दिन - विशेष – din - vishesh दि. 01-11-2020
दिन - विशेष – din - vishesh दि. 01-11-2020
01-11-1845 ग्रँट मेडिकल कॉलेज हे भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय भायखळा मुंबई येथे सुरू झाले.
1935 साली सर रॉबर्ट ग्रँट या बॉम्बे च्या तत्कालीन गर्व्हनरनी
बाँम्बे साठी वैद्यकीय महाविद्यालय असावे असा प्रस्ताव मांडला व 30 मार्च 1843 रोजी
या कॉलेजचे भूमीपूजन झाले, 01 नोव्हेंबर 1845 रोजी हे महाविद्यालय आठ विद्यार्थ्यांच्या
पहिल्या तुकडीबरोबर सुरू झाले, तेव्हापासून सुमारे 175 वर्षे हे कॉलेज महाराष्ट्रातील
वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिक्षणदान करीत असून अनेक आजी माजी डॉक्टर व विविध क्षेत्रातील
मान्यवर या महाविद्यालयाव्दारे घडलेले आहेत. सर जमशेदजी जिजिभॉय यांनी जे. हॉस्पीटलशी
हे महाविद्यालय नंतर विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने संलग्न
केले.
- 1896 मध्ये डॉ. हाफकिन यांनी प्लेग या लसीवर सध्याच्या फॉर्माकोलॉजी लेक्चर हॉल या इमारतीत संशोधन केले. इथूनच हाफकिन इन्स्टिटयूटची सुरवात झाली.
- रिटा फारिया - मिस वर्ल्ड 1966 आणि अदिती गोवित्रीकर मिसेस वर्ल्ड 2001 या कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
- पहिले तीन भारतीय एव्हरेस्टवीर हे कॉलेजचे विद्यार्थ्यी आहेत त्यात पहिले डॉ. ननावटी,दुसरे डॉ. रसीक बाळ, तिसरे डॉ. लाल तेलंद यांचे नेतृत्व एडमंड हिलरी व तेनसिंग शेर्पा यांनी केले.
01-11-1956 भारतात भाषावार प्रांतरचना करण्यात आली.
1953 साली नेमलेल्या
फजल अली कमीशन अर्थात राज्य पुनर्रचना आयोगाव्दारे भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आणली
गेली व भाषावार प्रांतरचना करण्यात आली पुढे 1956 साली 7 वी घटनादुरूस्ती करून 01 नोव्हेंबर
1956 पासून या आयोगाच्या अहवालातील 16 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशाच्या ऐवजी सरकारने
14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेश तयार केले.ते असे होते.
- बॉम्बे
- म्हैसूर
- आसाम
- बिहार
- जम्मू आणि काश्मीर
- केरळ
- मध्यप्रदेश
- मद्रास
- उडीसा
- पंजाब
- राजस्थान
- उत्तरप्रदेश
- पश्चिम बंगाल
- दिल्ली
- हिमाचल प्रदेश
- मणिपूर
- त्रिपूरा
- अंदमान व निकोबार
- लक्ष्वदीप बेटे
याप्रमाणे बॉम्बे
अर्थात मुंबई हे राज्य अस्तित्वात आले व यशवंतराव चव्हाण हे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री
झाले याच मुंबई राज्याला पुढे विदर्भ व मराठवाडा जोडण्यात आला व महाराष्ट्र हे राज्य
01 मे 1960 पासून अस्तित्वात आले. या भाषीय प्रांतरचनेमध्ये काही वादही निर्माण झाले.
ते म्हणजे बेळगाव, कारवार, बिदर भालकीसह मराठी भाषक प्रदेश कर्नाटकला जोडण्यात आला
व या भागातील मूळ मराठीभाषिक जनतेवर अन्याय करण्यात आला याचाच निषेध म्हणून सीमावासीय
हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. याप्रामाणेच हा दिवस कर्नाटक,आंध प्रदेश व हरयाणा
या राज्यांचा स्थापना दिवस आहे.
01-11-1973 अभिनेत्री
ऐश्वर्या राय हिचा जन्म.
ऐश्वर्या राय-बच्चन
ही भारतीय चित्रपट अभिनेत्री असून ती 1994
सालची मिस वर्ल्ड पुरस्कारविजेती आहे. पूर्वीची
पेप्सीको या व अशा अनेक ब्रँडची आघाडीची मॉडेल राहिलेली आहे.हम दिल दे चुके सनम, मोहब्बतें,देवदास,गुरू,
उमराव जान असे तिचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत.
