28 July 2021- 28 जुलै
28 July 2021- 28 जुलै
वेस्ट इंडिजचे प्रसिध्द क्रिकेटपटू, कर्णधार सर गॅरी सोबर्स यांचा जन्म. 28 जुलै
1936
अल्पपरिचय
सर गारफिल्ड सोबर्स तथा गॅरी सोबर्स हे वेस्ट इंडिजचे प्रसिध्द
अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत. सार्वकालिक सर्वोत्तम अष्टपैलू क्रिेकेट
खेळाडू म्हणून त्यांना संबोधले जाते.
जन्म
28 जुलै 1936 चेल्सी रोड,बे लँड,सेंट मायकेल,बार्बाडोस
कार्य
प्रसिध्द अष्टपैलू क्रिकेटपटू
डाव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी
करणारे सोबर्स हे क्रिकेटमधील सार्वकालिक सर्वोत्तम अष्टपैलू मध्ये समावेश असणारे प्रसिध्द
क्रिकेटपटू आहेत. वेस्ट इंडिजचे त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये
प्रभावीपणे नेतृत्वही केले आहे.
गॅरी सोबर्स यांनी वेस्ट इंडिजकडून 1954 ते 1974 असे क्रिकेट खेळताना कसोटी सामन्यामध्ये वेस्ट
इंडिजचे प्रतिनिधित्व केले ज्यामध्ये 93 सामने खेळताना त्यांनी
30 अर्धशतके,26 शतके व दोन व्दिशतकासहीत
57.78 च्या कारर्किदीतील सर्वोत्तम सरासरीने 8032 धावांचे योगदान दिले ज्यामध्ये त्यांची सर्वाधिक वैयक्तीक धावसंख्या होती
365 हा वैयक्तीक धावसंख्येचा विक्रम नंतर बऱ्याच वर्षांनी मोडला गेला.
गोलंदाजीत त्यांनी 93 सामन्यात 34.04 च्या सरासरीने 235 बळी घेतले ज्यामध्ये 80 धावांत 8 बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती पाच
किंवा पाचपेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी त्यांनी सहावेळा केली.
सन्मान
1975 साली सोबर्स यांना इंग्लंडच्या प्रसिध्द नाइट पुरस्काराने
गौरविण्यात आले.
बार्बाडोस सरकारने सोबर्स यांना नॅशनल हिरो ऑफ बार्बाडोस
ही सन्माननीय पदवी दिली.
विस्डेन मासिकाने शताकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूमध्ये
गॅरी सोबर्स यांचा 2000 साली समावेश केला.
जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान यांचे निधन. 28 जुलै 1968
अल्पपरिचय
ऑटो हान हे जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते. विभक्त रसायनशास्त्राचे जनक असणारे हान यांना विभक्त विखंडन या शोधासाठी
1944 साली नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. ऑटो
हान यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.
प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक राजा ठाकूर यांचे निधन. 28 जुलै 1975
अल्पपरिचय
राजाराम दत्तात्रय ठाकूर तथा राजा ठाकूर हे प्रसिध्द भारतीय
चित्रपट दिग्दर्शक होते. मुख्यत्वेकरून मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक
म्हणून कार्य करणाऱ्या ठाकूर यांचे मी तुळस तुझ्या अंगणी,एकटी,मुंबईचा जावई,घरकूल असे अनेक चित्रपट प्रचंड गाजले.
जन्म
26 नोव्हेंबर 1923 फोंडा,ब्रिटीश भारत
मृत्यू
28 जुलै 1975 पुणे, महाराष्ट्र, भारत
कार्य
प्रसिध्द मराठी चित्रपट दिग्दर्शक
राजा ठाकूर यांनी आपल्या चित्रपट कारर्किदीची सुरूवात राजा
परांजपे व मास्टर विनायक यांच्याकडे सहाय्यक म्हणून केली.
प्रसिध्द चित्रपट-दिग्दर्शन
- बोलविता धनी
- मी तुळस तुझ्या अंगणी
- संत गोरा कुंभार
- एकटी
- मुंबईचा जावई
- घरकूल
- अजब तुझे सरकार
- जावई विकत घेणे आहे
- जख्मी-हिंदी
- बिरबल माय ब्रदर-इंग्लीश
पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्तम चित्रपट-मराठी-मी तुळस तुझ्या अंगणी,रंगल्या
रात्री आशा,एकटी या चित्रपटांसाठी
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सर्वोत्तम चित्रपट-मुंबईचा जावई,घरकूल,जावई विकत घेणे
आहे या चित्रपटांसाठी
चौधरी चरणसिंग यांनी
भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून पदभार हाती घेतला. 28
जुलै 1979
चौधरी चरणसिंग
28 जुलै 1979 रोजी चौधरी चरण सिंग यांनी भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून पदभार हाती घेतला. लोकदल पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या चौधरी चरणसिंग यांनी 1975 च्या राष्ट्रीय आणीबाणीनंतरच्या निवडणूकीत काँग्रेसविरोधी भूमिका घेत जनता दलाच्या स्थापनेत महत्वपूर्ण भूमिका निभावली. जनता दलाच्या सरकारमध्ये लोकदल हा त्यांचा पक्ष एक प्रमुख घटकपक्ष होता त्यामुळे त्यांना देशाचे पाचवे पंतप्रधान म्हणून संधी मिळाली व ते 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 पर्यंत भारताच्या पंतप्रधानपदी राहिले. चौधरी चरण सिंग यांच्याविषयी अधिक माहितीकरता येथे भेट द्या.
आजचे पुरस्कार
प्रतिष्ठेच्या पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कारासाठी डॉ. वर्गीस कुरीयन यांची निवड 28 जुलै 1999
साहित्यक्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार लेखिका
इंदिरा गोस्वामी यांना जाहीर. 28 जुलै 2001
संदर्भ व आभार
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.