19 फेेब्रुवारी 2021-19 February 2021 शिवजयंती विशेष

 

19 फेेब्रुवारी 2021-19 February 2021 - शिवजयंती विशेष

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. 19 फेब्रुवारी 1630

अल्पपरिचय

    छत्रपती शिवाजी महाराज अर्थात छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. जुलमी,अत्याचारी मुघल,आदिलशाही,कुतुबशाही,निजामशाही,इंग्रज,पोर्तुगीज तसेच इतर अनेक परकीय शक्तींच्या विरूध्द लढून प्रचंड पराक्रम,धैर्य,बुध्दीचातुर्य,मुसद्देगिरी व आई जिजामाता व भवानीमातेच्या आशिर्वादाने  त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. शोषीत,अत्याचारग्रस्त,परकीय आक्रमकांच्या भीतीखाली जगणाऱ्या रयतेला हक्काचे स्वातंत्र्याच्या छत्रछायेत आणले व स्वराज्यासाठी  शिवरायांनी आपले जीवन समर्पित केले. 06 जून 1974 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करीत स्वराज्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले.

जन्म

19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ला

मृत्यू

03 एप्रिल 1680 रायगड किल्ला

कार्य

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक

गनिमी कावा या युध्दनीतीचे शिल्पकार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना

आदिलशाहीतील तोरणा किल्ला वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी  जिंकून घेत महाराजांनी  हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले.

तोरणा सोबतच पुरंदर,सिंहगड-आधीचा कोंढाणा असे अनेक किल्ले जिंकून घेत महाराजांनी स्वराज्याचा विस्तार चालू केला.

शहाजीराजांची सुटका करण्यासाठी मुघल बादशहा शहाजहानची मदत घेत मुसद्देगिरीचे उदाहरण पेश केले.

जावळीचा किल्ला घेऊन कुरापती चंद्रराव मोरे या आदिलशाही सरदाराचा बंदोबस्त केला.

अफजलखान या आदिलशाहीतील मातब्बर सरदाराचा वध केला व आपली जरब बसवण्याचा महाराजांनी प्रयत्न केला.

सेनापती सिध्दी जौहारने पन्हाळ्यास वेढा टाकल्यावर रात्रीत विशाळगड गाठत त्यास शह दिला ज्यामध्ये घोडखिंडींच्या लढाईत विश्वासु बाजी प्रभू देशपांडे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांना साथ केली व महाराज गडावर पोहोचताच आपले प्राण सेाडले ज्यामुळे महाराजांनी या खिंडीचे पावनखिंड असे नामकरण केले.

शाहिस्तेखान हा स्वराज्यात मोठी फौज घेऊन आल्यावर लाल महालातून पळून जाताना त्याची तीन बोटे तुटली व ही नाचक्की झाल्यामुळे मुघल तसेच अनेक शत्रूंवर जरब बसली.

सुरत या तेव्हाच्या सर्वांत मोठ्या व्यापारपेठेची पहिल्यांदा लूट करून महाराजांनी स्वराज्यासाठी पैसा उभा केला.

 मिर्झाराजे जयसिंग यांच्या मोठ्या फौजेसमोर टिकाव लागणार नाही हे लक्षात घेऊन महाराजांनी पुरंदर येथे तह केला व तेवीस किल्ले व प्रदेश मुघलांना दिला.

आग्राभेटीच्या आमंत्रणावरून आपल्या विश्वासु साथीदारांसमवेत औरंगजेबाच्या भेटीसाठी महाराज आग्रा येथे गेले तेथे आपमान झाल्यावर महाराजांना नजरकैदेत ठेवले गेले मिठाईच्या पेटाऱ्यातून महाराजांनी आग्रा येथून निसटत स्वराज्यात पाऊल ठेवले व गेलेला प्रदेश पुन्हा जिंकून घेतला यातीलच एका महत्वाचा कोंढाणा किल्ला सर करताना तानाजी मालुसरे या महाराजांच्या विश्वासु मावळ्याचा मृत्यू झाल्यावर महारजांनी किल्ल्याचे नामकरण सिंहगड असे केले.

सागरी किल्ल्यांची व भक्कम आरमाराची उभारणी केली व विदेशी शत्रूंवर वचक ठेवण्यासाठी जहाजे व गलबते यांची मोर्चेबांधणी केली.

स्वराज्य निर्माण केले असले तरी राजा म्हणून राज्याभिषेक नसल्यामुळे इतर मुसलमान राज्यकर्त्यांनी महाराजांना एक जहागिरदार व वतनदार असेच संबोधले त्यामुळे महाराजांनी 06 जून 1674 रोजी रायगड या आपल्या राजधाीनत आपला राज्याभिषेक करून घेतला व ते ‘प्रौढ प्रताप पुरंदर,गोब्राह्मणप्रतिपालक, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महराज' बनले. या दिवसालाच त्यांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला तसेच शिवराई हे चलन सुरू केले शिवशक सुरू करून शालिवाहनानंतर प्रथमच स्वत:चा शक सुरू करणारे हिंदू राजे म्हणून महाराजांनी  मान्यता मिळविली. यावेळी प्राजाहिताची अनेक कार्ये केली गेली.

