आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-02-10-2020

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-02-10-2020

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-02-10-2020

                                                                                                               

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-02-10-2020

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा अहिंसेचे प्रतिक महात्मा गांधी यांच्या अहिंसा या तत्वज्ञानावर आधारित आहे. जागतिक सौहार्द व जगातील देशांचे हिंसेपासून संरक्षण व्हावे या हेतूने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 15 जून 2007 रोजी ठराव पास करून 02 ऑक्टोबर -गांधी जयंती  हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली.

अहिंसेसाठी श्रेणी ठरविण्यात आली.

  • मोर्चे काढून निषेध व मन वळविणे व त्याव्दारे न्याय मिळवणे.
  • असहकार, नाकेबंदी सारख्या अहिंसात्मक मार्गांनी हस्तक्षेप करून न्याय मिळवणे.

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-02-10-1847
जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन‍ हिन्डेनबर्ग यांचा जन्म

अल्पपरिचय

पॉल फॉन हिन्डेनबर्ग पहिल्या महायुध्दातील जनरल,जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष होते. ॲडॉल्फ हिटरलरला चॅन्सेलर पदावर नियुक्ती देऊन नाझी युगाची सुरवात त्यांनी केली असे मानले जाते.

जन्म

02-10-1847 पोसेन प्रशिया राज्य सध्या पोलंड

मृत्यू

02-08-1934 न्यूडेक, पुर्व प्रशिया, नाझी जर्मनी, आता ओग्रेडझिनिक पेालंड

कार्य

  • युध्दात सहभाग जनरल-फिल्ड मार्शल म्हणून
  • ऑस्ट्रो-प्रशिया
  • फ्रॅन्को-प्रशिया
  • पहिल्या महायुध्दात चीफ ऑफ ग्रेट जनरल स्टाफ
  • पहिले महायुध्द
  • महायुध्दानंतर जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष 1925-1934

पुरस्कार

  • पाऊर ले मेरिएट

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-02-10-1869
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म

अल्पपरिचय

मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील केंद्रबिंदू, अहिंसेचे प्रतिक असलेले महात्मा गांधी हे आपल्या अहिंसा, सत्याग्रह या गोष्टींसाठी जगभर ओळखले जातात.

जन्म

02-10-1869 पोरबंदर  ब्रिटीश इंडिया सध्याचा गुजरात

मृत्यू

30-01-1948 नवी दिल्ली,भारत

शिक्षण

बॅरिस्टर

कार्य

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एक प्रमुख नेते म्हणून सहभाग

महात्मा गांधींच्या अहिंसा, सत्याग्रह, विविध अंदोलने याचा भारताला स्वातंत्र्य मिळण्यात मोलाचा वाटा

प्रमुख अंदोलने

  • चंपारण्य सत्याग्रह आंदोलन
  • खेडा आंदोलन
  • असहकार अंदोलन
  • दांडी सत्याग्रह अंदोलन
  • भारत छोडो अंदोलन

पुस्तके

  • Indian Home Rule (हिंद स्वराज्य)
  • गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
  • गांधीजीचे जीवन त्यांच्याच शब्दांत
  • गांधी विचार दर्शन : अहिंसाविचार
  • गांधी विचार दर्शन : राजकारण
  • गांधी विचार दर्षन : सत्याग्रह प्रयोग
  • गांधी विचार दर्शन : सत्याग्रह विचार
  • गांधी विचार दर्शन : सत्याग्रहाची जन्मकथा
  • गांधी विचार दर्शन : हरिजन
  • नैतिक धर्म
  • भगवद्गीता : गांधीजींच्या चिंतनातून (मराठी अनुवाद : भगवान दातार)
  • माझ्या स्वप्नांचा भारत

भारतीय रिजर्व बँकेने 1996 पासून भारताच्या सर्व रूपयांच्या नोटेवर महात्मा गांधी यांची प्रतिमा छापायला सुरवात केली या नोटांना गांधी सिरिज असे संबोधले.

पुरस्कार

  • द मॅन ऑफ दी इयर- टाईम मासिक-1930

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-02-10-1891
प्रसिध्द शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म

अल्पपरिचय

विनायक पांडुरंग करमरकर  उर्फ नानासाहेब हे प्रसिध्द शिल्पकार होते. पुण्यातील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल मधील छत्रपती शिवाजींचा अश्वारूढ पूर्णपणे ब्राँझ मध्ये बनविलेला साडेतेरा फूट उंचीचा पुतळा ही त्यांची अतुलनीय कामगिरी ठरली.

जन्म

02-10-1891

मृत्यू

13-06-1967

शिक्षण

  • शिल्पकला-जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई
  • लंडन रॉयल ॲकॅडमी येथे ब्राँझ कटिंग,स्टोन क्रशिंग या तंत्रांचे शिक्षण

कार्य

  • व्यक्तीशिल्पे-रविद्रनाथ टागोर,चित्तरंजनदास,महात्मा गांधी,पी.सी. रे
  • शंखध्वनी कलाकृती-सोसायटी ऑफ आर्टिस्ट्स यांच्या प्रदर्शनात प्रसिध्द
  • श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल मधील छत्रपती शिवाजींचा अश्वारूढ पूर्णपणे ब्राँझ मध्ये बनविलेला साडेतेरा फूट उंचीचा पुतळा हा पुतळा 8 टन वजनाचा आहे. हा पुतळा ब्राँझ मध्ये घडविणारे भारतातील समकालीन शिल्पकारांमध्ये ते पहिले होते.
  • विठ्ठलभाई पटेल,आचार्य कृपलानी,ऑटो रॉथफिल्ड यांची शिल्पे
  • मस्यगंधा, मोरू,प्रवासी, नमस्ते आदी शिल्पे
  • रायगडवरील वाघ्या कुत्र्याचे  शिल्प

तसेच अनेक संस्थानिक आदींचेही त्यांनी शिल्पे घडविली.

