बालदिन दिनविशेष 14-11-2020
बालदिन दिनविशेष 14-11-2020
14-11-1889 भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्म.
पंडीत जवाहरलाल मोतीलाल नेहरू तथा चाचा नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नेते होते. लहान मुलांविषयी त्यांना खूपच आस्था व प्रेम होते, त्यामुळेच आजचा त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
14-11-1889 पूर्वीचे अलाहाबाद, ब्रिटीश इंडिया सध्याचे प्रयागराज उत्तर प्रदेश
27-05-1964 नवी दिल्ली, भारत
बॅरिस्टर
- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे नेते
- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कार्यकाळ 15-08-1947 ते 27-05-1964
- स्वतंत्र भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री कार्यकाळ 15-08-1947 ते 27-05-1964
- भारताचे अर्थमंत्री 08-10-1958 ते 17-11-1959
- 1920 च्या पहिल्या किसान मार्चचे आयोजक
- 1929 च्या लाहोर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष
- असहकार,भारत छोडो सहीत अनेक चळवळींमध्ये सहभाग व त्यासाठी तब्बल 9 वेळा तुरूंगवास
- काँग्रेसचे अध्यक्ष 1946 पासून 1954 पर्यंत तब्बल चारवेळा
- अलिप्तवादी चळवळीचे प्रणेते
- आत्मकथा
- लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर
- डिस्कव्हरी ऑफ इंडिया
- भारतरत्न 1955
14-11-1969 जवाहरलाल नेहरू विद्यापीठ-जेएनयू दिल्ली या विद्यापीठाची स्थापना.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ-जेएनयू हे भारतातील राष्ट्रीय विद्यापीठ तसेच प्रमुख मुक्त विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ असून अंतराराष्ट्रीय भाषा शिकण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. विद्यापीठाची स्थापना 14-11-1969 रोजी पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या जन्मदिनी त्यांच्याच नावावरून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ-जेएनयू अशा नावाने करण्यात आली असून विद्यापीठाच्या स्वतंत्र संविधानाव्दारे या विद्यापीठाचे कुलपती हे स्वत: देशाचे पंतप्रधान असतात तर राष्ट्रपती हे अभ्यागत -व्हिजीटर आहेत. साहाय्यक कुलगुरू व कुलसचिव यांच्याव्दारे सर्व विद्यापीठाचा कार्यभार करण्यात येतो. विद्यापीठाची कोणतीही अशी कक्षा नसल्यामुळे भारतातील कोणतेही उच्च तंत्रज्ञान महाविद्यालय या विद्यापीठास संलग्नीत करता येते. या विद्यापीठात वेगवेगळ्या शाखांऐवजी चार विद्यालये आहेत ती अशी. परदेशी भाषा विद्यालय,अंतरराष्ट्रीय अभ्यास विद्यालय,समाजशास्त्रे विद्यालय व जैवविज्ञान व तंत्रज्ञान विद्यालय या शिवाय सैध्दांतिक परिस्थितीविज्ञान विद्यालय,संगणक व तंत्रविज्ञान विद्यालय,सर्जनशील कला विद्यालय अशीही वेगवेगळी विद्यालये आहेत. विद्यापीठात एक केंद्रीय ग्रंथालय असून वेगवेगळ्या विद्यालयांची स्वतंत्र ग्रंथालये आहेत.
14-11-1971 कादंबरीकार तसेच चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचे निधन.
नारायण हरी आपटे हे प्रसिध्द कादंबरीकार तसेच चित्रपट पटकथालेखक होते. न पटणारी गोष्ट,एकटी,पहाटेपूर्वीचा काळोख,उमज पडेल तर,सुखाचा मूलमंत्र अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रसिध्द आहेत.
11-07-1889 समडोळी,जिल्हा सांगली पूर्वीचे सांगली संस्थान, ब्रिटीश इंडिया
14-11-1971 कोरेगाव, जि. सातारा
- किर्लोस्कर खबरचे पहिले उपसंपादक
- उद्यान,लोकमित्र,अल्हाद या साप्ताहिकांचे तसेच मधुकर या मासिकाचे संस्थापक व संपादक
- आपटे आणि मंडळी नावाने प्रकाशनगृहाची सुरवात नारायण आपटे यांनी केली, याच्याच प्रकाशनासाठी श्रीनिवास छापखाना कोरेगाव येथे सुरू केला.
