आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-2020

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-2020

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-2020
आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-2020


आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-1670
छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली.

सुरत व छत्रपती महाराज

छत्रपती शिवाजी महाराज "असा राजा होणे नाही" असे ज्याच्यांबद्दल बोलले जाते असे आदरणीय महाराज. महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रचंड कष्ट केले, यामध्ये जशी त्यांना मावळ्यांची साथ मिळाली तशी जनतेनेही दिली, पण स्वराज्या सारखे मोठे कार्य करावयाचे त्यासाठी पैसा लागतो. तो मिळवण्यासाठीच मग सुरतेवर स्वारी केली कारण त्या काळात सुरत ही मोगल साम्राज्याची मोठी बाजारपेठ होती, त्यामुळे सुरतेवर स्वारी केल्यास धनही मिळेल व मोगलांवर जरबही बसेल अशा दुहेरी हेतूने महाराजांनी सुरत लुटायचे निश्चित केले पण ते करताना तिथल्या जनतेला त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली. सुरत लुटीसाठीही कारणे होती. सुरतेच्या 1666 च्या पहिल्या लुटीनंतर औरंगजैब भयंकर चिडला होता. त्यानंतर पुरंदरचा 23 किल्ल्याचा तह,अग्राभेट इ. गोष्टींमुळे स्वराज्याचे नुकसान  झाले. त्यामुळे अग्र्याहून सुटून आल्यावर महाराजांनी  काहीकाळानंतर सक्रीय होत, सुरत लुटीचा विचार केला व सत्यात उतरविला,दुसरीकडे सुरतेचा मोगल सरदार हा मराठे सध्या कमकुवत आहेत अशा अर्विभावात निर्धास्त होता. पण इंग्रजांना कल्पना होती त्यामुळे त्यांनी त्यांची वखार हलविली. ता 02 ऑक्टोबर ला महाराज निघाले व कल्याणमार्गे सुरतेला पोचले व पुढचे तीन दिवस सुरतेतील श्रीमंत व्यापारी,मोठे सरदार या सर्वांना लक्ष्य करत जवळजवळ 60 लाखांतून अधिकचा ऐवज लुटला त्यामध्ये माणिक, मोती,पाचू, पोवळे,हिरे ,मोहरा,नाणी इ. मौल्यवान सामुग्रीची लूट केली. पण या सर्वांत सामान्य जनता व  अध्यात्मिक लोकांना कसलाही त्रास होऊ दिला नाही. हे महाराजांचे वेगळेपण होते.

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-1867
संशोधक एलियास होवे यांचे निधन

अल्पपरिचय

एलियास होवे हा रोजच्या वापरातील सर्वांच्या परिचयाच्या शिवणयंत्राचा संशोधक होता.

जन्म

09-07-1819 स्पेन्सर मॅस्युचुएटस अमेरिका

मृत्यू

 03-10-1867 ब्रुकलिन, न्यूयॉर्क अमेरिका

शिक्षण‍

मेकॅनिकल इंजिनियर

कार्य

आपल्या लॉकस्विच शिवणयंत्रासाठी होवे ओळखला जातो. 10-09-1846 साली होवेला त्याच्य लॉकस्विच शिवणयंत्रासाठी अमेरिकन पेटंट मिळाले. आणि अशारितीने होवे हा अधुनिक शिवणयंत्राचा उद्गाता झाला.

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-1903
भारतीय स्वातंत्र्यसैनिक,समाजसुधारक स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म

अल्पपरिचय

व्यंकटेश भगवान खेडगीकर उर्फ स्वामी रामानंद तीर्थ हे थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक होते. हैदराबाद मुक्तीसंग्रामामुळे ते प्रसिध्द होते.

जन्म

03-10-1903 सिंदगी, विजापूर

मृत्यू

22-01-1972 हैदराबाद

शिक्षण

  • इतिहास,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र विषयांसहित टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून बी.ए. पदवी संपादन केली.
  • लोकशाहीचा विकास हा प्रबंध लिहून एम.ए. ची पदवी संपादन केली.

कार्य

  • ना.म. जोशी यांचे स्वीय सहाय्यक
  • गिरणी कामगारांच्य चळवळीत काम
  • हिप्परगा जि.उस्मानाबाद येथे स्वामी नारायण तीर्थ यांच्याकडून दीक्षा घेऊन संन्यस्त झाले व स्वामी रामानंद तीर्थ बनले.
  • हिप्परगा येथे शिक्षण संस्थेची स्थापना
  • योगेश्वरी नूतन विद्यालयात शिक्षक
  • हैदराबाद मुक्तसंग्राम चळवळ व त्यात तब्ब्ल 10 वर्षे अनेक वेळा कारावास
  • 1948 साली हैदराबादच्या निजामाविरूध्द सशस्त्र क्रांती करण्याचे आवाहन
  • स्वामीजींच्या आवाहनानंतर हैदराबाद मुक्तीसंग्राम धगधगत होता. याची दखल भारत सरकारला घेणे भाग पडले व त्यानंतर पोलिस कारवाई करून हैदराबाद स्वतंत्र याबद्दल अधिक वाचा
  • गुलबर्गा मतदारसंघातून लोकसभेत खासदार - भाषावार प्रांतरचनेसाठी कार्य व मराठवाडा महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न केला.
  • औरंगाबाद मतदारसंघातून पुन्हा खासदार होत त्यांनी 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेबरोबरच मराठवाड्याचा महराष्ट्र प्रवेश घडविला.

 आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-1907
मराठी लेखक,कवी ,इतिहासकार नरहर शेषराव  पोहनेरकर यांचा जन्म

ल्पपरिचय

 नरहर शेषराव पोहनेरकर हे मराठी लेखक, कवी,इतिहासकार होते. मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास म्हणून ते प्रसिध्द होते.


जन्म

03-10-1903


मृत्यू

02-09-1990


कार्य

  • हैदराबाद संस्थानात मराठी भाषेच्या प्रचार व प्रसार करण्याचे कार्य
  • मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रणेते
  • प्रोफेसर नावाचे हस्तलिखित चालू केले.
  • गडकरींच्या  राजसंन्यास नाटकाचे प्रयोग केले.
  • प्राचीन शिलालेख, ताम्रपटांवर संशोधन
  • विधानसभेचे ग्रंथपाल  म्हणून कार्य
  • औरगाबादच्या पुरातत्व खात्यात नोकरी
  • दासोपंत पासोडीचे प्रकाशन
  • भावार्थ रामायणाच्या चिकित्सक प्रतीची सिध्दता
  • कैलासाचा कलावंत ही कादंबरी
  • बागशाही हा कवितासंग्रह
  • विरलेल्या गारा या सग्रहातील व्यक्तीचित्रे गाजली.

सन्मान

  • ग्रंथालय शाखा संमेलनाचे अध्यक्ष 1955
  • मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 1961 

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-1919
नोबेल पुरस्काराचे मानकरी जेम्स बुकॅनन यांचा जन्म


अल्पपरिचय

जेम्स एम. बुकॅनन हे 1986 च्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी आहेत.


जन्म

03-10-1919 टेनिसी अमेरिका


मृत्यू

05-12-2007


शिक्षण

  • व्हर्जीनिया विद्यापीठ
  • व्हर्जीनिया पोलिटेक्नीक इन्स्टीट्यूट

कार्य

  • अर्थशास्त्रातील संशोधन गॉर्डन ट्ल्क बरोबर मिळून त्यांनी पब्लिक चॉइस थेअरी सिध्दांत मांडला.
  •  अर्थशास्त्रावर मूलभूत संशोधन
  • आपले विचार मांडण्यासाठी संवैधानिक अर्थशास्त्र नावाचे वृत्तपत्र
  • साऊथ इकॉनॉमिक या संस्थेचे अध्यक्ष- 1963
  • वेस्ट इकॉनॉमिक या  संस्थेचे अध्यक्ष- 1983
  • अमेरिकन इकॉनॉमिक्स मध्ये उपाध्यक्ष-1971
  • जेम्स बुकॅनन यांना 1986 साली त्यांच्या  "Development of the contractual and constitutional bases for the theory of economic and political decision-making" साठी नोबेल पुरस्काराने नावाजले गेले.

पुस्तके

  • The Collected Works of James M. Buchanan. (With Gordon Tullock)
  • The Calculus of Consent-Logical Foundations of Constitutional Democracy. Year 1962
  • Cost and Choice. 1969
  • The Demand and Supply of Public Goods. 1968
  • Freedom in Constitutional Contract. 1977
  • The Limits of Liberty. (With Robert P. Tollison.)1975
  • The Power to Tax.(With Geoffrey Brennan.) 1980

पुरस्कार

  • नोबेल पुरस्कार 1986

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-1932
इराकला युनायटेड किंग्डम कडून स्वातंत्र्य मिळाले.


इराक

इराक हा अतिप्राचीन इतिहास असलेला एक प्रजासत्ताक देश आहे.

राजधानी-बगदाद

राष्ट्रभाषा-अरबी, तुर्कस्तानी

राष्ट्रीय चलन-इराकी दिनार

सीमा-पूर्वेला इराण,दक्षिणेला सौदी अरेबिया,अग्नेयेला कुवेत,पश्चिमेला जॉर्डन,वायव्येला सिरिया व उत्तरेला तुर्कस्तान

