गोवा मुक्तीदिन विशेष- 19 डिसेंबर 2020 -19 December 2020

 

गोवा मुक्तीदिन विशेष- 19 डिसेंबर 2020-19 December 2020

19 डिसेंबर 1899 मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्म.

अल्पपरिचय

    मार्टिन ल्युथर किंग  सिनीयर हे आफ्रिकन-अमेरिकन मानव अधिकार कार्यकर्ते नेते होते. त्यांनी महात्मा गांधींच्या प्रेरणेने मानव अधिकारांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. ते मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचे वडील होत.

जन्म

19 डिसेंबर 1899 स्टॉकब्रिज जॉर्जिया अमेरिका

मृत्यू

11 नोव्हेंबर 1984 अटलांटा,जॉर्जिया अमेरिका

कार्य

बाप्टीस्ट चर्चचे सदस्य व नंतर धर्मोपदेशक

नागरी मानवी हक्क चळवळीतील एक महत्वाचे नेते

मानवअधिकार व वर्णव्देशविरोध यांसाठीच्या अंदोलनात सहभाग व नेतृत्व त्यांनी केले.

19 डिसेंबर 1934 माजी  राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा जन्म.

अल्पपरिचय

प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या बाराव्या व पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. समाजकारणातून त्या सक्रीय राजकारणात आल्या. त्यांनी सुरवातीला मुक्ताईनगर,जळगाव साठी विधानसभा व नंतर अमरावती मधून लोकसभेवर निवडून गेल्या. विविध खात्याची मंत्रीपदे त्यांनी भूषविली. सुरवातीला समाजकार्यात असताना निराधार महिलांसाठी त्यांनी वसतीगृहे काढली. व त्यांना आधार देण्याचे कार्य केले.

जन्म

19‍ डिसेंबर 1934 नडगाव,जळगाव,महाराष्ट्र आधीचे बॉम्बे राज्य ब्रिटीश भारत

शिक्षण

  • शालेय शिक्षण-आर. आर. विद्यालय,जळगाव
  • महाविद्यालयीन शिक्षण-मूळजी जेठा कॉलेज,जळगाव येथून बी.ए. व एम.ए. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र
  • गव्हर्नमेंट लॉ कॉलेज,बॉम्बे आता मुंबई मधून एल.एल.बी.

कार्य

  • सुरवातीला समाजकार्यातून महिलांसाठी कार्य
  • गांधीवादी विचारसरणीमुळे राष्ट्रीय काँग्रेसपक्षामधून राजकारणात सहभाग
  • मुक्ताईनगर जळगाव मधून आमदार व नंतर मंत्री म्हणून समाजकल्याण,आरोग्य,सांस्कृतिक,राजशिष्ठाचार,शिक्षण अशा विविध खात्याच्या मंत्री म्हणून कार्य
  • विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणून कार्य
  • राज्यसभेच्या उपसभापती व नंतर अनेक समित्यांचे सभापतीपद
  • राजस्थानच्या 17 व्या राज्यपाल 08 नोव्हेंबर 2004 ते 23 जून 2007
  • भारताच्या 12 व्या व पहिल्या महिला राष्ट्रपती 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012

पुरस्कार व सन्मान

मेक्सिको कडून स्पेशल कॅटेगिरी सॅश ऑर्डर ऑफ दि ॲझटेक इगल पुरस्कार

19 डिसेंबर 1961 गोवा मुक्तीदिन

गोवा मुक्तीदिन

    भारताच्या ‍1947 मधील स्वातंत्र्यानंतर तत्कालीन संस्थाने हैदराबाद,जुनागढ,जम्मू व काश्मीर ही सरदार वल्लभभाई पटेलांनी भारतात विलीन करून घेतली,पण दादरा व नगर हवेली,दमण व दिव व गोवा या भागावर पोर्तुगीजांचे नियंत्रण होते. भारताने वाटाघाटींच्या माध्यामातून हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला,पण पोर्तुगालने त्यास नकार दिला. जनतेने मोठे जनअंदोलन उभारले ज्याचे नेतृत्व जेष्ठ समाजवादी नेते  राममनोहर लोहिया व इतर गोमंतक वादी नेत्यांनी केले त्यामुळे गोवा मुक्तीचे हे अंदोलन चिघळले. भारत सरकारला शेवटी या अंदोलनाची व परिस्थितीची जबाबदारी घ्यावी लागली व भारताने मग या भागावर विशेषकरून गोवा मुक्तीसाठी 17 ते 19 डिसेंबर 1961 मध्ये ऑपरेशन विजय नावाची मोहिम चालवली व या तीन दिवसांच्या मोहिमेनंतर  पोर्तुगीज जनरल मॅनुएल अेंटेनिओ  वासालो  इ सिल्वा यांनी आम्ही शरणागती स्वीकारत असल्याचे जाहीर केले, व 19 डिसेंबर 1961 साली गोवा  तब्बल 451 वर्षांच्या पोर्तुगीज आमंलातून मुक्त झाला. या ऑपरेशनमध्ये भारताचे 22 तर पोर्तुगीज 30 सैनिकांना प्राण गमवावे लागले.  या मुक्तीनंतर भारताने पुढच्या कारभाराच्या सोयीसाठी मे. जनरल के.पी. कॅन्डथ यांची मिलिट्री गर्व्हनर जनरल म्हणून नेमणूक केली. 31 डिसेंबर 1974 रोजी पोर्तुगालने या कारवाईस जागतिक मान्यता दिली.

