आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-06-10-2020

 

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-06-10-2020

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-06-10-1779
ब्रिटीश इंडियाच्या तत्कालीन बॉम्बे(मुंबई) प्रांताचे गर्व्हनर एलफिन्स्टन यांचा जन्म.

अल्पपरिचय

माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन हे ब्रिटीश इंडियातील तत्कालीन मुंबई प्रातांचे गर्व्हनर, प्रशासक इतिहासकार होते.त्यांनी सामाजिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रात काम केले.

जन्म

 06-10-1779 डम्बरटोन,डम्बरटोनशाअर ,स्कॉटलंड

मृत्यू

20-11-1859 हुकवूड,सरे,इंग्लंड

कार्य

  • बॉम्बे आताचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर कार्यकाळ 01-11-1819 ते 01-11-1827
  • विविध शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत सहभाग उदा. एलफिन्स्टन कॉलेज

पुस्तके

  • दि हिस्ट्री ऑफ इंडिया भाग 1-इयर 1841
  • दि हिस्ट्री ऑफ इंडिया भाग 2 -इयर 1841

 

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-06-10-1893
थोर भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांचा जन्म.

अल्पपरिचय

मेघनाद साहा हे पदार्थविज्ञान खगोलभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताचे पहिले राष्ट्रीय पंचांगकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे.

जन्म

06-10-1893 ढाका ब्रिटीश इंडिया , सध्या बंग्लादेश

मृत्यू

16-02-195‍6 नवी दिल्ली, भारत

शिक्षण

  • ढाका कॉलेज
  • प्रेसिडन्सी कॉलेज कलकत्ता

कार्य

  • आलाहाबाद विश्वविद्यालय सध्याचे प्रयागराज मध्ये प्राध्यापक
  • प्रेसिडन्सी कॉलेज कलकत्ता मध्ये विज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक
  • भारताचे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली बनविण्यात आले.
  • भारताचे संसद सदस्य 1952
  • सहा यांनी सौर किरणांचे वजन दाब याबद्दल ही संशोधन केले.
  • आलाहाबाद विश्वविद्यालयाच्या पदार्थविज्ञान शास्त्र विभागाचे संस्थापक
  • इनस्टिट्यूट  ऑफ न्यूक्लीअर फिजिक्स -कलकत्ता
  • विविध सरकारी प्रकल्पात सहभाग
  • दामोदर व्हॅली प्रकल्पात चीफ आर्किटेक्ट

प्रमुख शोध

तार्यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. ज्याला साहा आयन समीकरण ही म्हणतात.

 

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-06-10-1913
कवी, लेखक वा.रा. कांत यांचा जन्म.

अल्पपरिचय

वा.रा. कांत तथा वामन रामराव कांत हे थोर मराठी कवी, भावगीतकार,लेखक होते. त्यांची सखी शेजारणी तू हसत रहा, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात अशी भावगीते तसेच वेलांटी सारखे अनेक काव्यसंग्रह प्रसिध्द आहेत.

जन्म

06-10-1913

मृत्यू

08-09-1991

कार्य

  • विहंगमाला या नियतकालिकाचे संपादक
  • निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक
  • निजाम सरकारच्याच हैदराबाद, औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर मराठी विभागप्रमुख
  • भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रावर काम

साहित्य

  •  दोनुली
  • पहाटतारा
  • वाजली विजेची टाळी
  • बगळ्यांची माळ
  • वेलांटी
  • शततारका
  • सहज लिहिता लिहिता
  • मरणगंध
  • मावळते शब्द
  • रूद्रवीणा

गाजलेली गाणी

  • बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात....
  • त्या तरूतळी विसरले गीत.........
  • सखी शेजारणी तू हसत रहा.....
  • राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे......

सन्मान पुरस्कार

  • महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङमयसेवेसाठी सन्मान
  • महाराष्ट्र साहित्य परिषद हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङमयसेवेसाठी सन्मान
  • हाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे सन्मान
  • वेलाटी, मरणगंध या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
  • दोनुली मावळते शब्द या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा केशवसूत पुरस्कार

 

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-06-10-1963
सांगली  आकाशवाणी केंद्र सुरू झाले.

'हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे सकाळचे सात वाजून दहा मिनिटे झाली आहेत आता पुणे केद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या प्रसारित करीत आहोत' असे ऐकू  आले की समजायचे सकाळी 7 वाजले. असा सांगली शहरातील बऱ्याच नागरीकांचा  सकाळचा दिनक्रम ठरलेला असतो. 1251 मेगाहर्टझवर असलेले सांगली आकाशवाणी केंद्र आज 06 ऑक्टोबर ला 57 वर्षे पूर्ण करीत आहे त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.असेच वेगवेगळे कार्यक्रम आम्हा श्रोत्यांना ऐकायला मिळोत ही सदिच्छा.

 

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-06-10-1987
फिजी प्रजासत्तक बनले.

फिजी

फिजी हा दक्षिण प्रशांत महासागरातील एका बेटावरील देश असून न्यूझीलंड च्या ऑकलंड पासून जवळ आहे. हा एक नैसर्गिक साधनसंपत्तीने समृध्द देश असून रिपब्लिक ऑफ फिजी या अधिकृत नावाने ओळखला जातो.

देश -रिपब्लिक ऑफ फिजी किंवा फिजी

राजधानी- सुवा

राष्ट्रभाषा- फिजी इंग्लीश,फिजी हिंदी, रोटूमन

चलन-फिजीयन डॉलर

अर्थव्यवस्था-पर्यटन,खानिज, कृषी अधारित

र्म-हिंदू,ख्रिश्चन इतर

फिजी 1874 पासून ब्रिटनची एक वसाहत होती. ब्रिटीश इंडियाच्या काळात येथे भारतीय विशेषत: युध्दकैदी यांना शेतमजूर म्हणून ऊस इतर नगदी पिकांच्या शेतात राबण्यासाठी आणले जात असे.  1970 मध्ये फिजीला ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले. 1987 साली झालेल्या सशस्त्र क्रांतीनंतर हे प्रजासत्ताक म्हणून अस्तित्वात आले. फिजी संसदीय प्रतिनिधी लोकशाहीचे पालन करते, तरीही येथील सरकारवर लष्कराचे नियंत्रण असते.

 

संदर्भ व आभार- आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-06-10-2020

https://www.google.com/

https://www.wikipedia.org/

https://www.facebook.com/AkashvaniAIR/posts/

https://www.marathisrushti.com/profiles/kavivarya-va-ra-kant/

Image by Gerd Altmann from Pixabay 

 

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-06-10-2020
संकल्पना,संकलन,संपादन

भालचंद्र माधव इनामदार

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21