14 मार्च 2021-14 March

 

14 मार्च 2021-14 March

नोबेलविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांचा जन्म. 14 मार्च 1879

अल्पपरिचय

    अल्बर्ट आइनस्टाइन सापेक्षतावादाचा सिध्दांत मांडून विज्ञानाचे महत्व अवघ्या जगाला दाखून देणारा अवलिया संशोधक, आइनस्टाइन हे सापेक्षतावादाचा सिध्दान्त,प्रकाशिय विद्युत परिणाम,पुंजभौतिकी,विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र यांमध्ये गाढा अभ्यास असलेले प्रसिध्द जर्मन सौध्दांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते.

जन्म

14 मार्च 1879 उल्म,वुटेंबर्ग, जर्मनी

मृत्यू

18 एप्रिल 1955 न्यू जर्सी, अमेरिका

शिक्षण

फेडरल पॉलिटेक्निक स्कूल-झ्यूरिच मधून फेडरल टिचिंग डिप्लोमा.

झ्युरिच विद्यापीठातून पीएचडी

कार्य

सौध्दांतिक भौतिकशास्त्रातील जगप्रसिध्द शास्त्रज्ञ

आइनस्टाइन यांनी लावलेले शोध

  • सामान्य सापेक्षता
  • विशेष सापेक्षता
  • फोटोइलेक्ट्रीक प्रभाव
  • ब्राउनियन गतीचा सिध्दांत
  • आइनस्टाइन फिल्ड समीकरणे
  • बोस आइनस्टाइन आकडेवारी
  • बोस आइनस्टाइन कंडेन्सेट
  • ग्रॅव्हिटेशनल वेव्ह
  • कॉस्मॉलॉजिकल कॉन्स्टंट
  • यनिफाइड फिल्ड थेअरी
  • इपीआर पॅराडॉक्स

पुरस्कार

  • भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक-1921
  • बर्नाड मेडल
  • रॉयल सोसायटीचे फेलो
  • कोपली मेडल
  • मॅक्स फ्लँक मेडल

जर्मन तत्वज्ञ समाजवादाचे जनक कार्ल मार्क्स यांचे निधन. 14 मार्च 1883

अल्पपरिचय

    कार्ल मार्क्स हे प्रसिध्द जर्मन तत्वज्ञ,अर्थशास्त्रज्ञ व  कम्युनिझम अर्थात समाजवादाचे विचारवंत व त्याचे प्रसारक व प्रचारक होते. गरिब कष्टकरी कामगार व शोषीतवर्गाच्या हाती सत्तेची किल्ली देणाऱ्या समाजवादामुळे त्यांना जगभर ओळखले जाते.

जन्म

05 मे 1818 ट्रायर, जर्मनी

मृत्यू

14 मार्च 1883

शिक्षण

बॉन विद्यापीठातून विधी शाखेची पदवी

बर्लिन विद्यापीठातून डॉक्टरेट

कार्य

    सुरवातीला मार्क्स यांनी पत्रकार म्हणून कार्य सुरू केले. त्यानंतर त्यांनी फ्रेडरिक एन्गेल्स सोबत एक कम्युनिस्ट मॅनीफेस्टो हा ग्रंथ लिहिला व त्यामध्ये कामगार व गरीब मजूर वर्गाने क्रांती करून कम्युनिस्ट समाज स्थापन करावा असा विचार मांडला. दास कॅपिटल या आपल्या ग्रंथात मार्क्स यांनी भांडवलदारांनी केलेल्या अन्यायाविरूध्द कामगार व मजूर वर्गाची बाजू घेत समाजवादाव्दारे त्यांना प्रत्यूत्तर देण्याचा विचार मांडला, नंतर याचे दोन खंड मार्क्स यांच्या टिप्पण्यांचा आधार घेऊन फ्रेडरिक एन्गेल्स यांनी प्रकाशित केले.

    कार्ल मार्क्स यांच्या शास्त्रीय समाजवादात भौतिकवाद,अतरिक्त मूल्य संघर्ष,वर्गसंघर्ष, राज्यविहिन व वर्गविहिन समाज या संकल्पनांचा समावेश होतो. इतिहासपूर्व अवस्था,गुलाम बाळगणारा समाज,सारंजामशाही,भांडवलशाही व साम्यवाद अशा इतिहासाच्या पाच अवस्था मार्क्स यांनी सांगितल्या.कष्ट करणाऱ्या समाजाला संपत्ती कमविण्याचाही अधिकार आहे हा विचार मार्क्स यांनी सांगितला. संपत्ती ही मूठभर श्रीमंतांची नसून ती कष्टकऱ्यांची देखील आहे. समाजवादात कष्टकरी हा मुख्य आहे. असा मार्क्स यांचा युक्तीवाद होता. पुढील काळात कम्युनिझम ही मोठी चळवळ निर्माण झाली व सोविएत युनियन सारख्या मोठ्या देशांनी याचा स्वीकार केला, ज्यामुळे सर्वांना काम, सामाजिक शेती, कामगार वर्गाला निर्णयप्रक्रियेत स्थान अशा अनेक चांगल्या गोष्टी झाल्या.

प्रसिध्द अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म. 14 मार्च 1931

अल्पपरिचय

    प्रभाकर पणशीकर हे रंगभूमीवरील प्रसिध्‍द अभिनेते,दिग्दर्शक व निर्माते होते. अश्रूंची झाली फुले,तो मी नव्हेच,बेईमान अशा नाटकांतील प्रमुख भूमिका प्रचंड गाजल्या.

जन्म

14 मार्च 1931

मृत्यू

13 जानेवारी 2011

कार्य

मराठी रंगभूमीवरील प्रसिध्द अभिनेते,नाट्यनिर्माते व दिग्दर्शक

नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेचे संस्थापक

प्रसिध्द नाटके-अभिनय

  • अश्रूंची झाली फुले
  • इथे ओशाळला मृत्यू
  • तो मी नव्हेच
  • थँक यू मिस्टर ग्लाड
  • भटाला दिली ओसरी

प्रसिध्द नाटके-निर्मिती

  • संगीत कट्यार काळजात घुसली
  • संत तुकाराम
  • संगीत सुवर्णतुला
  • किमयागार
  • अश्रूंची झाली फुले

पुस्तके

  • तोच मी
  • आठवणीतील मोती

पुरस्कार

  • संगीत नाटक आकादमी पुरस्कार
  • महाराष्ट्रभूषण पुरस्कार
  • दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार
  • विष्णूदास भावे गौरवपदक
  • आचार्य अत्रे पुरस्कार

व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने कोलकत्त्यातील ईडन गार्डन वर नाबाद 275 धावा काढून या मैदानावरील सर्वोच्‍च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला.14 मार्च 2001

कोलकाता भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी 2001

            व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने कोलकत्त्यातील  ईडन गार्डन वर नाबाद 275 धावा काढून या मैदानावरील सर्वोच्‍च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात 44 चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली. याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतास फॉलोऑन दिला होता व लक्ष्मणच्या या खेळीमुळे त्यानंतरही हा सामना भारताने जिंकला. शेवटी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या सामन्यात 281 धावांवर बाद झाला. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.

आजचे पुरस्कार

अखिल भारतीय नाट्य परिषदेचा 'चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार' प्रख्यात अभिनेते व दिग्दर्शक पद्मश्री दाजी भाटवडेकर यांना प्रदान. 14 मार्च 1997

लोकसंस्कृतीचे उपासक व संशोधक डॉ. रा.चिं. ढेरे यांना कन्नड साहित्यिक डॉ. एस.एल. भैरप्पा यांच्याहस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.14 मार्च 2010

संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

 

संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21