शिवरायांनी राज्यकारभार करतानाही अष्टप्रधान मंडळ नेमून प्रशासकीय जबाबदाऱ्यांचे विभाजन केले. समान न्याय,सर्वधर्मसमभाव,कायदा व सुव्यवस्था असणारे राज्य, भक्कम लष्कर,आरमार व शस्त्रांस्त्रांनी समृध्द असे स्वराज्य निर्माण करून महाराजांनी आदर्श घालून दिला.

राज्याभिषेकानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजय साजरा केला व कर्नाटक व इतर दक्षिणेकडची जिंजीसहीत मोठी ठाणी जिंकून स्वराज्यात सामील केली.

साडेतिनशे किल्ल्यांचा समावेश असलेल्या  स्वराज्याची प्रेरणा व चेतना लाखो मराठी जनांच्या ह्रदयात   निर्माण करून महाराजांनी 03 एप्रिल 1680 ला रायगडावर देह ठेवला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म. 

19 फेब्रुवारी 1906

अल्पपरिचय

श्री. माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व्दितीय सरसंघचालक होते.

जन्म

19 फेब्रुवारी 1906 नागपूर, ब्रिटीश भारत

मृत्यू

05 जून 1973

शिक्षण

बनारस हिंदू विश्वविद्यालयातून बी.एस्सी,एम.एस्सी-प्राणीशास्त्र

कार्य

बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्राणीशास्त्राचे प्राध्यपक कार्यकाळ 1933 ते 1936

स्वामी अखंडानंदांकडून गुरूजींनी अनुग्रह घेतला व गुरूंच्या समाधीनंतर राष्ट्रकार्य करण्यासाठी ते बाहेर पडले. दरम्यानच्या काळात डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती राष्ट्रकार्यासाठी गुरूजी संघात सामील झाले.

डॉ. हेडगेवारांच्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा गुरूजींकडे आली व गुरूजींनी आपल्या उत्तुंग व्यक्तीमत्वाने तसेच निरभ्र चारित्र्य व ज्चलंत राष्ट्रनिष्ठा, उत्तम संघटन कौशल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतभरात विस्तार केला काहीकाळ देशद्रोहाच्या आरोपामुळे कारावासही भोगला परंतू तेथून निर्दोष सुटून आल्यावर राष्ट्रउभारणीचे कार्य जोमाने सुरू ठेवले.

डॉ. हेडगेवारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सर्वसमावेशक व मोठे स्वरूप गुरूजींनी प्राप्त करून दिले ज्यासाठी त्यांनी 1940 पासून 33 वर्षे संघाचे सरसंघचालक म्हणून कामगिरी केली व 05 जून 1973 रोजी देह ठेवला.

सन्मान

श्रीगुरूजी गोळवलकर यांच्या स्मृतीप्रत्यर्थ संघाच्या जनकल्याण समितीतर्फे समाजातील विविध क्षेत्रतील नामवंतांना परमपूजनीय श्रीगुरूजी स्मृती पुरस्कार 1997 सालापासून देण्यात येतात. 

थोर समाजसेवक,स्वातंत्र्यसेनानी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन. 19 फेब्रुवारी 1915

अल्पपरिचय

    नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे थोर समाजसेवक,स्वातंत्र्यसेनानी,मवाळ गटाचे  नेते ,अर्थतज्ञ व भारत सेवक समाजचे-सर्व्हेंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे संस्थापक होते.

जन्म

09 मे 1866 कोतळूक, रत्नागिरी, ब्रिटीश भारत

मृत्यू

19 फेब्रुवारी 1915 पुणे, महाराष्ट्र

शिक्षण

बी.ए. गणित

कार्य

सुरवातीला न्यू इंग्लीश स्कूल पुणे येथे शिक्षक

फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे  प्राध्यापक नंतर प्राचार्य महणून कार्य

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो

सार्वजनिक सभेचे सचिव

सुधारक या  पत्राचे सहसंपादक

1905 च्या वाराणसीतील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष

प्रांतिक विधिमंडळात सदस्य म्हणून कार्य

केंद्रीय कायदेमंडळात सदस्य असताना अर्थसंकल्पावरील अनेक भाषणांमधून त्यांनी भारतातील आर्थिक विषमतेवर टीका केली.

मोर्ल‍-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यात ते आग्रभागी होते.

भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक

भारतीय राजकारणातील जहाल व मवाळ गट यातील मवाळ गटाचे प्रतिनिधित्व करणारे प्रमुख नेते

महात्मा गांधी यांनी नामदार गोखले यांना आपले गुरू मानले होते.

भारतातील राजकीय सुधारणांसाठी त्यांनी आवाज उठविला.

सनदशीर मार्गाने सामाजिक सुधारणा, आर्थिक,राजकीय  सुधारणा करीत स्वातंत्र्य मिळवण्याचे विचार असलेले नामदार गोखले हे तत्कालीन भारतातील अर्थतज्ञांपैकी एक होते. सरकार व लोकपक्ष यांत समतोल साधणारे नेते म्हणून तत्कालीन भारतात ते ओळखले जात.

विचारवंत,जोर्तिविद केशव लक्ष्मण दफ्तरी यांचे निधन. 19 फेब्रुवारी 1956

अ‍ल्पपरिचय

केशव लक्ष्मण दफ्तरी हे विचारवंत,जोर्तिविद तसेच गणिततज्ञ होते. होमिओपॅथी,वैदिक धर्म व तत्वज्ञान या विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. केशव दफ्तरी यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या.


संदर्भ व आभार

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://mr.vikaspedia.in/


संकल्पना,संकलन व संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21