21 जानेवारी 2021 दिनविशेष
21 जानेवारी 2021 दिनविशेष
मराठीतील प्रख्यात कवी माधव ज्युलियन तथा माधव त्र्यंबक पटवर्धन यांचा जन्म. 21 जानेवारी 1894
माधव त्र्यंबक पटवर्धन तथा माधव ज्युलियन हे मराठीतील प्रख्यात कवी,छंदशास्त्राचे
व्यासंगी व मराठी भाषाशुध्दीचे तत्वनिष्ठ पुरस्कर्ते होते. माधव ज्युलियन यांच्याबद्दल
अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.
चित्रपट दिग्दर्शक,कवी शांताराम आठवले यांचा जन्म. 21 जानेवारी 1910
शांताराम आठवले हे मराठी चित्रपट दिग्दर्शक,कवी,गीतलेखक होते.
जन्म
21 जानेवारी 1910 पुणे,ब्रिटीश भारत
02 मे 1975
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक,कवी व गीतलेखक
प्रभात फिल्म्स मध्ये सहाय्यक दिग्दर्शक
प्रसिध्द चित्रपट- दिग्दर्शन
- वहिनीच्या बांगड्या
- शेवग्याच्या शेंगा
- भाग्यरेखा
- अमृतमंथन-बोलपट
- पडदा
- खेड्यामधले घर कौलारू......
- जनी नामयाची रंगली.......
- यमुनाकाठी ताजमहाल......
- माझ्या हाती माणिकमोती.....
- जन्मोजन्मी तुम्हीच यावे.....
- आधी बीज एकले.......... हा संत तुकाराम चित्रपटातील अभंग आठवले यांनीच लिहिला आहे जो संत तुकारामांनी लिहिला आहे असे सर्वांना वाटते.
माजी केंद्रीय रेल्वेमंत्री प्रा. मधू दंडवते यांचा जन्म. 21 जानेवारी 1924
प्राध्यापक मधू दंडवते हे समाजवादी राजकारणी,जेष्ठ संसदपटू, माजी केंद्रीय
रेल्वेमंत्री,अर्थमंत्री,अर्थतज्ञ होते. कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले
जाते. अत्यंत साधी रहाणी व तत्वनिष्ठता या त्यांच्या गुणांमुळे ते जनतेत प्रसिध्द होते.
21 जानेवारी 1924 बॉम्बे, ब्रिटीश भारत आताचे मुंबई,महाराष्ट्र,भारत
मृत्यू
12 नोव्हेंबर 2005
एम.एस्सी भौतिकशास्त्र, रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,मुंबई,मुंबई विद्यापीठ
कार्य
सिध्दार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स,मुंबई येथे भौतिकशास्त्राचे विभगप्रमुख
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य कार्यकाळ 1970 ते 1971
लोकसभा खासदार-राजापूर मतदारसंघ-कार्यकाळ 1971 ते 1991
भारताचे रेल्वेमंत्री कार्यकाळ 1977 ते 1979
भारताचे अर्थमंत्री कार्यकाळ 02 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990
भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष कार्यकाळ 01 ऑगस्ट 1996 ते 21 मार्च
1998
प्रा. मधू दंडवते यांनी भारतीय रेल्वेत अमूलाग्र बदल केले त्यांनी द्वितीय
श्रेणीच्या रेल्वेच्या बोगीमध्ये लाकडी आसनांऐवजी कुशनची आसने बसवण्यास परवानगी दिली
त्यामुळे गोरगरीब जनतेच्या आरामदायी प्रवासाची सोय झाली. कोकण रेल्वे चा महाकाय प्रकल्प
साकारण्यामध्ये त्यांचे योगदान मोलाचे होते. कोकण रेल्वे मुळे दुर्गम व पहाडी प्रदेश
असलेल्या कोकणातही रेल्वे धावू शकते हे त्यांनी जगाला दाखवून दिले, ज्यासाठी अनेकवेळा
सर्वेक्षण व बोगदे यांच्याव्दारे हा प्रकल्प पूर्णत्वास आला.
- मार्क्स अँड गांधी
- जयप्रकाश नारायण दि मॅन अँड हिज आयडियाज
- प्युचर ऑफ पार्लमेंटरी डेमोक्रॅसी इन इंडिया
- डायलॉग विथ लाईफ
- सोशल रूट्स ऑफ जेंडर इनजस्टीस
क्रांतीकारक हेमू कालाणी यांना ब्रिटीशांनी फाशी दिली. 21 जानेवारी 1943
हेमू कालाणी हे भारतीय क्रांतीकारी व स्वातंत्र्यसेनानी होते. 1942
च्या भारत छोडो अंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता.
23 मार्च 1923 सुक्कुर,सिंध प्रांत,ब्रिटीश भारत,सध्या पाकिस्तान
21 जानेवारी 1943
क्रांतीकारक हेमू कालाणी यांनी आपले आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण
केले. आपल्या किशोरअवस्थेपासूनच त्यांनी स्वदेशी वस्तूंचा अंगीकार व विदेशी वस्तूंना
विरोध करण्यास सुरवात केली होती. 1942 ला जेव्हा महात्मा गांधी यांनी भारत छोडो अंदोलनाचे
रणशिंग फुंकले तेव्हा आपल्या साथीदारांसमवेत हेमू कलानीही त्यामध्ये सक्रीयतेने सहभागी
झाले. शांततामय अंदोलन करीत असतानाच त्यांना खबर मिळाली की शस्त्रांस्त्रांनी भरलेली
रेल्वेगाडी हे अंदोलन दडपायला रोहडी शहराजवळून जाणार आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या
साथीदारांसमवेत या गाडीच्या अपघाताची म्हणजेच रेल्वेरूळ उखडण्याची योजना बनवली हे सर्व
गुप्त पध्दतीने सुरू होते, परंतू पोलीसांना या कटाची माहिती मिळाली व हेमू कलाणी पकडले
गेले, त्यांचे साथीदार फरारी होण्यात यशस्वी झाले, त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर
हजर केल्यानंतर न्ययालयाने 21 जानेवारी
1943 रोजी फाशी देण्याचे आदेश देण्यात आले. ही फाशी रोखण्यासाठी व्हाइसरॉयकडे अपील
करण्यात आले पण व्हाइसरॉय यांनी त्यांना त्यांच्या साथीदारांची नावे सांगण्यास सांगीतले,
जे कलाणी यांनी केले नाही व ठरल्याप्रमाणे
21 जानेवारी 1943 या दिवशी त्यांना
फाशी देण्यात आली.
संदर्भ व आभार
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.