07-12-2020 अंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन दिन विशेष-इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन डे स्पेशल
07-12-2020 अंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन दिन विशेष-इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन डे स्पेशल
07-12-2020 अंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन दिवस-इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन डे
अंतरराष्ट्रीय
नागरी उड्डाण दिवस अर्थात इंटरनॅशनल सिव्हिल
एव्हिएशन डे हा दरवर्षी 07 डिसेंबरला साजरा केला जातो. अंतराष्ट्रीय नागरी उड्डयन दिवस
हा जागतिक पातळीवर नागरी उड्डाण याविषयी जागरूकता तसेच याचे महत्व विशद करण्यासाठी
साजरा केला जातो. कारण जगातिक देशांच्या सामाजिक
व आर्थिक प्रगती करीता नागरी उड्डाण अर्थात विमान प्रवासी वाहतुक ही महत्वाची आहे.
विमानांव्दारे दरवर्षी चार अब्जाहून अधिक प्रवाशांची वाहतूक जागतिक स्तरावर केली जाते
त्यामुळे जगातील सर्व देशांच्या प्रगती व उन्नतीमध्ये नागरी विमान वाहतुकीचे अनन्यसाधारण
महत्व आहे, गेल्यावर्षी 75 वर्षे पूर्ण केलेल्या अंतरराष्ट्रीय नागरी उड्डायन संस्थेला
याचे श्रेय जाते. या दिवसाची थीम म्हणून अंतराष्ट्रीय नागरी उड्डयन संस्थेने पूर्ण
पाचवर्षासाठी एक थीम याप्रमाणे साल 2023 पर्यंत
ग्लोबल एव्हिएशन डेव्हलपमेंट फॉर अॅडव्हान्सिंग इनोव्हेशन अशी थीम जाहिर केली आहे.
07-12-1902 भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टीरक्षक जे.जी. नवले यांचा जन्म.
जनार्दन ग्यानोबा
नवले तथा जे. जी. नवले हे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टीरक्षक होते.
1932 मधील पहिल्या कसोटीत ते सलामीवीर तसेच यष्टीरक्षक म्हणून खेळलेले होते.
07-12-1902 फुलगाव,महाराष्ट्र
आधीचा ब्रिटीश भारत
07-09-1979 पुणे,महाराष्ट्र,भारत
भारतासाठी अंतराष्ट्रीय
क्रिकेट 1932 ते 1933 व प्रथमश्रेणीचे 65 सामने
जनार्दन नवलेंनी
भारताचे 1932 व 1933 साली दोन कसोटीत प्रतिनिधित्व केले. त्यातील पहिली कसोटी ही भारताने
खेळलेली पहिली कसोटी होती. त्यामध्ये त्यांनी डावाची सुरवात देखील केली होती. संघात
ते यष्टीरक्षक फलंदाज होते. या दोन कसोटीत त्यांना 42 धावा करता आल्या तर त्यांनी यष्टीरक्षणात
इंग्लंडचा तत्कालीन कर्णधार डग्लस जॉर्डिनला 79 धावांवर बाद केले. आपल्या प्रथमश्रेणी
कारर्किदीत ते 65 सामने खेळले व त्यामध्ये 19.18 च्या सरासरीने 1976 धावा जमवल्या ज्यामध्ये
त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती 96 धावा
यामध्ये 9 अर्धशतकांचा समावेश होता. यष्टीरक्षणात त्यांनी 100 झेल घेतले तर 36 यष्टीचित
केले.
07-12-1941 जपानने पर्ल हर्बरवर हल्ला केला.