लेख

  • एका पुतळ्याची आत्मकथा

पुरस्कार

  • पद्मश्री-1962
  • ललित कला अकादमीव्दारे फेलोशिप

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-02-10-1904
भारताचे तिसरे पंतप्रधान पंडित लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म

अल्पपरिचय

स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान, आपल्या जय जवान जय किसान घोषणेने प्रत्येक भारतीयाच्या मनात अढळस्थान निर्माण करणारे पंडित लाल बहादूर शास्त्री यांचा आज जन्मदिन, आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरी असो अथवा 1965 चे पाकिस्तान बरोबरील युध्द ते त्यांनी अत्यंत संयमी व दृढतेने हताळले. पंडितजी अत्यंत साध्या रहाणीमुळे प्रसिध्द होते.

जन्म

02-10-1904 वाराणसी ब्रिटीश इंडिया सध्याचा उत्तरप्रदेश

मृत्यू

11-01-1966 ताश्कंद उझबेकिस्तान

कार्य

  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
  • काँग्रेसचे सचिव
  • केंद्रीय रेल्वेमंत्री
  • केंद्रीय परराष्ट्रमंत्री
  • तिसरे भारतीय पंतप्रधान कार्यकाळ-जून 1964 ते जानेवारी 1966

1965 च्या भारत-पाकिस्तान युध्दाच्या वेळेची  जय जवान-जय किसान ही घोषणा प्रचंड गाजली व भारताने पाकिस्तानला नमवले.

पुरस्कार

  • मरणोत्तर भारतरत्न

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-02-10-1906
राजा रविवर्मा यांचे निधन

अल्पपरिचय

राजा रविवर्मा हे थोर भारतीय चित्रकार होते, त्यांची हिंदू महाकाव्ये व पुराणांतील देव देवतांची चित्रे ही इतिहास प्रसिध्द आहेत, देवी देवतांचा मानवी चेहरा भारतीयांना त्यांच्या चित्रांतून दिसला, त्यांना अधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचा जनक म्हणून संबोधले जाते. 

न्म

29-04-1848 त्रावणकोर

मृत्यू

02-10-1906 अत्तीनगल

कार्य

भारतीय चित्रकलेचा मानवी चेहरा, अधुनिक भारतीय चित्रकलेचा प्रणेता

प्रसिध्द चित्रे

  • खेड्यातील कुमारी
  • विचारमग्न युवती
  • दमयंतीचे हंसाशी संभाषण
  • संगीत सभा
  • अर्जुन व सुभद्रा
  • फळे घेऊन जाणारी स्त्री
  • विरहव्याकुळ युवती
  • तंतुवाद्य वाजवणारी स्त्री
  • शकुंतला
  • कृष्णशिष्टाई
  • रावणाकडून रामभक्त जटायूचा वध
  • इंद्रजितावरचा विजय
  • भिकारी कुटुंब
  • स्त्री तंतुवाद्य वाजवताना
  • स्त्री देवळात दान देतांना
  • रामाचा वरुणावर विजय
  • नायर जातीतील स्त्री
  • प्रणयरत जोडपे
  • द्रौपदी कीचक-भेटीस घाबरत असताना
  • शंतनु व मत्स्यगंधा
  • शकुंतला राजा दुष्यंतास प्रेम-पत्र लिहिताना
  • कण्व ऋषीच्या आश्रमातील ऋषिकन्या

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-02-10-1958
गिनीला फ्रान्स पासून स्वातंत्र्य मिळाले.

गिनी

गिनी या देशाला गिनी गणराज्य म्हणून ओळखले जाते. पूर्वी या देशाला फ्रेंच गिनी असे संबोधले जायचे. हा देश पश्चिम अफ्रिेकेत स्थित आहे.

देश-गिनी गणराज्य

राजधानी-कोनार्की

सीमा-पश्चिमेस अटलांटिक महासागर,तसेच इतर दिशांना गिनी-बिसाउ,सेनेगल, माली,सिएरा लिओन,लायबेरीया, आयव्हरी कोस्ट हे देश आहेत.

राष्ट्रभाषा-फ्रेंच

अर्थव्यवस्था-कृषी,खाणव्यवसाय, बॉक्साईट उत्पादनात जगात दुसरा क्रमांक

राष्ट्रीय चलन-गिनीयन फ्रँक

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-02-10-2020
राष्ट्रीय दिवस

स्वच्छता दिन

बालसुरक्षा दिन

संदर्भ व आभार- आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-02-10-2020

https://www.google.com

https://www.wikipedia.org

https://www.esakal.com

https://www.un.org/en/observances/non-violence-day

 

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-02-10-2020
संकल्पना,संकलन,संपादन

                                                                                                                                                                   भालचंद्र माधव इनामदार
 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21