16 जानेवारी 2021- छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन

 

16 जानेवारी 2021- छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन

छत्रपती संभाजीराजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक 16 जानेवारी 1681

छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन

    छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाईंचे पुत्र व हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते. छत्रपती शिवाजीराजे यांच्या मृत्यूनंतर ता. 03 एप्रिल 1680,  16 जानेवारी 1681 रोजी संभजीराजांचा राज्याभिषेक झाला. या मधल्या काळात संभाजीराजेंना अनेक स्वकीय व परकीय लोकांचा विरोध सहन करावा लागला. अखेरीस संभाजीराजे छत्रपती झाले व हिंदवी स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. राज्याभिषेकावेळी संभाजीराजांचे वय अवघे 23 वर्षांचे होते. बालपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहून त्यांनी अनेक मोहिमांत भाग घेतला व दरबारी राजकारण व मुसद्देगिरीचे धडे गिरवले.संस्कृत पंडित असणाऱ्या छत्रपती संभाजीराजांनी बुधभूषण हा ग्रंथ वयाच्या पंधराच्या वर्षी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराजांनंतर स्वराज्याचे रक्षण केले. मुघल बादशहा औरंगजेब,पोर्तुगीज व इतर सत्ताधिशांना आपल्या युध्दकौशल्याने व मुसद्देगिरीने त्यांनी  तब्बल नऊ वर्षे झुंजविेले. अखेरीस फंदफितुरी व दगाफटक्यामुळे  ते औरंगजेबाच्या हाती लागले तरीही औरंगजेबाने केलेले सर्व अत्याचार सहन करून छत्रपती संभाजीराजे डगमगले नाहीत व औरंगजेबाने दिलेला धर्मांतराचा प्रस्ताव धुडकावला ज्याचा राग येऊन औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांची क्रुर हत्या केली ता. 11 मार्च 1689. धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजीराजांनी अशारीतीने देह ठेवल्यामुळे मराठी अस्मिता जागी झाली व औरंगजेबाचे मुघल साम्राज्य पुढील काळात धुळीला मिळाले. अशा धर्मवीर कर्मवीर छत्रपती संभाजीराजेंना  त्रिवार वंदन व भावपूर्ण श्रध्दांजली.

संगीतकार ओ.पी. नय्यर यांचा जन्म. 16 जानेवारी 1926

अल्पपरिचय

ओंकार प्रसाद नय्यर तथा ओ. पी. नय्यर हे प्रसिध्‍द संगीतकार,संगीत संयोजक,गायक व गीतलेखकही होते.

जन्म

16 जानेवारी 1926 लाहोर,पंजाब,ब्रिटीश भारत सध्या पाकिस्तान

मृत्यू

26 जानेवारी 2007 मुंबई,महाराष्ट्र,भारत

कार्य

हिंदी चित्रपटसृष्टीतील तालाचे बादशहा म्हणून ओळखले जाणारे प्रसिध्द संगीतकार

ओ.पी. नय्यर यांनी आपली सगळी गाणी आशा भोसले,गीता दत्त,महम्मद रफी,महेंद्र कपूर अशा गायक व गायिकांकडून गाऊन घेतली परंतू एकही गाणे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून गाऊन घेतले नाही, ते म्हणत असत माझ्या गाण्याला लाताचा आवाज योग्य नाही. तरीही लतादिदींनी गायलेले सारी सारी रात तेरी याद सताती है 1973 च्या टॅक्सी ड्राइव्हर चित्रपटात घेतलेले गाणे 1958 च्या अ जी बस शुक्रीया चित्रपटातील होते व  टॅक्सी ड्राइव्हर ह्या  चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक ओ.पी. नय्यर होते.

प्रसिध्द चित्रपट-संगीत

  • आसमान
  • बाझ
  • आर पार
  • मिस्टर अँड मिसेस 55
  • सीआयडी
  • नया दौर
  • तुमसा नही देखा
  • मुजरीम
  • कश्मीर की कली

प्रसिध्द गाणी

  • ये देश है वीर जवानोंका......
  • ऐ दिल है मुश्कील जीना यहॅां.......
  • जाने कहाँ मेरा जीगर गया जी.....
  • आप के हसीन रूख.......
  • बहारें फिर भी आएंगी......
  • कजरा मोहब्बतवाला.....

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार- नया दौर-सर्वोकृष्ट संगीत दिग्दर्शक

बंगाली साहित्यिक शरदचंद्र चटोपाध्याय यांचे निधन. 16 जानेवारी 1938

अल्पपरिचय

    शरदचंद्र चटोपाध्याय हे प्रसिध्द बंगाली साहित्यिक होते. त्यांच्या पथेर दाबी या कादंबरीतील विचारांनी ब्रिटीशामध्येही खळबळ माजली होती. शरदचंद्र चटोपाध्याय यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या इमारतीचे तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन. 16 जानेवारी 1955

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी-पुणे

    राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तथा एनडीए ही राष्ट्रीय स्तरावरील‍ सैन्य अधिकारी प्रशिक्षण संस्था आहे. तिन्ही सैन्यदले अर्थात भूसेना,वायुसेना व नौसेना या तीनही सैन्यदलांचे प्रशिक्षण देण्याची सोय या प्रबोधिनीत आहे. दुसऱ्या महायुध्दात तीनही सेनांमध्ये समन्वय ठेवावा लागतो ही गरज प्रकर्षाने जाणवली व म्हणूनच अशी एखादी प्रशिक्षणसंस्था असावी जी तीनही सैन्यदलांचे प्रशिक्षण एकत्र देईल या उद्देशाने या प्रबोधिनीचे भूमीपूजन पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहस्ते 06 ऑक्टोबर  1949 रोजी करण्यात आले. डिसेंबर 1954 ला वास्तूचे काम संपले व 16 जानेवारी 1955 रोजी तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याहस्ते या इमारतीचे उद्धाटन करण्यात आले. डब्लू. एक्स. मस्कारेन्हास यांनी वास्तूचे स्थापत्यकाम केले आहे. या प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे वर्षातून दोन वेळा परिक्षा घेण्यात येते.

अध्यात्मिक गुरू साधू वासवानी यांचे निधन. 16 जानेवारी 1966

अल्पपरिचय

    थांवरदास लीलाराम वासवानी तथा साधू वासवानी हे प्रसिध्द अध्यात्मिक गुरू व शिक्षणतज्ञ होते. साधू वासवानी मिशनचे ते प्रमुख होते. साधू वासवानी यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

आजचे पुरस्कार

ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी पुण्याचे शिल्पकार दिनकर थोपटे यांची निवड 16 जानेवारी 1996

उर्दु भाषेतील एक प्रसिध्द लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर 16 जानेवारी 1998


संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://vishwakosh.marathi.gov.in/


संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

बालदिन दिनविशेष 14-11-2020

आजची दिनविशेष प्रस्तावना 31-10-2020