06 फेब्रुवारी 2021
06 फेब्रुवारी 2021
कवी प्रदीप यांचा जन्म. 06 फेब्रुवारी 1915
रामचंद्र नारायण
व्दिवेदी तथा कवी प्रदीप हे प्रसिध्द हिंदी कवी व ए मेरे वतन के लोगों या गाण्यामुळे
प्रसिध्द असलेले कवी प्रदीप अधुनिक राष्ट्रकवी ओळखले जातात.
जन्म
06 फेब्रुवारी
1915 बडनगर,उज्जैन,मध्यप्रदेश, ब्रिटीश भारत
11 डिसेंबर
1998 मुंबई,महाराष्ट्र, भारत
कार्य
देशभक्ती व स्वदेशी
अस्मितेचे गुणग्राहक असणारे कवी प्रदीप असामान्य कवी होते.कवी प्रदीप यांच्या काव्यरचनांनी
हजारो क्रांतीकारकांना,देशभक्तांना क्रांतीकार्य करण्याची स्फूर्ती दिली.सुमारे
1700 गाणी लिहिणारे कवी प्रदीप राष्ट्रीय अस्मिता जागवणारे कवी होते.
- ए मेरे वतन के लोगों..........जरा आँख मे भरलो पानी........... या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भारत चीन युध्दपार्श्वभूमीवर 26 जानेवारी 1963 रोजी रामलीला मैदान दिल्ली येथील कार्यक्रमात गायलेल्या शौर्यगीताने पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यातही अश्रू आले.
- आओ बच्चो तुम्हें दिखांए झाँकी हिंदुस्तान की...........
- अब तेरे सिवा कौन मेरा कृष्ण कन्हैया...........
- आज हिमालय के चोटी से फिर हमने ललकारा है........दूर हटों दुनियावालों ये हिंदुस्तान हमारा है.......
- देख तेरे संसार की हालत क्या हुई भगवान......कितना बदल गया इन्सान....
- दे दी.हमें आजादी बिना खङग् बिना ढाल........साबरमती के संत तुने कर दिया कमाल........
कवी प्रदीप यांच्या
बऱ्याच रचना पाकिस्तानातही प्रसिध्द झाल्या व त्यांनी त्या रूपांतरीत करून चित्रपटांतही
वापरल्या.
भारतीय स्वातंत्र्यसेनानी मोतिलाल नेहरू यांचे निधन. 06 फेब्रुवारी 1931
मोतीलाल गंगाधर
नेहरू हे प्रसिध्द स्वातंत्र्यसेनानी,वकील,स्वराज्य पक्षाचे संस्थापक तसेच स्वतंत्र
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील होते.
06 मे 1861 अलाहाबाद,उत्तर-पश्चिम
प्रांत,ब्रिटीश भारत सध्या प्रयागराज,उत्तरप्रदेश,भारत
मृत्यू
06 फेब्रुवारी
1931 लखनौ,युनायटेड प्रोव्हिन्स,ब्रिटीश भारत,सध्या लखनौ,उत्तरप्रदेश,भारत
ब्रिटीश भारतात
कानपूर व आलाहाबाद येथील न्यायालयात वकीली
दि लीडर या इंग्रजी
वृत्तपत्राचे संचालक
दि इनडिपेंन्डंट
या इंग्रजी वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक
राष्ट्रीय काँग्रेसचे
महत्वाचे प्रमुख नेते
राष्ट्रीय काँग्रेसचे
अध्यक्ष म्हणून त्यांनी दोनवेळा पद भूषविले 1919-20 व 1928-29
भारताच्या भावी
संविधानाची रूपरेखा ठरविणाऱ्या नेहरू समितीचे प्रमुख या समितीने नेहरू रिपोर्ट सादर
केला.
मोतिलाल नेहरू
यांनी चित्तरंजन दास यांच्यासोबतीने स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
मोतिलाल नेहरू
यांनी ब्रिटीश भारतात कायदेमंडळात विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.
छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने तत्कालीन बंगाल गर्व्हनर स्टॅन्ले जॅक्सनवर कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गोळ्या झाडल्या. 06 फेब्रुवारी 1932
बीना दास या
क्रांतीकारक व स्वातंत्र्यसेनानी तसेच समाजसेविका होत्या.
