16 फेब्रुवारी 2021-16 February 2021

 

16 फेब्रुवारी 2021-16 February 2021

थोरले माधवराव पेशवे यांचा जन्म. 16 फेब्रुवारी 1745

अल्पपरिचय

    मराठेशाहीतील चौथे कर्तबगार व प्रजाहितदक्ष पेशवे म्हणून ज्यांना ओळखले जाते ते थोरले माधवराव पेशवे अर्थात श्रीमंत माधवराव नानासाहेब भट हे मराठेशाहीतील शेवटचे कर्तबगार पेशवे म्हणून ओळखले जातात. पानिपतच्या 14 जानेवारी 1761 च्या युध्दातील पराभवाला आपल्या पराक्रमाने व कर्तव्यपरायणतेने विसरून टाकायला लावणारे पेशवे म्हणून इतिहासात त्यांना आदराचे स्थान आहे.

जन्म

16 फेब्रूवारी 1745 सावनूर आताचा धारवाड जिल्हा

मृत्यू

18 नोव्हेंबर 1772 थेऊर, जि. पुणे

कार्य

    पानिपतच्या 14 जानेवारी 1761 च्या युध्दात मराठ्यांचा पराभव झाला त्या‍ युध्दात नानसाहेब पेशवे यांचे भाऊ    मराठी साम्राज्याचे खंदे सरसेनापती सदाशिवरावभाऊ पेशवे व नानासाहेब पेशवे यांचे थोरले चिरंजीव  विश्वासराव पेशवे या दोघा थोर सेनानींना वीरगती प्राप्त झाली त्यामुळे पानिपतच्या पराभवाने खचलेल्या पेशवे नानासाहेब यांचे निधन झाले व मराठी साम्राज्याची सुत्रे नानासाहेब पेशव्यांचे धाकटे चिरंजीव श्रीमंत माधवराव यांच्याकडे आली त्यांना 23 जून 1761 रोजी रीतसर पेशवाईची वस्त्रे सातारच्या छत्रपतींकडून मिळाली. युध्दानंतर मराठी साम्राज्याची घडी बसवण्याचे महत्वाचे कार्य त्यांना पार पाडावयाचे होते तसेच निजाम,हैदरअली,इंग्रज असे अनेक शत्रूही युध्दामुळे गलितगात्र झालेले मराठी साम्राज्य मिळवण्यासाठी टपून बसले होते. अशा कठीणसमयी हा अवघ्या सोळा वर्षाचा पेशवा गादीवर आला नुसता आलाच नाही तर या सर्व आव्हानांवर आपल्या धैर्याने व चार्तुर्याने व कर्तबगारीने मात करत मराठी साम्राज्याची पुन: नीट घडी बसविली.

श्रीमंत माधवराव पेशवे यांनी केलेली कामगिरी

  • गोदावरी तीरावर राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्याचा पराभव केला 10 ऑगस्ट 1763 व निजामाने गिळंकृत केलेला सर्व प्रदेश तह करून परत मिळविला.
  • मार्च 1765 मध्ये सावनूर जवळ रट्टेहळ्ळी व कारवारच्या जंगलात मैसूरच्या हैदरअलीचा पराभव करून श्रीमंत माधवरावांनी हैदरने जिंकलेला सर्व प्रदेश ताब्यात घेत 32 लक्ष रूपये खंडणीही घेतली.
  • नागपूरकर जानोजी भोसले यांनी पेशव्यांविरध्द दगाबाजी करण्याचा प्रयत्न केला म्हणून सुरवातीला खलपूर येथे तह केला तरीही त्यांनी ऐकले नाही म्हणून माधवरावांनी चिनूरच्या जंगलात पराभव करीत मार्च 1769 मध्ये तह केला व पेशव्यांच्या नेतृत्वात मोहिमेत सहभाग घेण्याचे जानोजी भोसले यांनी मान्य केले व पाच लक्ष रूपये खंडणी दिली.
  • उत्तरेकडील मोहिमांत श्रीमंत माधवरावांना म्हणावे तसे यश आले नाही  त्यांनी सरदार विसाजी कृष्ण,रामचंद्र गणेश यांना मोठी फौज देऊन  उत्तरेत पाठविले व जाट राजा जवाहीरसिंग याचा एप्रिल 1770 मध्ये पराभव केला. पुढे मराठ्यांनी आपला प्रदेश व रोहिल्यांवर हल्ले करून इटावा,फारूर्खाबाद अशी ठाणी जिंकली व पानिपतचे आपयश पुसायचा प्रयत्न केला.
  • रघुनाथराव पेशव्यांनी पेशवेपदासाठी भांडण उकरून काढल्यावर त्यांना आपल्या बुध्दीकौशल्याने व मुसद्दीपणाने जेरीस आणले व  मराठी साम्राज्यात न्यायव्यवस्था भक्कम करीत प्रजाहिताची अनेक कामे श्रीमंत माधवरावांनी केली, प्रसंगी मातोश्री गोपिकाबाईंचाही विरोध पत्करून कार्य सिध्दीस नेले.
  • उण्यापुऱ्या 11 वर्षाच्या राज्यकारभारात मराठा साम्राज्याची घडी श्रीमंत माधवरावांनी नीट बसविली परंतू अगदी तरूणपणात त्यांना क्षयरोगाने ग्रासले व नोव्हेंबर 1772 मध्ये त्यांनी थेऊर येथे देह ठेवला.   