01-11-1973 मेंगलोर
कर्नाटक
- कॅम्लीन,पेप्सीको अशा अनेक ब्रँडची आघाडीची मॉडेल
- 1994 मधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेत मिस इंडिया वर्ल्ड या किताबासहीत उपविजेती तसेच 1994 च्याच मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेती
- मिस वर्ल्ड बनल्यानंतर चित्रपटसृष्टीत हिंदी,तेलगू,तमीळ,बंगाली व इंग्रजी अशा अनेक भाषांमधून आघाडीची अभिनेत्री म्हणून कार्य
- इरूवर-तमीळ-ऐश्वर्याचा पहिला चित्रपट
- और प्यार हो गया-पहिला हिंदी चित्रपट
- हम दिल दे चुके सनम
- मोहब्बतें
- देवदास
- ताल
- धुम 2
- गुरू
- जोधा अकबर
- चोखेर बाली-बंगाली
- ब्राइड अँड प्रेज्युडाइस-इंग्रजी
- जज्बा
- ऐ दिल है मुश्कील
- प्रोव्होक्ड-इंग्रजी
- रोबोट-तमीळ व हिंदी
- पद्मश्री-2009
- फ्रान्सचा सांस्कृतिक पुरस्कार-Ordre des Arts et des Lettres 2012
- फिल्मफेअर पुरस्कार सर्वोकृष्ट अभिनेत्री हम दिल दे चुके सनम 2000 व देवदास 2003
यासोबतच झी सिने
ॲवॉर्ड, आयफा ॲवॉर्ड,असे अनेक पुरस्कार ऐश्वर्याला मिळालेले आहेत.
ऐश्वर्या कान्स फिल्म
फेस्टिवल मध्ये परिक्षक म्हणून जाणारी पहिली भारतीय अभिनेत्री आहे.
ऐश्वर्याला Most
Beautiful International Titleholder of All Times Gold
medal winner व
Most Beautiful Miss World of All Times -received a perfect
score of 9.911 हे
दोन सन्मानही 2000 साली मिळालेले आहेत.
01-11-1974 भारतीय क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मण याचा जन्म..
वांगिपुरप्पू वेंकट साई लक्ष्मण ऊर्फ व्ही.व्ही.एस. लक्ष्मण
हा भारताचा माजी क्रिकेटपटू असून
व्हेरी व्हेरी स्पेशल या टोपणनावाने ओळखला जातो. 2001 च्या ऑस्ट्रेलियाविरूध्द कलकत्ता
कसोटीतील भारताच्या फॉलोऑननंतरची लक्ष्मणची 281 धावांची खेळी भारतीय क्रिकेटला संजीवनी
देऊन गेली.
01-11-1974 हैदराबाद
आंध्र प्रदेश
- भारतासाठी क्रिकेट 1996 ते 2012
व्ही.व्ही.एस लक्ष्मणने
भारतासाठी क्रिकेटमध्ये कसोटी व एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केले. कसोटीमध्ये त्याने
134 सामन्यात 45.97 च्या सरासरीने 8781 धावा केल्या असून त्यात 281 या वैयक्तीक सर्वोच्च
धावसंख्येसहीत 17 शतके व 56 अर्धशतकांचा समावेश
आहे. 86 एकदिवसीय सामन्यात 30.76 च्या सरासरीने 131 या वैयक्तीक सर्वोच्च धावसंख्येसहीत
06 शतके व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो आयपीएल ही लीग सुध्दा खेळला असून त्यामधील
टी-20 मध्ये 25 सामन्यात 3 अर्धशतकांसहीत नाबाद 78 या सर्वोच्च धावसंख्येसहीत 491 धावांचे
योगदान दिले आहे.
स्पर्धात्मक क्रिकेटव्यतरिक्त
लक्ष्मण हा क्रिकेट समालोचन व सनरायझर्स हैदराबाद या संघाचा मेंटॉर म्हणूनही काम करतो.
01-11-2005 लेखिका योगिनी जोगळेकर यांचे निधन.
याेगिनी जोगळेकर
ह्या प्रसिध्द मारठी लेखिका व गायिका होत्या. त्यांची या सम हा ही भास्करबुवा बखले
यांच्यावरील तसेच राम प्रहार ही राम मराठे यांच्यावरील कादंबरी विशेष गाजली.
06-08-1925 पुणे
ब्रिटीश इंडिया
01-11-2005 पुणे
महाराष्ट्र
- बी.ए.
- शास्त्रीय संगीताचे शिक्षण शंकरबुवा अष्टेकर,राम मराठे व संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलांब्रीकर यांच्याकडूनही त्यांनी घेतले.
योगिनी जोगळेकर यांनी
सुमारे 116 विविध पुस्तकांचे लेखन केलेले असून त्यात 45 कादंबऱ्या,4 कवितासंग्रह,4
नाटके व 12 कुमार वाङमयाची पुस्तके यांचा समावेश आहे.
- निरागस
- शिलांगण
- कुणासाठी कुणीतरी
- जाग
- चैतन्या
- साक्षात्कार
- उमाळा
- चिमखडे अर्थात बडबड गीते
- उपहार
- स्वाहा
- नादब्रह्म
- पायगुण
- आस्वाद
- दहीहंडी
- शर्यत
- श्रीगणेशा
- नवी वाट
- बापले
- अश्वत्थ
- चारूची आई
दिन - विशेष – din - vishesh आजचे जाहीर झालेले पुरस्कार व सन्मान
- 01-11-1994 चित्रभूषण पुरस्कार-निर्माते,दिग्दर्शक तसेच लेखक दिनकर द. पाटील यांना जाहीर.
- 01-11-1999 मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार - कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.
दिन - विशेष – din - vishesh संदर्भ व आभार
https://www.aishwaryaworld.com/
संकल्पना,संकलन
व संपादन
भालचंद्र
माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.