06 ऑगस्ट 2021-06 August
06 ऑगस्ट 2021-06 August
नोबेलविजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा
जन्म.
06 ऑगस्ट 1881
अल्पपरिचय
अलेक्झांडर फ्लेमिंग हे स्कॉटिश शास्त्रज्ञ होते. पेनिसिलीनचा शोध त्यांनी लावला. 1945 साली पेनिसिलीनच्या
प्रतिजैवक म्हणून वैद्यकशास्त्रातील वापराबद्दल फ्लेमिंग यांना वैद्यकशास्त्राचे नोबेल
पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. फ्लेमिंग यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी
येथे भेट द्या.
प्रसिध्द लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म. 06 ऑगस्ट 1925
अल्पपरिचय
सुप्रसिध्द मराठी लेखिका व गायिका योगिनी जोगळेकर यांची आज जयंती.
या सम हा ही भास्करबुवा बखले यांच्यावरील व राम प्रहार ही राम मराठे
यांच्या वरील कादंबरी खूपच प्रसिध्द झाली. योगिनी जोगळेकर यांच्याविषयी
अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.
अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर अणूबॉम्ब टाकला. 06 ऑगस्ट 1945
हिरोशिमा अणूबाँम्ब हल्ला
06 ऑगस्ट 1945 हा तोच काळा दिवस आहे
जेव्हा दुसऱ्या महायुध्दात जपानच्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेने आपला पहिला अणूबाँब
लिटिल बॉय ॲनोला गे बी-29 विमानातून टाकला, ज्यामुळे सुमारे आडीच लाख लोकसंख्येचे हिरोशिमा शहर पूर्णपणे नष्ट झाले,
हिरोशिमा शहरात जिथे हा बाँम्ब पडला होता तेथील एक मैल परिघातील मानवी
जीवन पूर्णपणे नष्ट झाले, बॉम्ब पडल्यावर किरणोत्सर्गामुळे आकाशात
लालसर प्रकाश दिसला भूकंपासारख्या धक्क्याने सारे शहर हादरले, इमारती कोसळल्या,माणूस,प्राणी,पक्षी,वनस्पती काहीही शिल्लक राहिले नाही. सुमारे नव्वद हजार लोक तत्काळ मृत्यू पावले तर जे जखमी होते त्यातीलही असंख्य
जण नंतर मरण पावले.
हल्ल्याची पार्श्वभूमी
दुसऱ्या महायुध्दाच्या धामधुमीत अमेरिका तटस्थ होती व मॅनहॅटन
प्रोजेक्टव्दारे अणूशक्तीवर संशोधन चालू होते. जपानने पर्ल हार्बर या
अमेरिकेच्या नाविक तळावर हल्ला करून हा तळ उध्वस्त केला ज्यामुळे अमेरिका दुसऱ्या महायुध्दात
दोस्त राष्ट्रांच्या बाजूने उतरली. हिटलरने आत्महत्या केल्यावर
जर्मनी या युध्दातून बाहेर पडले, इटलीनेही नंतर माघार घेतली पण
पूर्व आशियात जपान अजूनही मागे हटलेला नव्हता त्यामुळे युध्द समाप्तीसाठी अमेरिकेने
प्रयत्न करायला चालू केले, जपानला युध्दमाघारीसाठी मनवण्यास चालू
केले पण जपानने अमेरिकेचे न ऐकता आपले साम्राज्यविस्तार धोरण पुढे चालू ठेवले.
शेवटी 06 ऑगस्ट 1945 रोजी
आठ वाजून पंधरा मिनिटांनी कॅप्टन टिबेट्स संचलित ॲनोला गे बी-29 विमानातून लिटिल बॉय हा अणूबाँब हिरोशिमा शहरावर टाकण्यात आला.
असामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचे निधन. 06 ऑगस्ट 1997
अल्पपरिचय
वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य हे प्रसिध्द असामी साहित्यिक व
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक होते.
जन्म
14 ऑक्टोबर 1924
मृत्यू
06 ऑगस्ट 1997
कार्य
प्रसिध्द असामी लेखक
रामधेनू या प्रसिध्द असामी मासिकाचे संपादक
असाम साहित्य सभेचे अध्यक्ष कार्यकाळ 1983 ते 1985
साहित्य
- राजपते रिंगिअय
- आई
- यारूइंगम
- सतघनी
- मृत्युंजय
- रंग मेघ
- प्रतिपाद
- बिल्लारी
- दैनी
पुरस्कार
ज्ञानपीठ पुरस्कार-मृत्युंजय कादंबरीसाठी
साहित्य अकादमी पुरस्कार-यारूइंगम कादंबरी
साठी
संदर्भ व आभार
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.