11 मार्च 2021- छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन

 

11 मार्च 2021- छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन

छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन. 11 मार्च 1689

अल्पपरिचय

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती

जन्म

14 मे 1657 किल्ले पुरंदर, भारत

मृत्यू

11 मार्च 1689 तुळापूर, पुणे, भारत

राज्याभिषेक

16 जानेवारी 1681 रायगड, भारत 

    छत्रपती संभाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ पुत्र व हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते. स्वराज्याचे रक्षणकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अन्यायी व क्रुर मुघल बादशहा औरंगजेब, पोर्तुगीज व इतर सत्ताधिशांना आपल्या धैर्याने व चातुर्याने स्वराज्याच्या या दुसऱ्या छत्रपतींनी सळो की पळो करून सोडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्याचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी पेलताना संभाजीराजांनी तब्बल नऊ वर्षे मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूला शह दिला. फंदफितुरी व दगाफटक्यामुळे छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या हाती लागले परंतू प्रचंड धैर्य, धर्मनिष्ठा व स्वराज्याप्रती असणारी समर्पणवृत्ती यांमुळे औरंगजेबाने हालहाल केले तरी न डगमगता निर्धाराने महाराजांनी धर्माच्या व स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान केले. हेच महाराजांचे बलिदान नंतरच्या मराठी सत्तेच्या उत्कर्षास कारणीभूत ठरले व औरंगजेबाचे मुघल साम्राज्य  त्याच्या मृत्यूनंतर कोसळण्यास सुरवात झाली. आजच्याच दिवशी दि. 11 मार्च 1689 रोजी  धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंनी देह ठेवला व ते अवघ्या मराठीजनांचे स्फूर्तीस्थान ठरले. छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेकाविषयी जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना एम.डी. पदवी प्रदान.11 मार्च 1886

अल्पपरिचय

    भारतातील पहिल्या महिला डॉक्टर  म्हणून आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना ओळखले जाते. आजच्याच दिवशी म्हणजेच 11 मार्च 1886 रोजी आनंदीबाई जोशी यांना एम.डी. ही वैद्यकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्रदान केली गेली  व अशारीतीने अत्यंत संयम,ध्येयपूर्णता, व प्रचंड सामाजिक विरोधाचा सामना करीत आनंदीबाई यांनी डॉक्टर बनण्याचे आपले व आपले पती गोपाळराव यांचे स्वप्न साकार केले, भारतीय स्त्रियांच्या शिक्षणाच्या दृष्टीने ही घटना ऐतिहासिक ठरली व आनंदीबाईंना भारतातील पहिली महिला डॉक्टर बनण्याचा मान मिळाला. आनंदीबाईंच्या विषयी येथे आधिक जाणून घ्या.

क्रिकेटपटू विजय हजारे यांचा जन्म. 11 मार्च 1915

अल्पपरिचय

    विजय सॅम्युएल हजारे हे प्रसिध्द भारतीय क्रिकेटपटू होते. सुरवातीच्या काळातील क्रिकेट विक्रमवीर म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. विजय हजारे यांच्याच नेतृत्वात भारताने पहिला कसोटी विजय साकारला. विजय हजारे यांच्या संबंधी आधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

नोबेलविजेते स्कॉटीश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन. 11 मार्च 1955

अल्पपरिचय

अलेक्झांडर फ्लेमिंग हे प्रसिध्द स्कॉटिश शास्त्रज्ञ होते. पेनिसिलीनचे शोधकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते.

जन्म

06 ऑगस्ट 1881 डारव्हेल,स्कॉटलंड, युनायटेड किंग्डम

मृत्यू

11 मार्च 1955 लंडन, युनायटेड किंग्डम

शिक्षण

इंपीरिअल कॉलेज, लंडन, सेंट मेरीज कॅम्पस,किलमनरॉक अकॅडमी,वेस्टमिनिस्टर विद्यापीठ

कार्य

ब्रिटनमधील सुप्रसिध्द जीवशास्त्रज्ञ,औषधतज्ञ

सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेले महत्वाचे शोध

पेनिसिलीनचा शोध व त्याचा प्रतिजैवक म्हणून वैद्यकशास्त्रात वापर याच शोधासाठी त्यांना 1945 साली वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

लाइझोमाइम या प्रथिनांचा शोध त्यांनी लावला.

फ्लेमिंग यांच्या शोधामुळे प्रतिजैविकांच्या निर्माणात व वापरात प्रचंड वाढ झाली. पेनिसिलीन हा शंभर वर्षातील सर्वोकृष्ट वैद्यक शोधांपैकी एक शोध ठरला. पेनिसिलीनच्या औषधीय गुणधर्मामुळे अनेक रूग्णांचे प्राण वाचण्यास मदत  झाली.

फ्लेमिंग यांच्या प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या कार्याचा अखिल मानवजातीवर नंतरच्या काळात प्रचंड प्रभाव राहिला. व वेगवेगळ्या औषधांमुळे मानवी जीवनाचे आयुष्यमान वाढले.

पुरस्कार व सन्मान

रॉयल सोसायटी ऑफ लंडनची फेलोशिप

नाइट बॅचलर पुरस्कार

एडिनबर्ग विद्यापीठाकडून देण्यात येणारे कॅमेरून पारितोषिक

वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक-1945

एडिनबर्गच्या रॉयल सोसायटी ऑफ एडिनबर्गची फेलोशिप

रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची फेलोशिप

ऑल इंग्लंड बॅडमिंग्टन स्पर्धा पी. गोपीचंद यांनी जिंकली. 11 मार्च 2001

अल्पपरिचय

    पुल्लेला गोपीचंद हे माजी भारतीय बॅडमिंग्टन खेळाडू व प्रशिक्षक आहेत. बॅडमिंग्टनची विम्बल्डन  स्पर्धा समजली जाणारी ऑल इंग्लंड बॅडमिंग्टन स्पर्धा गोपीचंद यांनी आजच्याच दिवशी म्हणजेच 11 मार्च 2001 ला जिंकून ही स्पर्धा जिंकणारे दुसरे बॅडमिंग्टनपटू होण्याचा मान मिळविला. पहिल्यांदा ही स्पर्धा प्रकाश पादुकोण यांनी 1980 साली जिंकली होती. पी.गोपीचंद यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.


संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/


संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

बालदिन दिनविशेष 14-11-2020

आजची दिनविशेष प्रस्तावना 31-10-2020