15 ऑक्टोबर 2021- 15 October

15 ऑक्टोबर 2021- 15 October

शिर्डी येथील थोर संत साईबाबा यांनी समाधी घेतली. 15 ऑक्टोबर 1918

अल्पपरिचय

संत साईबाबा हे महाराष्ट्रातील शिर्डी येथील महान संत होते. मानवता, समानता, भूतदया, सहह्रद्यता यांची शिकवण साईबाबांनी लोकांना दिली. सर्वजण एकाच ईश्वराची लेकरे आहेत त्यामुळेच ते कायम सांगायचे की सबका मालिक एक. ईश्वरावर श्रध्दा व संयम ठेवल्यास कोणतेच कार्य अपूर्ण राहणार नाही असेही साईबाबांनी लोकांना सांगितले. आज साईबाबांचे केवळ शिर्डीतच नव्हे तर संपूर्ण जगभरात भक्तगण असून शिर्डी हे महाराष्ट्रातील महत्वाचे तिर्थश्रेत्र आहे. साई बाबांविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.

भारताच्या क्षेपणास्त्र विकास  कार्यक्रमाचे जनक डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. 15 ऑक्टोबर 1931

अल्पपरिचय

    डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम हे प्रसिध्द भारतीय शास्त्रज्ञ, भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक व भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. डॉ. कलाम यांनी भारताला क्षेपणास्त्र विकास व तंत्रज्ञानात  स्वयंपूर्ण केले, भारताने केलेल्या क्षेपणास्त्र विकासात असलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळे डॉकलाम हे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. 2002 ते 2007 या कालावधीत  त्यांनी देशाचे अकरावे राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली. राष्ट्रपती पदासोबतच अंतराळ विज्ञान, क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम, भारताला संरक्षण सिध्दता प्रदान करण्यात महत्वपूर्ण सहभाग आशी त्यांनी केलेली अन्य महत्वपूर्ण कार्ये आहेत. डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.

भारतात जेआरडी टाटा यांच्याकडून नागरी विमान वाहतुकीची सुरूवात. 15 ऑक्टोबर 1932

अल्पपरिचय

    टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जेआरडी टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्स या कंपनीव्दारे नागरी विमान वाहतुकीची भारतात पहिल्यांदा सुरूवात केली. कराची ते मुंबई हा विमानप्रवास त्यांनी स्वत: विमान संचालन करून 15 ऑक्टोबर 1932 साली घडवून आणला व याची सुरूवात झाली. स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर 1948 ला  या टाटा एअरलाईन्सचे एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीत रूपांतर करण्यात आले. आज एअर इंडियावर असलेल्या प्रचंड कर्जामुळे सरकारकडून  याची मालकी पुन्हा टाटा उद्योगसमूहाने मिळविली आहे, याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या.

हिंदी साहित्यिक सुर्यकांत त्रिपाठी यांचे निधन. 15 ऑक्टोबर 1961

अल्पपरिचय

    सुर्यकांत त्रिपाठी तथा निराला हे प्रसिध्द हिंदी कवी, लेखक व साहित्यिक होते. अनामिका, अनामिका व्दितीय,आराधना या काव्यसंग्रहाबरोबरच त्यांच्या अलका, प्रभावती, निरूपमा अशा अनेक कादंबऱ्याही प्रसिध्द आहेत. सरोजस्मृती हे अनामिका व्दितीय या काव्यसंग्रहातील शोकगीत प्रसिध्द आहे. सुर्यकांत त्रिपाठी यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.

आजचे पुरस्कार

  • आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार. 15 ऑक्टोबर 1984
  • हेन्री किसिंजर व ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार. 15 ऑक्टोबर 1973
  • नेल्सन मंडेला व एफ. डब्लू. डी. क्लर्क हे वर्णभेदाविरूध्दच्या केलेल्या कार्यासाठी शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानीत. 15 ऑक्टोबर 1993
  • प्रसिध्द भारतीय लेखिका अरूंधती रॉय यांना बुकर पुरस्कार. 15 ऑक्टोबर 1997
  • जागतिक फ्रेड डेव्हिस पुरस्कार गीत सेठी यांना प्रदान. 15 ऑक्टोबर 1999

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

http://www.airindia.in/

https://sai.org.in/

https://www.nobelprize.org/

संकल्पना, संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

ऑक्टोबर 18 2020-October 18 2020