05 एप्रिल 2021-05 APRIL
05 एप्रिल 2021-05 APRIL
सर जोसेफ लिस्टर यांचा जन्म. 05 एप्रिल 1827
अल्पपरिचय
सर जोसेफ लिस्टर हे प्रसिध्द ब्रिटीश शल्यविशारद होते. शस्त्रक्रियेदरम्यान होणाऱ्या जखमांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या प्रक्रियेचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. सर जोसेफ लिस्टर यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.
अमेरिकन लेखक, सामाजिक कार्यकर्ते बुकर टी. वॉशिंग्टन यांचा जन्म. 05 एप्रिल 1856
अल्पपरिचय
बुकर टॅलियाफेरो वॉशिंग्टन हे अमेरिकन शिक्षणतज्ञ, लेखक, कृष्णवर्णियांसाठी आयुष्य वेचणारे सुधारणावादी समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते.
जन्म
05 एप्रिल 1856 हेल्सफोर्ड,फ्रँकलिन काउंटी, व्हर्जिनिया, अमेरिका
मृत्यू
14 नोव्हेंबर 1915
शिक्षण
हॅम्टन इन्स्टिट्यूट मधून पदवी शिक्षण
कार्य
हेल्सफोर्ड येथील शाळेत शिक्षक कार्यकाळ 1876-1878
हॅम्टन इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षक कार्यकाळ 1879 ते 1881
अलबामा राज्यात कृष्णवर्णियांसाठी उभारण्यात येणाऱ्या महाविद्यालयाचे प्रमुख म्हणून वॉशिंग्टन यांना निवडण्यात आले जे आता टस्कजी इन्स्टिट्यूट म्हणून प्रसिध्द आहे. व त्यामध्ये त्यांनी अनेक व्यवसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण चालू करून हजारो कृष्णवर्णियांना स्वबळावर उभे केले.
निग्रो व्यवसाय संघाचे संस्थापक
कृष्णवर्णियांसाठी काम करताना बुकर यांनी आपले विचार अनेक दैनिके व मासिकांतून, व्याख्यानातून मांडले यातीलच जॉर्जिया राज्यातील ॲटलांटा येथे दिलेले 1895 चे त्यांचे व्याख्यान ॲटलांटा कॉम्प्रोमाइझ नावाने ओळखले जाते.
कृष्णवर्णियांच्या शैक्षणिक,व्यवसायिक व आर्थिक उन्नतीत बुकर यांचे मोलाचे योगदान आहे.
पुस्तके
- अप फ्रॉम स्लेव्हरी
- द स्टोरी ऑफ माय लाइफ अँड वर्ल्ड
- माय लार्जर एज्युकेशन
पुरस्कार
हॉवर्ड विद्यापिठाकडून सन्माननीय एम.ए पदवी
बुकर यांच्या जन्मस्थानास राष्ट्रीय स्मरक करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
समाजसुधारक पंडिता रमाबाई यांचे निधन. 05 एप्रिल 1922
अल्पपरिचय
पंडिता रमाबाई या समाजसुधारक विशेषत: स्त्रीयांच्या त्यातीलही विधवा, परित्यक्त्या, पतिता अशांच्या सर्वांगीण विकास व उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील एक थोर समाजसेविका होत्या.
जन्म
23 एप्रिल 1858 माळहेरंजी,मेंगलोर,म्हैसुर संस्थान,ब्रिटीश भारत
मृत्यू
05 एप्रिल 1922 केडगाव जि. पुणे, ब्रिटीश भारत
शिक्षण
वेदशास्त्र व संस्कृत,मराठी,इंग्रजी,हिंदी,बंगाली,कन्नड,गुजराती,तुळू व हिब्रु अशा अनेक भाषंवर प्रभुत्व व भाषीय साहित्याचा सर्वांगीण अभ्यास
कार्य
प्रसिध्द समाजसुधारक व विधवा, पतिता, परित्यक्त्या स्त्रीयांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या थोर समाजसेविका
बालविवाह,पुर्निविवाह बंदी,केशवपन इत्यादी घातक अन्यायकारक चालीरितींविषयी प्रचंड विरोध करीत त्यांनी पुण्यासह अहमदनगर,सोलापूर,ठाणे,मुंबई,पंढरपूर,बार्शी अशा अनेक ठिकाणी आर्य महिला समाज या महिलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेची स्थापना केली.
मुक्तीसदनची स्थापना पंडिता रमाबाईंनी केली व हिंदू धर्मातील अनिष्ठ चालीरितींबद्दल विरोध करीत अन्य धर्मातील स्वातंत्र्याच्या विशेषत: ख्रिश्चन धर्मातील भूमिकेचा प्रसार केला.
विधवांकरीता शारदा सदनची त्यांनी स्थपना केली. अबला स्त्रीयांना सबला बनविणाऱ्या या मातेने त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराचे अनेक प्रकार संस्थेत सुरू केले जसे की, शेती,विणकाम,मुद्रणकाम अशा अनेक प्रकारचे शिक्षण देऊन स्त्रीयांच्या सर्वांगीण प्रगतीचे कार्य केले.
पुस्तके
- स्त्रीधर्मनीति
- दि हायकास्ट हिंदू वूमन
- इबरी भाषेचे व्याकरण
- नवा करार
- बायबलचे मराठी भाषांतर
- प्रभू येशू चरित्र
- भविष्यकथा
- अ टेस्टीमनी
- मुक्ती फेअर बेल अँड न्यूज लेटर्स
- फॅमिन-एक्सपिरियन्स इन इंडिया
संदर्भ व आभार
https://marathivishwakosh.org/
संकल्पना,संकलन व संपादन
भालचंद्र माधव इनामदार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.