30 नोव्हेंबर 2021-30 November

 30 नोव्हेंबर 2021-30 November

सुप्रसिध्द  मराठी कवी बा. भ. बोरकर यांचा जन्म. 30 नोव्हेंबर 1910

अल्पपरिचय

    बाळकृष्ण भगवंत  तथा बा. भ. बोरकर हे मराठी व कोकणी भाषेतील प्रसिध्द कवीपैकी एक होते. कवितेसोबतच त्यांनी नाटक, अनुवाद, कादंबरी, कथा, चरित्र, ललित यांमध्येही मराठी तसेच कोकणी भाषेत विपुल साहित्यनिर्मिती केली. बाकीबाब या टोपणनावाने त्यांना ओळखले जाते. बा. भ.बोरकर यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.

बार्बाडोसला युनायटेड किंग्डम कडून स्वातंत्र्य. 30 नोव्हेंबर 1966

बार्बाडोस

    बार्बाडोस हा कॅरेबियन व्दीपसमूहातील एक देश असून बार्बाडोसला 30 नोव्हेंबर 1966 रोजी युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले. 30 नोव्हेंबर 2021 रोजी हा देश प्रजासत्ताक बनला.

देश: रिपब्लिक ऑफ बार्बाडोस

राजधानी: ब्रिजटाऊन

राष्ट्रभाषा: इंग्लीश व बजन केरोल

चलन: बार्बाडियन डॉलर

सीमा: बार्बाडोसच्या सीमा पूर्वेस विंडवेड लेसर अंतीलिसचा भाग, सेंट लुसिया, सेंट व्हिनसेंट व ग्रनेड्स तसेच दक्षिणपूर्व मार्टीनेक तसेच उत्तर पूर्वेस त्रिनिदाद v टोबॅको ला मिळतातं.

अर्थव्यवस्था: शेती,उद्योग,पर्यटन व बांध व्यवसाय यावर आधारित.

भारताचे माजी पंतप्रधान व स्वातंत्र्यसैनिक इंद्रकुमार गुजराल यांचे निधन. 30 नोव्हेंबर 2012

अल्पपरिचय

    इंद्रकुमार गुजराल हे भारताचे बारावे पंतप्रधान तसेच माजी अर्थ तसेच परराष्ट्रमंत्री होते. 1942 च्या चले जाव चळवळीतही त्यांचा सक्रीय सहभाग होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात विविध अंदोलनात सहभाग असल्याने त्यांना कारावासही भोगावा लागला. इंद्रकुमार गुजराल यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://en.wikipedia.org/


संकल्पना, संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020