- अजरामर
- अजिंक्यतारा
- अपेक्षा
- अमरसंग्राम
- अमेरिका पूर्वखंड
- अर्वाचीन रामराज्य
- आनंदमंदिर
- आपण आहो माणसे
- आम्ही दोघे
- आयुष्याचा पाया
- आराम
- आराम-विराम
- उमज पडेल तर
- एकटी
- ऐरणीवर
- कड्याच्या टोकावर
- कथाकौमुदी
- कर्मगति
- कुठे आहे तो देव
- कुर्यात सदा मंगलम
- केवळ नवलाई
- कोंडा-कणी
- कोणी कोणाचे नव्हे
- गृह सौख्य
- ग्रीष्मागमन
- जवानांचा जीवनधर्म
- जाऊबाई
- ते आणि मी
- त्या अबला होता
- दिवाकरदृष्टी
- दुरंगी दुनिया
- न पटणारी गोष्ट
- पंजाबचा लढवय्या शीख
- पहाटे पूर्वीचा काळोख
- पांच ते पांच
- पाणी आणि शेवाळ
- पिशाचसाधन
- पुरुषाचे भाग्य
- फसगत
- बनारसी बोरे
- भाग्यश्री
- भुरळ
- मानवी आशा
- मी वाट पाहीन
- याला कारण शिक्षण
- रजपुतांचा भीष्म
- रत्नगुंफा
- लांच्छित चंद्रमा
- लोकमित्र
- वेटिंग रूम
- वैभवाच्या कोंदणात
- व्यवसायपत्रे
- संगदोष
- संधिकाल
- संसारांत पडण्यापूर्वी
- समर्थ शिष्य
- साजणी
- सायंकाळी ५ ते प्रभातकाली ५
- सुखाचा मूलमंत्र
- सुगरणीचा संसार
- सुमन गंध
- सोन्याचे बिल्वर
- हंसा आणि रुसा
- हदयाची श्रीमंती
नारायण हरी आपटे यांनी लिहिलेल्या न पटणारी गोष्ट या कादंबरीवर प्रभात फिल्म्स ने बनवलेला कुंकू हा चित्रपट खूप प्रसिध्द झाला. कुंकू प्रमाणेच आपटे यांच्या भाग्यश्री तसेच रजपूत रमणी कादंबऱ्यांवर क्रमश: अमृतमंथन,रजपूत रमणी हे चित्रपट तर लघुकथासंग्रहावर बेतलेले भाग्यरेखा, दुनिया ना माने-हिंदी हेही चित्रपट गाजलेले आहेत.
14-11-1971 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्ट याचा जन्म.
ॲडम क्रेग गिलख्रिस्ट उर्फ गिली हा ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाच्या 1999,2003,2007 मधील सलग तीन विश्वकरंडक विजयांत गिलीचा वाटा मोलाचा राहिला.
14-11-1971 बेल्गिंजन,न्यू साउथ वेल्स ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट 1996 ते 2013
ऑस्ट्रेलियासाठी गिलख्रिस्टने 96 कसोटी,287 एकदिवसीय तसेच 13 टी-20 सामने खेळले त्याचबरोबर त्याने आयपीएल अर्थात इंडियन प्रिमियर लीगचे 80 सामनेही खेळले आहेत. 96 कसोटीमध्ये त्याने 47.61 च्या सरासरीने 5570 धावा वैयक्तीक सर्वोच्च 204 धावांसहीत केल्या, 287 एकदिवसीय सामन्यात 9619 धावा ह्या 35.89 च्या सरासरीने 172 वैयक्तीक सर्वोच्च धावसंख्येसहीत केल्या त्याचप्रमाणे 13 टी-20 सामन्यात 272 धावा जमवताना 48 ह्या सर्वोच्च धावसंख्येचे योगदान दिले. आयपीएल मधील 80 टी-20 सामन्यात गिलीने 2069 धावा जमवताना 109 धावांची वैयक्तीक सर्वोच्च खेळी साकारली.
गिलख्रिस्टने आयपीएल मध्ये डेक्कन चार्जर्स व किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाचे नेतृत्व करताना 2009 साली डेक्कन चार्जर्स संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले.
आजचे पुरस्कार
जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची 1990 च्या जवाहरलाल नेहरू अंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड 14-11-1991
संदर्भ व आभार
https://www.google.com/
https://www.pmindia.gov.in/
https://www.wikipedia.org/
https://www.cricbuzz.com/
https://mr.vikaspedia.in/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.