18 डिसेंबर 2020 अंतरराष्ट्रीय अप्रवास दिन विशेष
18 डिसेंबर 2020 अंतरराष्ट्रीय अप्रवास दिन विशेष
अल्पसंख्यांक दिन 18-12-2020
अल्पसंख्यांक दिन
हा भारतात दरवर्षी या दिवशी साजरा करण्यात
येतो. हा दिवस अल्पसंख्यांकांच्या हक्क व त्यांचे अधिकार आबाधित रहावेत यासाठी साजरा
करण्यात येतो. अल्पसंख्यांकांवर होणारा अन्याय हा दूर होऊन त्यांना समाजाच्या मुख्य
प्रवाहात सामील करून घेण्यासाठी या दिवसाची निर्मिती करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक
समाजाला विकासाच्या प्रवाहात आणणे त्यांचे हक्क व अधिकार त्यांना मिळवून देणे हे या
दिवसाचे अंतिम उद्दिष्ट आहे.
अंतरराष्ट्रीय अप्रवास दिवस-इंटरनॅशनल मायग्रंट्स डे 18-12-2020
अंतरराष्ट्रीय
अप्रवास दिवस अर्थात इंटरनॅशनल मायग्रंट्स डे हा दरवर्षी 18 डिसेंबरला साजरा करण्यात
येतो. हा दिवस 18 डिसेंबर 1990 पासून दरवर्षी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त
राष्ट्रांच्या महासभेने स्थलांतर करणाऱ्या
कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या हक्कासाठी हा दिवस साजरा करण्यात येणार
असल्याचे जाहीर केले. संयुक्त राष्ट्रांची विशेष संघटना असलेल्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन
फॉर मायग्रंट्सकडून हा दिवस जागतिक स्तरावर
साजरा करण्यात येतो. स्थलांतरामुळे येणाऱ्या समस्या व त्यावरचे उपाय शोधण्यसाठी
या दिवसाची निर्मिती करण्यात आली आहे. स्थलांतरे थांबवण्यासाठी राष्ट्राराष्ट्रांत
जनजागृती केली जाते. व स्थलांतर करून आलेल्या
नागरिकांचे हक्क व अधिकारांची अंमलबजावणी योग्य रीतीने करण्यासाठी ही संयुक्त राष्ट्रांची
विशेष संघटना प्रयत्न करते. जगातील स्थलांतरे थांबावीत सगळीकडे अन्न,वस्त्र,निवारा,रोजगार,मानवी
हक्क इ. गोष्टींची समान स्थिती असावी हे अंतिम ध्येय हा दिवस साजरा करण्याचे आहे.
इलेक्ट्रॉनचे शोधक सर जे.जे. थॉमसन यांचा जन्म.18-12-1856
सर जोसेफ जॉन थॉमसन हे इंग्लीश भौतिकशास्त्रज्ञ होते. इलेक्ट्रॉनच्या
शोधाबद्दल त्यांना 1906 साली नोबेल पारितोषिक मिळाले.
18 डिसेंबर
1856 चिथम हिल,मँचेस्टर,इंग्लंड
30 ऑगस्ट 1940
केंब्रीज,इंग्लंड
- ओवेन्स कॉलेज मँचेस्टर आताचे मँचेस्टर विद्यापीठ
- त्रिनिटी कॉलेज, केंब्रीज मधून बी.ए. मॅथेमॅटिक्स व एम.ए. मॅथेमॅटिक्स ॲडम्स पारितोषिकासह
- केंब्रीज विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक
- जे. जे. थॉमसन यांचे एक प्राध्यापक म्हणून यश म्हणजे त्यांचे सहा संशोधक सहाय्यक विद्यार्थी भौतिकशास्त्राचे नोबेल मिळवण्यात यशस्वी झाले दोन जणांनी रसायनशास्त्राचे नोबेल मिळवले तर त्यांचा मुलगा जॉर्ज पेजेट थॉमसनने भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार जिंकला.
- प्लम पुडिंग मॉडेल
- इलेक्ट्रॉनचा शोध
- आइसोटोपचा शोध
- मास स्पेक्ट्रोमीटरचा आविष्कार
- पहले मी / ई माप
- प्रस्तावित पहिला तरंग
- थॉमसन बिखर रहा है
- थॉमसन प्रोब्लेम
- 'डेल्टा रे' शब्दाचा उपयोग
- 'एप्सिलॉन विकिरण' शब्दाचा उपयोग
- थॉमसन एकक
- स्मिथ पारितोषिक
- रॉयल मेडल
- ह्युजेस मेडल
- भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक 1906
- इलियट-क्रेसन मेडल
- कोपली मेडल
- एल्बर्ट मेडल
- फ्रँकलिन मेडल
- फॅरेडे मेडल
- डाल्टन मेडल
सोविएत युनियन आजचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांचा जन्म. 18-12-1878
जोसेफ विझरोविनोविच स्टॅलिन हे सोविएत युनियचे आजचा रशियाचे अध्यक्ष व पहिल्या महायुध्दातील एक प्रमुख व्यक्तीमत्व होते. स्टॅलिन यांनी राबविलेल्या योजनांना स्टॅलिनिझम असे संबोधले जाते.
