09 जून 2021-09 June
09 जून 2021-09 June
आगगाडीचे जनक जॉर्ज स्टीफनसन यांचा जन्म. 09 जून 1781
अल्पपरिचय
जॉर्ज स्टीफनसन हे आगगाडीचे जनक होते. ब्रिटीश स्थापत्य व यांत्रिकी अभियंते असणाऱ्या स्टीफनसन यांनी जेम्स वॅट यांचे वाफेच्या इंजिनाचे मॉडेल वापरून पहिली स्टॉकटोन ते डार्लिंगटोन रेल्वेलाइन 1825 साली आपला मुलगा रॉबर्ट याच्या रॉबर्ट स्टीफनसन अँड कंपनीतर्फे सुरू केली.
जन्म
09 जून 1781 व्हिल्यॅम ,नॉर्थथंबरलँड, इंग्लंड
मृत्यू
12 ऑगस्ट 1848 टॅप्टन हाउस, चेस्टरफिल्ड, डर्बीशायर, इंग्लंड
शिक्षण
स्थापत्य व यांत्रिकी अभियांत्रिकी
कार्य
अगगाडीचे जनक
जगातील पहिली प्रवासी अगगाडी(रेल्वेलाइन) स्टॉकटोन ते डार्लिंगटोन ही स्टीफनसन यांनी आपल्या मुलाच्या कंपनीव्दारे (रॉबर्ट स्टीफनसन अँड कंपनी) सुरू केली, ही पहिली रेल्वे इंजिन बनवणारी कंपनी होती. कंपनीने बनविलेले वाफेच्या तत्वावर चालणारे लोकोमोशन हे रेल्वे इंजिन या मार्गासाठी रेल्वेला जोडण्यात आले.
जॉर्ज स्टीफनसन यांनी आपले पहिले संशोधक उपकरण तयार केले ते म्हणजे खाणकामगारांसाठी सेफ्टी लॅम्प तयार केला स्वत: खाणीत काम केल्यामुळे त्यांना त्यांच्या समस्यांची जाणीव होती त्यामुळे हेम्फी डेव्ही यांनी तयार केलेल्या सेफ्टी लॅम्प पेक्षाही हा लॅम्प अधिक सुरक्षित होता.
ब्लूचर नावाचे रेल्वे इंजिन तयार केले.
स्टीफनसन यांनी तयार केलेले 1.435 मी या आदर्श मापाचे रेल्वेरूळ आजही अनेक देशात वापरले जातात. स्टीफनसन गेज या नावाने ते ओळखले जातात.
औद्योगिक क्रांतीमध्ये रेल्वेचे अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळेच स्टीफनसन यांच्या संशोधनालाही त्यामुळे अधिक बळ मिळाले व त्यामुळेच आजची प्रगत अधुनिक रेल्वेसेवा आपण पाहू शकतो.
भारतात रविवारच्या साप्ताहिक सुटीला सुरूवात. 09 जून 1890
रविवारची सुटी
जिथे जिथे इंग्रजांनी पूर्वी राज्य केले आहे त्या सर्व ठिकाणी रविवार हा सुटीचा वार समजला जातो. भारतात या सुटीची सुरूवात ही गिरणी कामगारांपासून झाली. रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली कापड गिरणी कामगार संघटना बाँम्बे मिल हँड्स ही 1884 मध्ये सुरू केली, कापड गिरणी कामगारांच्या हितासाठी अनेक निर्णय गिरणी मालकांकडून मंजूर करून घेण्यात ही संघटना आघाडीवर होती. त्यातीलच प्रमुख मागणी म्हणजे कामगारांना दुपारची आर्ध्या तसाची जेवणाची सुटी व रविवारी साप्ताहिक सुटी ही होय 1890 साली या मागण्यांसाठी अनेक अंदोलने व मोर्चे आयोजित करण्यात आले. अखेरीस या सर्व मागण्यांना यश आले व गिरणी कामगारांना हक्काची रविवारची सुटी मंजूर झाली. नंतर ती बाकी सगळ्याच अस्थापनांमध्ये हळूहळू लागू करण्यात आली.
भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून पंडित लाल बहादुर शास्त्री यांचा शपथविधी. 09 जून 1964
पंडित लाल बहादुर शास्त्री यांचा शपथविधी
पंडित नेहरूंच्या 1964 मधील निधनानंतर भारताचे तिसरे पंतप्रधान म्हणून पंडित लाल बहादुर शास्त्रींची निवड करण्यात आली. आजच्याच दिवशी म्हणजेच 09 जून 1964 रोजी शास्त्रीजींनी देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली व आपल्या कारर्किदीस सुरूवात केली. लगेचच 1965 साली भारताला पाकिस्तानबरोबर युध्दास सामोरे जावे लागले परंतू पंडितजीनी आपल्या कणखर निर्णयक्षमतेने व प्रभावी रणनीतीने पाकिस्तानला या युध्दात माघार घ्यायला लावली. त्याकाळी देश प्रचंड अन्नधान्य तुटवड्याचा सामना करीत होता त्यावेळी आपल्या अमोघ वकृत्वाने पंडितजींनी देशाला साद घातली व 'जय जवान जय किसान' ही प्रसिध्द घोषणा करून या दोन्ही समाजघटकांचे महत्व पूर्ण भारतीय समाजाला पटवून दिले. अत्यंत साध्या राहणीसाठी प्रसिध्द असणाऱ्या शास्त्रीजींचा राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर होता. पंडित लाल बहादुर शास्त्री यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
स्वातंत्र्यसैनिक व संसदपटू प्रा. एन. जी. रंगा यांचे निधन. 09 जून 1995
अल्पपरिचय
प्रा. गोगिनेने रंगा नायकुलु तथा प्रा. एन. जी. रंगा हे प्रसिध्द स्वातंत्र्यसैनिक व संसदपटू होते. रंगा यांना भारतीय शेतकरी चळवळीचे जनक संबोधले जाते.
जन्म
07 नोव्हेंबर 1900 निदुरबुरूलु, गुंटुर, मद्रास राज्य. ब्रिटीश भारत सध्या आंध्र प्रदेश भारत
मृत्यू
09 जून 1995
शिक्षण
आंध्र-ख्रिस्तियन कॉलेज मधून पदवी
ऑक्सफर्ड विद्यापीठातून बी.लीट पदवी
कार्य
प्रसिध्द स्वातंत्र्यसैनिक व संसदपटू
पंचयप्पा कॉलेज मद्रास येथे प्राध्यापक
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग
प्रा. एन. जी. रंगा हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. प्रा. एन. जी. रंगा यांची संसदीय कारर्किर्द तब्बल सहा दशकांची होती.
प्रा. एन. जी. रंगा यांनी भूषविलेली पदे
- मद्रासमधून राज्यसभा खासदार कार्यकाळ 1952 ते 1957
- तेनाली लोकसभा मतदारसंघातून खासदार कार्यकाळ-1957 ते 1962
- चित्तुर लोकसभा मतदारसंघातून खासदार कार्यकाळ-1962 ते 1967
- श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून खासदार कार्यकाळ-1967 ते 1971
- आंध्र प्रदेशातून राज्यसभा खासदार कार्यकाळ-1977 ते 1980
- गुंटूर लोकसभा मतदारसंघातून खासदार कार्यकाळ-1980 ते 1984
- गुंटूर लोकसभा मतदारसंघातून खासदार कार्यकाळ-1984 ते 1989
- गुंटूर लोकसभा मतदारसंघातून खासदार कार्यकाळ-1989 ते 1991
प्रा. एन. जी. रंगा यांनी लिहिलेली पुस्तके
- बापू ब्लेसेस
- क्रिडो ऑफ वर्ल्ड पिसॅन्ट्री
- इकोनॉमिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियन व्हिलेजेस
सन्मान
पन्नास वर्षांच्या यशस्वी संसद कारर्किदीसाठी रंगा यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविले गेले आहे.
संदर्भ व आभार
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.