30-11 दिनविशेष नोव्हेंबर 2020
30-11 दिनविशेष नोव्हेंबर 2020
भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदिशचंद्र बोस यांचा जन्म. 30-11-1858
जगदिशचंद्र बोस हे भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ होते. वनस्पतींनाही संवेदना
असतात हे त्यांनी सिध्द केले. त्यांनी वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत
संशोधन केले. यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
कवीवर्य बा.भ. बोरकर यांचा जन्म.30-11-1910
बाळकृष्ण भगवंत बोरकर तथा बाकीबाब
बोरकर हे मराठी तसेच कोकणी भाषेतील एक नामवंत कवी,लेखक तसेच अनुवादक होते.
जन्म
30-11-1910 बोरीम गोवा
08-07-1984 पुणे
मराठी व कोकणी भाषेतील नामवंत कवी,लेखक
सुरवातीला शिक्षक म्हणून कार्य
गोवा व पुणे आकाशवाणी केंद्रावर संचालक
- अनुरागिणी
- आनंदभैरवी
- कांचनसंध्या
- गितार
- चित्रवीणा
- चिन्मयी
- चैत्रपुनव
- जीवनसंगीत
- दूधसागर
- प्रतिभा
- कागदी होड्या
- मावळता चंद्र
- अंधारातील वाट
- जळते रहस्य
- भावीण
- बापूजींची ओझरती दर्शने
- आम्ही पाहिलेले गांधीजी
- काचेची किमया
- गीता-प्रवचनां
- संशयकल्लोळ
- बोरकरांची कविता
- प्रियदर्शनी
- माझी जीवनयात्रा
- गीताय
- पांयजणां
- आनंदयात्री रवींद्रनाथ : संस्कार आणि साधना
- चांदणवेल (बोरकरांच्या निवडक मराठी कविता)
- वासवदत्ता : एक प्रणयनाट्य
- संशयकल्लोळ (मूळ
ले. मोलियर, मराठी रूपांतर : गो. ब. देवल )
- पैगंबर (ले. खलील जिब्रान)
- मेघदूत
- सासाय
- बामण आनी अभिसार
- चांदण्याचे कवडसे
- समुद्राकाठची रात्र
- पावलापुरता प्रकाश
- प्रियकामा
- भगवान बुद्ध (ले. धर्मानंद कोसंबी)
- अनुवाद ६
- कथासंग्रह २
- कादंबऱ्या ४ ('मावळता चंद्र','अंधारातली वाट', 'भावीण','प्रियकामा')
- कोंकणी साहित्यकृती १०
- चरित्रात्मक प्रबंध २
- ललितलेख संग्रह ४
- बा.भ. बोरकर यांच्या सन्मानार्थ बाकीबाब प्रतिष्ठानाची निर्मिती करण्यात आली आहे.
भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे निधन.30-11-2012
इंद्रकुमार गुजराल हे भारताचे माजी पंतप्रधान होते. गुजराल यांनी भारतीय
स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेऊन 1942 च्या चले जाव चळवळीत सक्रीय सहभाग घेत तुरूंगवास
भोगला.
जन्म
04-12-1919 झेलम,ब्रिटीश भारत आताचे पंजाब,पाकिस्तान
30-11-2012 गुडगांव, हरियाणा,भारत
कार्य
- भारताचे रशियन राजदूत कार्यकाळ- 1976-1980
- भारतीय परराष्ट्रमंत्री कार्यकाळ-05 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990 व 01 जून 1996 ते 19 मार्च 1998
- जालंधर मधून लोकसभा खासदार कार्यकाळ- 1998-1999
- राज्यसाभेचे नेते कार्यकाळ-जून 1996 ते नोव्हेंबर 1996,एप्रिल 1997 ते मार्च 1998
- भारताचे अर्थमंत्री कार्यकाळ-21
एप्रिल 1997 ते 01 मे 1997
- भारताचे 12 वे पंतप्रधान कार्यकाळ- 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998
पुस्तक
गुजराल यांनी आत्मचरित्र लिहिले असून पुस्तकाचे नाव I. K. Gujral:
Matters of Discretion: An Autobiography असे आहे.
आजचे पुरस्कार
महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार पहिला ’महाराष्ट्र भूषण पुरस्कार’
ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना प्रदान. 30-11-1996
संदर्भ व आभार
संकल्पना,संपादन व संकलन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.