18 डिसेंबर 1878 गोरी,रशियन साम्राज्य, सध्या जॉर्जिया
05 मार्च 1953 कुंटसेवो,मॉस्को,सोविएत युनियन सध्या रशिया
कार्य
- सोविएत सैन्यात अधिकारी ते सर्वोच्च अशा जनरलिझमस पदाने गौरवान्वित
- सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष 1924 ते 1953
- सोविएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी 1922 ते 1952
- सोविएत युनियनच्या मंत्रीगटाचे प्रमुख 1941 ते 1953
- जनरलिझमस ऑफ सोविएत युनियन 1945
- दुसऱ्या महायुध्दात महत्वाची भूमिका त्या कालखंडातील जगातील एक महत्वाचे नेते
- सोविएत युनियनच्या दुसऱ्या महायुध्दातील विजयात सुपर कमांडर म्हणून सहभाग
- जर्मनीच्या पाडावात महत्वाचा सहभाग ज्यामुळेच पुढे पूर्व जर्मनी सोविएत युनियनच्या अधिपत्याखाली येऊन तेथे कम्युनिझमचा प्रसार झाला.
- पूर्व युरोप व अशियामधील राजकारणात स्टॅलिन सोविएत युनियनचा दबदबा निर्माण करण्यात स्टॅलिन यशस्वी झाले.
- हिरो ऑफ सोविएत युनियन
- ऑर्डर ऑफ द रेड बॅनर चार वेळा
- ऑर्डर ऑफ लेनिन तीन वेळा
- ऑर्डर ऑफ व्हिक्टरी दोनवेळा
- ऑर्डर ऑफ सुखबस्तार दोन वेळा
- ऑर्डर ऑफ सुवोरोव फर्स्ट क्लास
- ऑर्डर ऑफ द रेड स्टार फर्स्ट क्लास
- ऑर्डर ऑफ द व्हाइट लायन
एफ.एम रेडिओचे संशोधक ई.एच. आर्मस्ट्राँग यांचा जन्म. 18-12-1890
एडविन हावर्ड आर्मस्ट्राँग
हे अमेरिकन विद्युत अभियंते व संशोधक होते. रेडिओ अभियांत्रिकी विशेषकरून एफ.एम. रेडिओच्या
शोधासाठी आर्मस्ट्राँग यांना ओळखले जाते. आर्मस्ट्राँग यांच्या नावावर 42 पेटंट आहेत.
18 डिसेंबर
1890 चेल्सी, मॅनहॅटन,न्यूयॉर्क,अमेरिका
मृत्यू
01 फ्रेब्रुवारी 1954 मॅनहॅटन,न्यूयॉर्क, अमेरिका
कोलंबिया विद्यापीठातून
विद्युत अभियांत्रिकीमध्ये पदवी
कार्य
- सुरवातीला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कोलंबिया विद्यापीठात व नंतर संशोधन सहाय्यक म्हणून प्रा. प्युपीन यांच्याकडे त्यांनी काम केले.
- विद्युत अभियांत्रिकीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कोलंबिया विद्यापीठात 1934 पासून निवृत्तीपर्यंत काम केले.
- रिजनरेटिव्ह सर्किट-पुर्नवापरयोग्य सर्किट
- सुपरथिरोडाइन सर्किट
- सुपररिजनरेटिव्ह सर्किट
- वाइड बॅन्ड एफएम रेडिओचा शोध
- एफएम रडार
- इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ इंजिनियर्स-आयईईई कडून सन्मान 1917
- फ्रँकलिन मेडल 1941
- एडिसन मेडल 1942
क्रिकेटपटू विजय हजारे यांचे निधन. 18-12-2004
अल्पपरिचय
विजय सॅम्युएल
हजारे हे प्रसिध्द भारतीय माजी क्रिकेटपटू होते. विजय हजारे यांच्याच नेतृत्वात भारताने
पहिला कसोटी विजय साकारला. विक्रमवीर विजय हजारे हे सुनील गावसकर व सचिन तेंडुलकरांआधी
भारतीय क्रिकेटमध्ये विक्रमांसाठी ओळखले जात असत.
11 मार्च 1915
सांगली,ब्रिटीश भारत
18 डिसेंबर
2004 वडोदरा,गुजरात,भारत
कार्य
भारतासाठी अंतरराष्ट्रीय
क्रिकेट 1946 ते 1953
विजय हजारे यांनी
30 कसोटीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले त्यामध्ये त्यांनी 47.65 च्या सरासरीने सात
शतकांसहीत 2192 धावांचे योगदान दिले. ज्यामध्ये वैयक्तीक सर्वोच्च 164 धावांचा समावेश
होता. तसेच मध्यमगती गोलंदाजी करताना त्यांनी 20 बळी घेतले त्यांनी सर डॉन ब्रॅडमन
यांना तीन वेळा बाद केले. 29 धावांत चार बळी अशी त्यांची सर्वोच्च गोलंदाजी कामगिरी
राहिली.विजय हजारे यांच्या प्रथमश्रेणी सामन्यातील कामगिरी तर अजून प्रभावी आहे. प्रथमश्रेणीचे
ते 238 सामने खेळले त्यामध्ये 18740 धावा करताना त्यांनी 58.38 च्या सरासरीने साठ शतके
व 73 अर्धशतकांसहीत वैयक्तीक सर्वोच्च नाबाद 316 धावांचे योगदान दिले. व गोलंदाजीमध्ये
595 बळी घेताना 90 धावांत आठ बळी घेण्याची कामगिरी केली.
- प्रथमश्रेणी सामन्यात पहिल्यांदा दोन प्रथमश्रेणी त्रिशतके
- कसोटीच्या दोन्ही डवात शतके करणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू
- कसोटीच्या दोन्ही डावात शून्यावर बाद होणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू
- सलग तीन कसोटीत शतके ठोकणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू
- प्रथमश्रेणी सामन्यात पन्नास शतके असणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू
- कसोटीत हजार धावा पूर्ण करणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू
- पद्मश्री
- विजय हजारे यांच्या स्मरणार्थ विजय हजारे ट्रॉफी ही देशांतर्गत स्पर्धा खेळविण्यात येते.
संदर्भ व आभार
https://www.iom.int/migrantsday
संकलन,संपादन व संकल्पना
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.