महत्वाचे दिनविशेष नोव्हेंबर 16 2020

 महत्वाचे-दिनविशेष नोव्हेंबर 16 2020

16-11-1915 लाहोर कटातील क्रांतीकारक विष्णु गणेश पिंगळे यांच्यासहीत सात जणांना फाशी देण्यात आली.

अल्पपरिचय

विष्णु गणेश पिंगळे हे गदर पार्टीचे एक संस्थापक तसेच सशस्त्र क्रांतीकारक होते. अमेरिकेत त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठात मेकॅनिकल शाखेत प्रवेश घेतल्यानंतर भारतीय स्वातंत्र्यासाठी लाला हरदयाळ तसेच डॉ. खानखोजे यांच्यासोबतीने 1913 साली गदर पार्टी नावाने संघटना स्थापन केली. या संघटनेचा उद्देश पहिल्या महायुध्दकाळात भारतात सशस्त्र उठाव करून ब्रिटीश सत्ता उलथवण्याचा होता त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर शीख तसेच पंजाबी क्रांतीकारकारकांचे संघटन केले. इंजिनियर झाल्यावर ते 1915 साली भारतात आले व रासबिहारी बोस,सचिंद्रनाथ संन्याल,कर्तारसिंह सराबा,सरदार बक्षीसस्रिह,सरदार जगनसिंह,सरदार बुटासिंह,सरदार ईश्वरसिंह,सरदार हरनामसिंह इत्यादींनी 21 फेब्रुवारी 1915 ला सशस्त्र उठाव करण्याची तयारी केली. या कटाची माहिती फितुरीने ब्रिटीश सरकारला झाल्यावर त्यांनी विष्णु पिंगळे यांच्यासहीत  कर्तारसिंह सराबा,सरदार बक्षीसस्रिह,सरदार जगनसिंह,सरदार बुटासिंह,सरदार ईश्वरसिंह,सरदार हरनामसिंह यांना 16 नोव्हेंबर 1915 साली फाशी देऊन हा कट उध्वस्त केला.

जन्म

02-01-1889 तळेगाव-ढमढेरे, मुंबई प्रांत ब्रिटीश इंडिया सध्या  महाराष्ट्र, भारत

मृत्यू

16-11-1915 लाहोर, ब्रिटीश इंडिया सध्या पाकिस्तान

शिक्षण

मेकॅनिकल इंजिनियर वॉशिंग्टन विद्यापीठ अमेरिका

कार्य

गदर पार्टीचे एक संस्थापक

बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देऊन सशस्त्र क्रांतीसाठी गदर पार्टीव्दारे शीख पंजाबी क्रांतीकारकांचे संघटन करीत ब्रिटीश सरकारविरूध्द सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला. पण फितुरीमुळे तो पूर्णत्वास गेला नाही व पिंगळेंसहीत सात जणांना फाशी दिली गेली.

16-11-1927 नाट्यश्रेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म.

अल्पपरिचय

डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू तथा डॉ. श्रीराम लागू हे  मराठी नाट्यसृष्टी,चित्रपटसृष्टी  तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. डॉ. लागूंची नटसम्राट, हिमालयाची सावली,किरवंत,क्षितीजापासून समुद्र अशा नाटकांतील भूमिका तसेच सामना सिंहासन, पिंजरा अशा अनेक चित्रपटातील भूमिका प्रचंड गाजल्या.

जन्म

16-11-1927 सातारा ब्रिटीश इंडिया सध्या महाराष्ट्र ,भारत

मृत्यू

17-12-2019 पुणे, महाराष्ट्र,भारत

शिक्षण

एमबीबीएस

कार्य

मराठी,हिंदी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टीत अजोड असे अभिनयसंपन्न कार्य

प्रसिध्द नाटके

  • इथे ओशाळला मृत्यू
  • नटसम्राट
  • किरवंत
  • हिमालयाची सावली
  • क्षितीजापासून समुद्र
  • एकच प्याला
  • पप्पा सांगा कोणाचे

प्रसिध्द चित्रपट- हिंदी-मराठी

  • सामना
  • सिंहासन
  • पिंजरा
  • गुपचुप-गुपचुप
  • मुक्ता
  • ध्यासपर्व
  • आपली माणसं
  • घरोंदा
  • चलते चलते
  • देवता
  • मुकद्दर का सिकंदर
  • सदमा

पुस्तके व लेखन

  • झाकोळ चित्रपटाची पटकथा
  • लमाण हे आत्मचरित्र

पुरस्कार

  • फिल्मफेअर पुरस्कार घरोंदा या हिंदी चित्रपटातील मुख्य सहाय्यक भूमिकेसाठी 1978
  • कालीदास सन्मान 1997
  • मा. दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार  2006
  • संगीत नाटक अकादमी फेलोशिप 2010
  • राजर्षी शाहू कला गौरव पुरस्कार 2012

डॉ. लागूंनी सुरू केलेल्या रूपवेध प्रतिष्ठानतर्फे त्याच्या मुलाच्या म्हणजेच तन्वीरच्या स्मृतीप्रत्यर्थ तन्वीर पुरस्कार दिला जातो.

16-11-1945 युनेस्को संघटनेची स्थापना.