19 डिसेंबर 1974 ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व खेळाडू रिकी पाँटिंग याचा जन्म.

अल्पपरिचय

    रिकी पाँटिंग हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम क्रिकेट खेळाडूंपैकी एक व ऑस्टे्लियाच्या सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी  तो प्रसिध्द आहे. रिकी पाँटिंगच्या काळात ऑस्ट्रेलिया हा सर्वांत यशस्वी संघ राहिला.

जन्म

19 डिसेंबर 1974 लॉनचेसटन,टास्मानिया,ऑस्ट्रेलिया

कार्य

ऑस्ट्रेलियासाठी अंतरराष्ट्रीय क्रिकेट 1995 ते 2012

ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषविताना त्याने  सलग दोन विश्वचषक तसेच चैम्पियन्स चषक स्पर्धा व अनेक कसोटी मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियास विजय मिळवून दिला.

क्रिकेट कारर्कीर्द

    ऑस्ट्रेलिया संघासाठी कसोटी क्रिकेट खेळताना त्याने 168 कसोटीत 13378 धावांचे योगदान दिेले ज्यामध्ये 41 शतके,6‍ व्दिशतके, 62 अर्धशतकांचा समावेश होता ज्यामध्ये त्याच्या वैयक्तीक सर्वोच्च 257 धावांचाही समावेश होता. एकदिवसीय मध्ये त्याने 375 सामन्यात प्रतिनिधित्व करताना 13704 धावांचे योगदान दिले. ज्यामध्ये 30 शतके व 82 अर्धशतकांचा समावेश होता. ज्यामधील त्याची सर्वोच्च धावसंख्या होती 164 धावा. टी-20 च्या सामन्यांमध्ये त्याने 17 सामने खेळताना 401 धावांचे योगदान दिले ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएल मध्येही त्याने 10 सामन्यामध्ये प्रतिनिधित्व केले.

    रिकी पाँटिंग सध्या दिल्ली कॅपिटल्स यां आयपीएल संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्य करत असून त्याआधी त्याने मुंबई इंडियन्स या संघासाठी सुध्दा ही जबाबदारी पार पाडली आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघासाठी सुध्दा तो वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतो.

19 डिसेंबर 1999 क्रिकेटपटू बाळ दाणी यांचे निधन.

अल्पपरिचय

हेमचंद्र तुकाराम दाणी तथा बाळ दाणी हे रणजी तसेच कसोटी क्रिकेटपटू होते. तसेच ते क्रिडा संघटकही होते.

जन्म

24 मे 1933

मृत्यू

19 डिसेंबर 1999

कार्य

भारतीय वायूदलात नोकरी

भारतीय कसोटी तसेच रणजी संघात प्रतिनिधित्व

क्रिकेट कारकिर्द

    भारताकडून बाळ दाणी एकमेव कसोटी पाकविरूध्द खेळले ज्यामध्ये त्यांना फलंदाजीची संधी मिळाली नाही परंतू गोलंदाजी करताना त्यांनी एक बळी मिळवला. प्रथमश्रेणी सामन्यात मात्र त्यांनी 116 सामन्यात खेळताना 6476 धावांचे योगदान देताना 17 शतके व 34 अर्धशतके झळकावली. मध्यमगती गोलंदाजी करताना त्यांनी 200 बळी मिळवले. ज्यामध्ये चार वेळा पाच किंवा पाचपेक्षा अधिक बळी घेण्याचा त्यांनी पराक्रम केला.

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

http://www.pratibhapatil.info/

https://www.espncricinfo.com/

https://www.cricbuzz.com/profiles/38/ricky-ponting

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020