविध पुस्तके,लेख यांतून पक्षीनिरिक्षणासाठी केलेले कार्य वादातीत आहे.
जन्म
12 नोव्हेंबर 1896 मुंबई, आधीचे बॉम्बे ब्रिटीश इंडिया
मृत्यू
27 जुलै 1987 मुंबई, महाराष्ट्र
शिक्षण
- प्राणीविज्ञान विषयांत सेंट झेवियर्स कॉलेजमधून बी.ए. ऑनर्स ही पदवी
- प्राणीशास्त्रातील पदव्यूत्तर अभ्यास बर्लिन विद्यापीठात प्रसिध्द पक्षीतज्ञ एर्विन श्ट्रेझमान यांच्या मार्गदर्शनाखाली केला.
- बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसरयटी मध्ये मार्गदर्शक व्याख्याता
- बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे आधी उपकार्यवाह व नंतर अध्यक्ष
- हैदराबाद राज्य पक्षीनिरिक्षण,त्रावणकोर-कोचीन पक्षीसर्वेक्षण,अफगाणिस्तान पक्षीसर्वेक्षण,कैलास मानससरोवर पक्षीयात्रा या यात्रांचे आयोजन करून मार्गदर्शक अहवाल लिहिले.
- सुगरण पक्षी,हंसक-फ्लेमिंगो पक्षी,माळढोक पक्षी या पक्ष्यांच्या सवयी त्यांचे निवासस्थान यांवर निरिक्षण व संशोधन केले, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या नियतकालीकात यांवर लेख लिहिले.
- हिमालयात फिन्स बाया पक्षी शोधून काढला, तसेच काळ्या मानेचा सारस -केन्स लडाख भागात आहे हे दाखवून दिले.
- इंडियन बोर्ड ऑफ वाइल्ड लाईफ या मंडळाच्या स्थापनेत महत्वाचे योगदान
- केंद्र सरकारकडे पर्यावरण खाते सुरू करण्यासाठी आग्रह केला त्यानुसार केंद्र सरकारने पर्यावरण खाते सुरू केले.
- केवलादेव घाना,चित्रस, पॉईंट कॅलीमर,हरीके लेक इ. पक्षीअभयारण्ये निर्माण करण्यात महत्वाचे योगदान
- नेचर क्लब ऑफ इंडिया चळवळीचे संस्थापक
- द बुक ऑफ इंडियन बर्डस
- द बर्ड्स ऑफ कच्छ
- इंडियन हिल बर्ड्स
- द बर्ड्स ऑफ त्रावणकोर-कोचीन
- द बर्ड्स ऑफ सिक्किम
- ए फिल्म गाईड टू द बर्ड्स
- बर्ड्स ऑफ द इस्टर्न हिमालयाज
- पिक्टोरियल गाईड टू द बर्ड्स ऑफ इंडिया अँड सबकॉन्टिनेंट
- द हँडबुक ऑफ बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान
- द फॉल ऑफ ए स्पॅरो हे त्यांचे आत्मचरित्र विशेष प्रसिध्द आहे.
- जॉयगोविंद लॉ सुवर्णपदक
- ब्रिटीश अर्निथॉलॉजिस्ट संस्थेचे सुवर्णपदक
- सुंदरलाल व्होरा मेमोरियल मेडल
- पावलोव्हस्की सेंचनरी मेमोरियल मेडल
- नेदरलँडचा ऑफिसर इन ऑर्डर ऑफ आर्क किताब
- इंटरनॅशनल जे पॉल गेट्टी प्राइझ फॉर वाइल्ड लाईफ कॉर्न्झ्रवेशन
- सी.व्ही. रामन पदक
- वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशनबद्दल भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार-सुवर्णपदक
- स्कॉल ऑफ ऑनर
- दादाभाई नौरोजी पारितोषिक
- अलीगढ तसेच आंध्र विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट
- पद्मभूषण-1958
- पद्मविभूषण-1976
- सन्मानीत राज्यसभा खासदार-1985
12 नोव्हेंबर 1946 पंडित मदनमोहन मालवीय यांचे निधन.
पंडित मदनमोहन मालवीय हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सेनानी व बनारस
हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक होते. मालवीयजी हिंदू महासभा तसेच राष्ट्रीय काँग्रेस
पक्षाशी संबंधित होते. हिंदू धर्मरक्षा,ऋषिकूल हरिव्दार,गोरक्षा आणि आयुर्वेद संमेलन
व सेवा समिती तसेच स्काउट चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. विदेशी शिक्षणसंस्थांचा अतिरेक संपवण्यासाठी तसेच
हिंदू धर्मियांचे संघटन व संवर्धन होण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्यास तोड नाही.
जन्म
25 डिसेंबर 1861 प्रयागराज, पूर्वीचे अलाहाबाद, ब्रिटीश इंडिया
12 नोव्हेंबर 1946 वाराणसी,ब्रिटीश इंडिया
- बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक
- भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उल्लेखनीय कार्य
- असहकार अंदोलनात सहभाग
- स्वातंत्र्यासाठी तुरूंगवास
- हिंदुस्थान टाइम्स या वर्तमानपत्राचे संपादक
- द लिडर या इंग्रजी वर्तमानपत्राचे संस्थापक
- विधवाविवाह, तसेच स्त्रीशिक्षण, व बालविवाह विरोध यांसाठी कार्य केले.
- मरणोत्तर भारतरत्न 2014
12 नोव्हेंबर 2000 राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली.
12 नोव्हेंबर 1947 साली महात्मा गांधींनी दिल्ली आकाशवाणी केंद्राला पहिली
व शेवटची भेट दिली होती, त्याचेच विशेष औचित्य व स्मरण म्हणून या दिवशी राष्ट्रीय सार्वजनिक
प्रसारण दिवस साजरा करण्यास मान्यता देण्यात आली. भारतात दरवर्षी राष्ट्रीय प्रसारण
दिवस 23 जुलैला साजरा केला जातो.
संदर्भ व आभार-12-11-2020
https://vishwakosh.marathi.gov.in/
Image by Ron Porter from Pixabay
संकल्पना,संकलन
व संपादनभालचंद्र
माधव इनामदार

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.