नोव्हेंबर 22 दिनविशेष
नोव्हेंबर 22 दिनविशेष
ज्योर्तिविद,गणितज्ञ,विचारवंत केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म.22-11-1880
केशव लक्ष्मण दफ्तरी
हे बुध्दीप्रमाण्यवादी विचारवंत,जोर्तिविद,गणितज्ञ होते. वैदिक धर्म,वाङमय,तत्वज्ञान
तसेच होमिओपॅथी या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.
22-11-1880 नागपूर
मृत्यू
19-02-1956 नागपूर
- बी.ए. नागपूर विद्यापीठ,बी.एल. कलकत्ता विद्यापीठ
- नागपूर विद्यापीठाकडून 1941 साली सन्माननीय डी.लीट.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेची विव्द्दरत्न ही पदवी
- नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये
गणित व संस्कृत विषयाचे शिक्षक
- नागपूर कोर्टात वकील
- राष्ट्रीय महाविद्यालयाचे प्राचार्य
- धर्मनिर्णय मंडळाचे सहसंस्थापक
- होमिओपॅथी व्यवसायिक
- भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग व काहीकाळ तुरूंगवास
- ज्योर्तिगणित व धर्मशास्त्र या विषयांत संशोधन
- युग पाच नाही तर चार हजार वर्षांचेच असते हे सप्रमाण सिध्द केले.
- लो. टिळकांच्या पंचांगशुध्दी चळवळीमध्ये सहभाग
- होमिओपॅथीमध्ये संशोधन व संशोधनपर लेखन
- करणकल्पलता
- महाभारतीय युद्ध कालनिर्णय
- धर्मरहस्य
- भारतीय ज्योतिःशास्त्रनिरीक्षण
- तत्त्वमीमांसापद्धति
- धर्मविवादस्वरूप
- जैमिन्यर्थदीपिका
- विव्द्दरत्न डॉ. दप्तरी–लेखसंग्रह (3 खंड)
- औपनिषदिक जीवनसौख्य- उपनिषदांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ
- 11 उपनिषदांचे मराठी भाषांतर
होमिओपॅथीवरील खालील
ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
- रहस्यवर्णन
- सच्चिकित्साप्रकाशिका
- चिकित्सा परीक्षण
लेबेनॉनला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.22-11-1943
राजधानी-बैरूत
चलन-लॅबेनिझ पाऊंड
अर्थव्यवस्था-पर्यटन,शेती
व उद्योगधंद्यावर आधारित
नाट्यशिक्षक,अभिनेते,दिग्दर्शक पार्श्वनाथ आळतेकर यांचे निधन.22-11-1957
पार्श्चनाथ यशवंत आळतेकर हे मराठी चित्रपटाच्या
सुरवातीच्या काळात दिग्दर्शक तसेच अभिनेते होते. त्यांनी अनेक मूकपटांचे दिग्दर्शन
तसेच त्यामध्ये भूमिकाही केल्या. आळतेकर सरांबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या.
प्रसिध्द टेनिस खेळाडू बोरीस बेकर याचा जन्म. 22-11-1967
बोरीस फ्रान्झ बेकर हा जर्मन माजी टेनिसपटू आहे.
07 जुलै 1985 ला बोरीस बेकरने केव्हीन क्यरनला 4 सेट मध्ये हरवून सर्वांत कमी वयात
17 व्या वर्षात तसेच बिगरमानांकित म्हणून विम्बल्डन स्पर्धा जिंकली. व तो टेनिसस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला.
22-11-1967 लिमन, पश्चिम जर्मनी सध्या जर्मनी
कार्य
पश्चिम जर्मनी व जर्मनीचे टेनिसमध्ये प्रतिनिधित्व
तसेच देशासाठी अनेक स्पर्धा जिंकल्या.
- 1985 विम्बल्डन ओपन-सर्वात कमी वयात 17 व्या वर्षी स्पर्धा जिंकून विक्रम
- 1986,1989 विम्बल्डन ओपन
- 1989 अमेरिकन ओपन
- 1991,1996 ऑस्ट्रेलियन ओपन
- फ्रेंच ओपन 1987,1989,1991 साली उपांत्यफेरित पराभूत
- इतर स्पर्धा-विजेतीपदे
- टूर फायनल-1988,1992,1995
- ग्रँडस्लॅम कप-1996
- डब्ल्यूसिटी फायनल-1988
- ऑलिंपिक दुहेरी सुवर्णपदक मायकेल स्टिच सोबत 1992 साली
- डेव्हिस कप -1988-1989
- होपमन कप ॲनेक ह्यूबर बरोबर-1995
- एकेरी विजेतीपदे 25
- करीयर ग्रँडस्लॅम
- दोनवेळा ऑस्ट्रेलियन विजेता
- फ्रेंच ओपन विजेतीपद
- अमेरिकन ओपन विजेतीपद
- दोनवेळा विम्बल्डन
- दोनवेळा टूर फायनल
- 14 वेळा मास्टर्स् विजेतीपदे
- 1000 इतर विजेतीपदे
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू व कर्णधार मार्वन अट्टापटू
याचा जन्म.22-11-1970
मार्वन सॅमसन अट्टापटू हा श्रीलंकेचा माजी क्रिकेट
खेळाडू व कर्णधार आहे. फलंदाज म्हणून त्याने
श्रीलंका क्रिकेटसाठी योगदान दिले त्याबरोबरच एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही भूषविले.
22-11-1970 कालुथ्रा श्रीलंका
कार्य
श्रीलंकेसाठी अंतरराष्ट्रीय क्रिकेट- 1990 ते
2007
अट्टापटूने कॅनडा,सिंगापूर तसेच श्रीलंकेचे
2014-2015 मध्ये मुख्य प्रशिक्षकपद भूषविले.
मार्वन अट्टापटूने श्रीलंकेसाठी 90 कसोटी व 268
एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. त्याने खेळलेल्या 90 कसोटीमध्ये 38.48 च्या
सरासरीने 16 शतके,17 अर्धशतके व तब्बल 6 व्दिशतके केली. 249 या वैयक्तीक सर्वोच्च धावसंख्येसहीत
एकूण 5502 धावांचे योगदान दिले. तर 268 एकदिवसीय सामन्यात 37.57 च्या सरासरीने 11 शतके
तसेच 59 अर्धशतकांसहीत 8529 धावा जमविताना 132 धावांची सर्वोच्च खेळी केली.
संदर्भ व आभार
https://vishwakosh.marathi.gov.in/
Photo by Albert Lee from FreeImages

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in comment.