रॅग्लर रघुनाथ परांजपे यांचा जन्म. 16 फेब्रुवारी 1876

अल्पपरिचय

    रँग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे हे भारतातील पहिले सिनीयर  रँग्लर,फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री व भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त तसेच समाजसुधारक  होते.

जन्म

16 फेब्रुवारी 1876 मुर्डी जि. रत्नागिरी, ब्रिटीश भारत

मृत्यू

06 मे 1966 पुणे,महाराष्ट्र,भारत

शिक्षण

प्राथमिक शालेय शिक्षण-आंजर्ली,मुर्डी,दापोली येथे झाले.

माध्यमिक शिक्षण-मराठा हायस्कूल मुंबई येथे झाले.

महाविद्यालयीन शिक्षण- फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे येथून बी.एस्सी पदवी

केंब्रीज लंडन येथील मॅथेमॅटिकल ट्रायपॉस परिक्षेत सर्वप्रथम येऊन त्यांनी सिनियर रॅंग्लर ही पदवी मिळविली.

कार्य

फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य व गणिताचे प्राध्यापक कार्यकाळ-1902 ते 1924

मुंबई प्रांताचे शिक्ष्णमंत्री कार्यकाळ-1921 ते 1923

अबकारी खात्याचे मंत्री

इंडियन कौन्सिलचे सभासद

लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू कार्यकाळ 1932 ते 1938

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कार्यकाळ 1956 ते 1959

ऑस्ट्रेलियातील  भारताचे उच्चायुक्त कार्यकाळ 1944 ते 1947

पुरस्कार

ब्रिटीश सरकारकडून कैसर ए हिंद 1916 व नाइटहूड 1942

पुस्तके

नाबाद 89 हे आत्मचरित्र-मराठी अनुवाद

द क्रॅक्स ऑफ इंडियन प्रॉब्लेम

दादासाहेब फाळके यांचे निधन. 16 फेब्रुवारी 1944

अल्पपरिचय

    धुंडिराज गोविंद फाळके तथा दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक होते. निर्माते,लेखक,दिग्दर्शक,छायाचित्रकार,कलादिग्दर्शक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या सिनेकारर्किदीत पार पाडल्या. राजा हरिश्चंद्र हा त्यांनी बनवलेला भारतातील पहिला मूकपट होता ज्याने भारतीय चित्रपटसृष्टीचा आरंभ झाला.

जन्म

30 एप्रिल 1870 त्र्यंबकेश्वर, नाशिक,ब्रिटीश भारत

मृत्यू

16 फेब्रुवारी 1944 नाशिक,ब्रिटीश भारत

शिक्षण

जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मधून कला विषयात पदवी व कलाभवन बडोदा येथून शिल्पकला,रेखाटन,तंत्रज्ञान,चित्रकला,छायाचित्रण या गोष्टींचे शिक्षण घेतले.

कार्य

हरहुन्नरी व अष्टपैलू व्यक्तीमत्व असणाऱ्या दादासाहेबांनी छायाचित्रणाचा व्यावसाय,भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेत ड्राफ्ट्समन ही नोकरी व स्वतंत्र छापखन्याचा व्यवसाय इत्यादी गोष्टी केल्या व लाईफ ऑफ ख्रिस्त मूकपट पाहिल्यानंतर ते चित्रपटनिर्मिती व्यवसायात उतरले.

1912 साली दादासाहेबांनी राजा हरिश्चंद्र या मूकपटाची  निर्मिती करून भारतीय चित्रपटसृष्टीचा आरंभ दादासाहेबांनी केला हा चित्रपट 03 मे 1913 रोजी  मुंबईत प्रदर्शित केला गेला व  भारतीय चित्रपटांच्या निर्मितीस सुरवात झाली.

दादासाहेबांची निर्मिती असणारे प्रमुख चित्रपट

  • राजा हरिश्चंद्र
  • मोहिनी भस्मासुर
  • सावित्री सत्यवान
  • श्रीकृष्णजन्म
  • सेतूबंधन
  • कालियामर्दन
  • गंगावतरण

दादासाहेब फाळके यांचे नाव मुंबईतील चित्रपटनगरीला देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे तसेच दादासाहेब फाळके यांच्या नावाने ‍चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ कलाकारांना पुरस्कारही देण्यात येतो.

भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा यांचे निधन.16 फेब्रुवारी 1956

ल्पपरिचय

    मेघनाद साहा हे भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताचे पहिले राष्ट्रीय पंचांग त्यांनी निर्माण केले होते. मेघनाद साहा यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.


संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://vishwakosh.marathi.gov.in/

https://www.vikaspedia.in/

https://www.wikipedia.org/

Image by mohamed Hassan from Pixabay 

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21