09 April-2021-09 एप्रिल

 

09 April-2021-09 एप्रिल

समाजसुधारक व सार्वजनिक सभेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी तथा सार्वजनिक काका यांचा जन्म. 

09 एप्रिल 1828

अल्पपरिचय

गणेश वासुदेव जोशी तथा सार्वजनिक काका हे प्रसिध्द समाजसुधारक व पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक होते.

जन्म

09 एप्रिल 1828 सातारा, ब्रिटीश भारत

मृत्यू

25 जुलै 1880 पुणे, ब्रिटीश भारत

शिक्षण

वकिल

कार्य

पुणे येथे वकिली

वकिली करीत असतानाच क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्यास कोणीही पुढे धजावत नव्हते तेव्हा गणेश जोशींनी हे आव्हान स्वीकारून फडके यांचे वकीलपत्र घेतले.

पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक स्थापना 02 एप्रिल 1870 या संस्थेच्या माध्यामातून त्यांनी राजकीय,आर्थिक सुधारणांसाठी प्रयत्न केले. लोकांचे प्रश्न इंग्रज सरकारकडे मांडून त्यांचा पाठपुरावा केला या कामात त्यांना न्यायमूर्ती म. गो. रानडे यांची मोलाची साथ मिळाली व या संस्थेस राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले, दुष्काळनिधी, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न यावर संस्थेने मोलाचे कार्य केले. स्वातंत्र्य व हक्कांसाठी लोकांना संघटित करण्याचे महत्वाचे कार्य सार्वजनिक सभेच्या माध्यमातून सार्वजनिक काकांनी केले.

लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्याआधीपासूनच त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला व स्वदेशी वस्तूंसाठी प्रदर्शने, देशी व्यापारत्तेजक मंडळाची स्थापना करून त्यांनी स्वदेशी वस्तूंची निर्मिती व स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन दिले, त्यांच्याच प्रयत्नातून आग्रा येथे कॉटन मिलची स्थापना झाली.

सार्वजनिक सभेच्या माध्यमातून स्वदेशी लवाद न्यायालयांची स्थापना करून त्यांनी ब्रिटीशांच्या वेळकाढू न्यायालयांचा समाचार घेतला व न्यायासाठी प्रयत्न केले.

वृत्तपत्रे व माध्यमांचे महत्व ओळखून वृत्तपत्रकारांचे संमेलनही त्यांनी भरविले व त्यांना स्वातंत्र्यासाठी उद्युक्त केले.

सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात हे बहुतकरून यशस्वी झाले याच  सार्वजनिक सभेच्या प्रचंड कामामुळे त्यांना सार्वजनिक काका असे संबोधण्यात येऊ लागले.

पुणे विद्यार्थी गृहाचे संस्थापक दादासाहेब केतकर यांचा जन्म. 09 एप्रिल 1887

अल्पपरिचय

विष्णू  गंगाधर केतकर तथा दादासाहेब केतकर हे पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक होते.

जन्म

09 एप्रिल 1887 मुंबई, ब्रिटीश भारत

मृत्यू

19 ऑक्टोबर 1950 पुणे, भारत

शिक्षण

प्रभू सेमिनरी शाळा, रॉबर्टमनी विद्यालय,विल्सन हायस्कूल मुंबई व न्यू इंग्लीश स्कूल पुणे येथे त्यांचे  शिक्षण झाले.

कार्य

    दादासाहेब हे पुणे विद्यार्थी गृहाच्या संस्थापककांपैकी एक व्यक्ती होते. पुणे विद्यार्थी गृहाच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. सुरूवातीला ते दादासाहेब खापर्डे यांच्या प्रेरणेतून यवतमाळ येथील विद्यागृह शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करीत होते. पुढे हरीकिशोर नावाच्या वृत्तपत्राचे संपादकपदही त्यांनी भूषविले, इंग्रज सरकारचे या दोन्ही गोष्टींवर लक्ष गेल्यामुळे ते सोडून दादासाहेब पुण्यात आले व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले व त्यानंतर साहा महिन्यात ते पुणे विद्यार्थी गृहात दाखल झाले व तेथे त्यांनी विद्यार्थ्यांची राहण्याची,जेवणाची सोय केल्यावर संस्थेकडून त्यांनी आनाथ विद्यार्थी गृह पाठशाला हा उपक्रम चालू केला त्यानंतर महाराष्ट्र विद्यालय सुरू केले, लोकसंग्रह छापखान्याच्या मदतीने त्यांनी शालोपयोगी व इतर पुस्तकांचे प्रकाशन सुरू केले. संस्थेमार्फत मुद्रण शिक्षण, मुक्तांगण इंग्लीश शाळा, बालरंजन केंद्र, वृध्दाश्रम,शतायुभवन व  क्रिडा संकूल व नवी मुंबईत संकूल तसेच सहा महाविद्यालये असा संस्थेचा विस्तार झाला.

महानुभाव पंथाचे विचारवंत डॉ. वि. भि. कोलते यांचे निधन. 09 एप्रिल 1998

अल्पपरिचय

डॉ. वि. भि. तथा डॉ. विष्णू भिकाजी कोलते हे महानुभाव पंथाचे जेष्ठ विचारवंत,लेखक,अभ्यासक व नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते.

जन्म

22 जून 1908

मृत्यू

09 एप्रिल 1998 नागपूर, महाराष्ट्र, भारत

शिक्षण

एम.ए. पीएचडी

कार्य

विदर्भ महाविद्यालय अमरावती येथे प्राध्यापक कार्यकाळ-1931 ते 1944

मॉरिस कॉलेज नागपूर येथे मराठीचे प्राध्यापक कार्यकाळ-1944 ते 1964

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू कार्यकाळ-1966 ते 1972

साहित्य

  • श्री चक्रधर
  • चक्रधर: शेवटचे प्रकरण
  • भास्कर भट्ट बोरीकर: चरित्र व काव्य विवेचन
  • महानुभाव आचारधर्म
  • महानुभाव तत्वज्ञान
  • महानुभाव संशोधन खंड एक व दोन
  • रूक्मिणी स्वयंवर-संपादित
  • शिशुपाल वध-संपादित

पुरस्कार व सन्मान

पद्मश्री-1991

साहित्य अकादमी फेलोशिप

भोपाळ येथील 1967 च्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

दलित साहित्यिक शंकरराव खरात यांचे निधन. 09 एप्रिल 2001

अल्पपरिचय

शंकरराव रामचंद्र खरात हे प्रसिध्द दलित साहित्यिक होते.

जन्म

11 जुलै 1921

मृत्यू

09 एप्रिल 2001

कार्य

आंबेडकरी चळवळीतील एक प्रसिध्द दलित साहित्यिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू

साहित्य

तराळ अंतराळ- आत्मचरित्र

बारा बलुतेदार-कादंबरी

दौण्डी-कथासंग्रह

झोपडपट्टी-कादंबरी

सन्मान

1984 च्या जळगाव येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष


संदर्भ व आभार


ttps://www.google.com/h

https://www.wikipedia.org/

https://maharashtranayak.in/

https://vishwakosh.marathi.gov.in/

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020