24 ऑगस्ट
1911कृष्णनगर,बंगाल प्रांत, ब्रिटीश भारत
मृत्यू
26 डिसेंबर
1986 ऋषीकेश,उत्तराखंड, भारत
शालेय शिक्षण-
सेंट जॉन डिओसिएन गर्ल्स हायर सेकंडरी स्कूल
बेथुन कॉलेज,कलकत्ता
कार्य
भारातातील एक
प्रख्यात महिला क्रांतीकारी
बीना दास या
कलकत्त्यातील महिलांसाठीच्या छत्री सेना या क्रांतीकारी संघटनेच्या सदस्य होत्या. विद्यार्थीदशेत
असताना 06 फेब्रुवारी 1932 रोजी कलकत्ता विद्यापीठाच्या हॉल मध्ये पदवीदान समारंभात
त्यांनी तेव्हाचे बंगालचे राज्यपाल स्टॅनली जॅक्सन यांच्या हत्येचा प्रयत्न केला त्यांनी
एकूण पाच गोळ्या झाडल्या. ते रिव्हॉल्वर अजून एक महिला क्रांतीकारी कमला दासगुप्ता
यांनी बीना यांना पुरविले होते. त्यांनी या केलेल्या धाडसी क्रांतीकार्यामुळे त्यांना
तब्बल नऊ वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. 1939 ला त्यांची लवकरच या शिक्षेतून मुक्तता
झाली. त्यानंतर त्यांनी छोडो भारत चळवळीत भाग घेतला व त्यांना पुन्हा 1942 ते 1945
अशी कारावासाची शिक्षा झाली. 1946-47 मध्ये
त्या बंगाल प्रांताच्या विधानसभेवर निवडून गेल्या तर स्वातंत्र्यानंतर 1947 ते 51 त्या
पश्चिम बंगाल प्रांताच्या विधानसभेवर निवडून गेल्या.
तब्बल 80 वर्षानंतर
कलकत्ता विद्यापीठाकडून 2012 साली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पदवी प्रमाणपत्र त्यांच्या
वारसांना देण्यात आले.
श्रिंकल झनकार,प्रितीधन
अशी त्यांनी दोन आत्मचरित्रात्मक पुस्तके लिहिली आहेत.
पुरस्कार
भारत सरकारकडून
पद्मश्री 1960
बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड-तिसरे यांचे निधन. 06 फेब्रुवारी 1939
श्रीमंत सर सयाजीराव
खंडेराव गायकवाड- तिसरे हे बडोदा संस्थानचे
अधिपती होते ते 1875 ते 1939 पर्यंत बडोद्याच्या राजगादीवर होते. बडोदा संस्थानातील
जनतेकरीता केलेल्या लोककल्याणकारी कार्यासाठी ते ओळखले जातात.
11 मार्च
1863 मौजे कवळाणे, ता. मालेगांव, जि .नाशिक, आधीचा ब्रिटीश भारत
06 फेब्रुवारी
1939 मुंबई, ब्रिटीश भारत
कार्य
महाराजा श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे अधिपती होते.
कार्यकाळ 1875 ते 1939
सयाजीराव गायकवाड
महाराजांनी बडोदा संस्थानात अनेक सुधारणा केल्या त्यातील काही याप्रमाणे आहेत.
न्यायव्यवस्थेत
सुधारणा,प्रशासकीय व्यवस्थेचे विकेंद्रीकरण,ग्रामपंचायतींचे पुनरूज्जीवन,सक्तीचे प्राथमिक
शिक्षण,गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिषुवृत्ती,कलाशिक्षणाकरीता कलाभुवन ही संस्था,प्राच्य
विद्यामंदीर व्दारे प्राचीन ग्रंथांचे भाषांतर केले,वाचनालये,समाजिक प्रथाबंदी जसे
की पडदापध्दती,बालविवाह,कन्याविक्रयबंदी आदी कार्य केले. तसेच मिश्रविवाहाचा पुरस्कार,स्त्रीयांना
वारसाहक्क,अस्पृश्यतानिवारण,विधवापुर्निविवाह असे अनेक लोकहितकारी निर्णय घेतले.
1927 साली बडोदा
व इतर भागात आलेल्या महापूरात प्रचंड संख्येने मदतकार्य करून व लोकांना वाचवून आदर्श
अशा अपत्कालीन मदतसेवेचा त्यांनी परीचय करून दिला.
पंडित मदनमोहन
मालवीय यांनी त्यांना हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा असे संबोधून त्यांच्या कार्याचा
गौरव केला आहे.
संदर्भ व आभार
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव
इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.