दुसऱ्या महायुध्दात
जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या हवाई बेटांवरील नाविक तळांवर 07 डिसेंबर 1941 साली
हल्ला केला. या हल्ल्यात त्यांनी 353 जपानी लढाऊ विमाने,बाँब आणि टॉर्पेडो विमाने यांचा
वापर केला. या हल्ल्यात अमेरिकेचे 2402 सैनिक तसेच इतर लोक व अमेरिकन नौदलाची 8 लढाऊ
जहाजे,188 विमाने,3 क्रुझर,3 विनाशिका,1 विमानविरोधी प्रशिक्षण जहाज व 1 सुरंग जहाज
यांचे नुकसान झाले. अमेरिकेच्या तुलनेत जपानचे कमी नुकसान झाले त्यांची 29 विमाने व
पाच लहान पाणबुड्या नष्ट झाल्या व 65 सैनिक एकतर मृत किंवा जखमी झाले. एका जपानी सैनिकाला
पकडण्यात अमेरिकन सैनिकांना यश आले. या हल्ल्यानंतर अमेरिकन जनतेला प्रचंड धक्का बसला
व अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी लगेच दुसऱ्या दिवशी ब्रिटनच्या बाजूने महायुध्दात उतरत असल्याचे जाहिर करीत जपानविरूध्द
युध्द पुकारले. यानंतर जर्मनी व इटलीनेही अमेरिकेविरूध्द युध्दाची घोषणा केली. या हल्ल्याची
पार्श्वभूमी अशी होती की, जपानला अग्नेय आशियात साम्राज्यविस्तार करायचा होता. अमेरिकेने
यात अडकाठी आणू नये म्हणून जपानने हा हल्ला केला असे मानले जाते.
07-12-1941 कवी भा.रा. तांबे यांचे निधन.
भास्कर रामचंद्र
तांबे तथा भा.रा. तांबे हे मराठीतील एक नामवंत कवी होते. त्यांना अधुनिक मराठी गीतकाव्याचे
प्रवर्तक मानले जाते. ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी असणारे तांबे हे हिंदी,उर्दु काव्याचे अभ्यासक होते.
27-10-1873
07-12-1941
मराठीतील एक
नामवंत कवी, अधुनिक मराठी गीतकाव्याचे प्रणेते
- पिवळे तांबूस ऊन कोवळे.........
- जन पळभर म्हणतील हाय हाय........
- तिन्ही सांजा सखे मिळाल्या......
- तुझ्या गळा माझ्या गळा.....
- नववधू प्रिया मी बावरते.......
- राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता- 1935
पुरस्कार
अनेक संस्था
तसेच महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्य सरकार भा.रा.तांबे यांच्या नावाने पुरस्कार देते.महाराष्ट्र शासन कवीवर्य भा.रा. तांबे
असा पुरस्कार देते तर मध्यप्रदेश सरकार मराठी साहित्य अकादमीतर्फे भास्कर रामचंद्र
पुरस्कार देते. महाराष्ट्र साहित्य परिषदही कविवर्य भा.रा. तांबे हा पुरस्कार देऊन
अनेक कवींना गौरविते.
07-12-1997 ज्योर्तिमठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे निधन.
स्वामी शांतानंद
सरस्वती हे जोर्तिमठाचे शंकराचार्य होते. ते शंकराचार्य ब्रह्मानंद सरस्वती यांचे शिष्य
होते. अद्वैत वेदांतावर अधारित त्यांचे तत्वज्ञान पाश्चिमात्य देशांत खूप लोकप्रिय
ठरले.
जन्म
16-07-1913 अच्छाती,बस्ती,उत्तर
प्रदेश आधीचा ब्रिटीश भारत
07-12-1997
- जोर्तिमठाचे शंकराचार्य-1953 ते 1980
- अव्दैत वेदांतवर आधारित त्यांचे तत्वज्ञान पाश्चात्य देशांत खूपच लोकप्रिय ठरले.
- पाश्चात्य देशांतील दि स्टडी सोसायटी व स्कूल ऑफ इकॉनॉमिक सायन्सने स्वामी शांतानंद सरस्वतींच्या अतिंद्रिय ध्यान या पद्धतीवर व त्यांच्या तत्वज्ञानावर आधारित अभ्यासक्रम,व्याख्याने व पुस्तकांची निर्मिती केली आहे.
- स्कूल ऑफ मेडिटेशन मध्ये गुरू म्हणून हॉलंड पार्क,लंडन येथे त्यांनी कार्य केले.
- गुड कंपनी
- गुड कंपनी II
- दि मॅन हू वॉन्टेड टू मिट गॉड: मिथ्स अँड स्टोरीज दॅट एक्सप्लेन दि इनएक्सप्लीकेबल बाय हिज हॉलीनेस शांतानंद सरस्वती
- टेक्नीक्स ऑफ हिज हॉलीनेस शांतानंद सरस्वती
संदर्भ व आभार
Image by OpenClipart-Vectors from Pixabay
भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.