युनेस्को

युनायटेड नेशन्स सायंटिफिक एज्युकेशनल कल्चरल ऑर्गनायझेशन अर्थात युनेस्को ही नावाप्रमाणेच शैक्षणिक,वैज्ञानिक,सांस्कृतीक क्षेत्रात जागतिक सहयोग वाढवून जागतिक शांतता तसेच सामाजिक सांस्कृतीक सौहार्द जपण्याचे काम करणारी संयुक्त राष्ट्रांची एक जागतिक स्तरावरील संघटना असून या संघटनेद्वारे अशी अनेक कामे केली जातात त्यातील एक प्रमुख म्हणजे जागतिक वारसास्थळांची यादी या यादीतील जागतिक वारसास्थळांचे संरक्षण संवर्धन करण्याचे कामही ही संस्था करते.

मुख्यालय -पॅरिस फ्रान्स येथे असून संघटनेची 50 पेक्षा अधिक कार्यालये जगभरात आहेत.

16-11-1973 बॅडमिंग्टनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म.

अल्पपरिचय

पुल्लेला गोपीचंद हे भारताचे माजी बॅडमिंग्टनपटू आहेत. प्रकाश पादुकोण यांच्यानंतर ऑल इंग्लंड बॅडमिंग्टन चॅम्पीयनशिप जिंकणारे ते दुसरेच खेळाडू आहेत.

जन्म

16-11-1973 नागंधला,प्रकाशम, आंध्र प्रदेश

कार्य

बॅडमिंग्टनमध्ये देशाचे प्रतिनिधित्व व सध्या साइना नेहवाल, पी.व्ही. सिंधू सारख्या प्रतिभाशाली खेळाडूंचे प्रशिक्षक

पुल्लेला गोपीचंद यांनी आपली पहिली  राष्ट्रीय स्पर्धा 1996 साली जिंकली, त्यानंतर सलग पाचवर्षे 2000 सालापर्यंत त्यांनी या स्पर्धेवर आपला वरचष्मा जमविला. 1998 च्या राष्ट्रकूल स्पर्धेत सांघिक प्रकारात रौप्यपदक व पुरूष एकेरी मध्ये कांस्यपदक मिळविले.

2001 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंग्टन चॅम्पियनशीप जिंकत त्यांनी इतिहास घडविला. प्रकाश पादुकोण यांनी 1980 मध्ये सर्वप्रथम ही स्पर्धा जिंकली होती.

बॅडमिंग्‍टनमधून निवृत्त झाल्यावर गोपीचंद यांनी गोपीचंद बॅडमिंग्टन आकादमीची स्थापना 2008 साली केली व साइना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, पी. कश्यप,साईप्रणित,किदाम्बी श्रीकांत अशा अनेक खेळाडूंना बॅडमिंग्टनचे धडे दिले. साइनाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2012 ऑलिंपिक मध्ये कांस्यपदक तर पी.व्ही. सिंधूने 2016 च्या ऑलिंपिक मध्ये रौप्यपदक जिंकून गोपीचंद यांचा विश्वास सार्थ ठरविला. गोपीचंद हे 2016 च्या ऑलिंपिक साठी भारतीय राष्ट्रीय बॅडमिंग्टन संघाचे प्रशिक्षक राहिलेले आहेत.

पुरस्कार

  • अर्जुन पुरस्कार 1999
  • राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2001
  • पद्मश्री 2005
  • द्रोणाचार्य पुरस्कार 2009
  • पद्मभूषण 2014

यासोबतच अनेक राष्ट्रीय अंतराराष्ट्रीय पुरस्कार गोपीचंद यांना मिळालेले आहेत.

16-11-2013 महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची क्रिकेटमधून निवृत्ती

सचिन रमेश तेंडुलकर हे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले आहे. आपल्या अनेक विश्वविक्रमी खेळींमुळे सचिन सर्वांच्याच गळ्यातील ताईत आहे. 16 नोव्हेंबर 2013 रोजी आपल्या 24 वर्षाच्या प्रदिर्घ कारर्किदीचा सचिनने वेस्ट इंडिज संघाविरूध्द मालिकेतील अखेरची सचिनची 200 वी कसोटी  मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळून क्रिकेटचा निरोप घेतला. सचिनची कारर्किर्द त्याच्या नुसत्या धावा मोजल्या तरी आपल्या लक्षात येईल सचिनने 200 कसोटीत 15921 धावा तर 463 एकदिवसीय मध्ये तब्बल 18426 धावा केल्या आहेत आपल्या शेवटच्या कसोटीतही त्याने 74 धावांचे योगदान दिले, व क्रिकेटचा भावपूर्ण निरोप घेतला.

आजचे पुरस्कार

  • मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड ’चतुरंग प्रतिष्ठान’च्या ’पर्सन ऑफ प्राईड’ पुरस्कारासाठी करण्यात आली.16-11-1996
  • ब्रिटनच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना प्रदान. 16-11-1997
  • कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा ’संस्कृत रचना पुरस्कार’ डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर. 16-11-2000

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://www.dainikprabhat.com/

https://en.unesco.org/

https://www.cricbuzz.com/

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

बालदिन दिनविशेष 14-11-2020

आजची दिनविशेष प्रस्तावना 31-10-2020