धर्म-इस्लाम

अर्थव्यवस्था-खनिज तेलावर अवलंबून

इतिहास-

    इराक(मोसेपोटेमिया) हा अतिप्राचीन देशांपैकी एक असून पूर्वी त्याचे नाव मोसेपोटेमिया असे होते.  हडप्पा संस्कृतीतील लोकांबरोबर इराकचा व्यापार चालत असे,तेव्हा इराक(मोसेपोटेमिया) सुमेरियन संस्कृतीचा भाग होता. 1534 पासून पहिल्या महायुध्दाच्या काळापर्यंत इराकमध्ये ऑटोमन तुर्कांचे राज्य होते. पहिल्या महायुध्दात ब्रिटनने त्यांना हरवून मोसेपोटेमिया वर विजय मिळविला. ब्रिटनने मोसेपोटेमियाचे नाव बदलून इराक असे केले.   ब्रिटनने भारताप्रमाणेच इराकची प्रचंड लूट केली. शेवटी फैजल राजाकरवी हिंसक युध्दानंतर ब्रिटनने इराकचे 03-10-1932 साली स्वातंत्र्य बहाल केले. दुसऱ्या महायुध्दात पुन्हा ब्रिटनने इराक जिंकले व 1958 पर्यंत आपले मांडलिकत्व घेण्यास भाग पाडले शेवटी 1958 साली इराक पुन्हा स्वतंत्र व प्रजासत्ताक बनला. इराक व इराण मध्ये  चाललेल्या अखाती युध्दात इराक अमेरिकेच्या बरोबर होता. पण त्यानंतर सद्दाम हुसेन यांच्या हुकुमशाही राजवटीला विरोध अमेरिकेने केला. त्यासाठी इराकमध्ये रासयनिक अस्त्रे आहेत असे सांगितले व हुसेन यांची सत्ता उलथविली. आताच्या इराकमध्ये जरी प्रजासत्ताक सरकार असले तरी दहशतवादाने संपूर्ण देश पोखरला गेला आहे.

 

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-1959
विडंबनकार दत्तात्रय तुकाराम बांदेकर उर्फ सख्याहारी यांचे निधन

अल्पपरिचय

विडंबनकार दत्तात्रय तुकाराम बांदेकर हे सख्याहारी नावाने विनोदी लेखन करत असत. यांच्याबद्दल अधिक वाचा

 

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-1990
पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण- जर्मन एकता दिन


जर्मनी

    जर्मनी दोन जागतिक महायुध्दातील एक प्रमुख देश  असलेला जर्मनी रोमन साम्राज्याचा एक भाग होता. 1871 मध्ये सर्वप्रथम जर्मनांचे एकत्रीकरण करून अखंड जर्मन साम्राज्याची स्थापना करण्यात आली. अफ्रिेकेतील वसाहती स्थापन करण्यावरून युरोपीय देशांत जर्मनीविरूध्द वातावरण तयार झाले याची परिणती पहिल्या महायुध्दात झाली. व 1918 मधील दोस्त राष्ट्रांच्या विजयानंतर जर्मनीवर व्हर्सायच्या तहाव्दारे अनेक जाचक अटीशर्ती लादण्यात आल्या ज्याची परिणती पुढे 1939 मध्ये दुसऱ्या महायुध्दात झाली. ॲडॉल्फ हिटलरने 1933 मध्ये सर्वाधिकार स्वत:कडे घेत विकास धोरणे राबवायला सुरवात केली, त्यामुळे सुरवातीला जर्मनी जागतिक मंदीतून बाहेर पडला. त्यानंतर  पोलंड सहीत अनेक देश जिंकत जर्मनी पुढे जात राहिली. याच सुमारास ब्रिटन, फ्रान्स सहीत अनेक देश जर्मनीविरूध्द उभे ठाकले व त्यांनी जर्मनीला 1945 साली पराभूत केले, जर्मनीचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर ब्रिटन,फ्रान्स अमेरिका यांच्या अधिपत्याखालील भाग हा पश्यिम जर्मनी तर सोविएत संघाच्या अधिपत्याखालील भाग हा पूर्व जर्मनी म्हणून जाहीर करण्यात आला. पश्चिम जर्मनीने प्रचंड प्रगती केली तर पूर्व जर्मनी सोविएत संघाच्या साम्यवादी विचरांमुळे आर्थिक गर्तेत अडकला. लोक पूर्व जर्मनीतून पश्चिम  जर्मनीत बेकायदेशीरपणे घुसू लागले म्हणून मग बर्लिनची भिंत उभारण्यात आली व त्याव्दारे स्थलांतर काहीकाळ थांबले. परंतू पुन्हा अखेरीस या सर्वाची परिणती पूर्व व पश्चिम जर्मनी एकीकरणात झाली व  आजच्याच दिवशी 1990 साली आजचा अधुनिक जर्मनी देश अस्तित्वात आला.

देश- जर्मन सघराज्याचे प्रजासत्ताक

राजधानी-बर्लीन

राष्ट्रभाषा-जर्मन

राष्ट्रीय चलन-युरो

अर्थव्यवस्था-प्रगत विकसित अर्थव्यवस्था, औद्योगिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रभागी, जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

 

संदर्भ व आभार-आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-2020

https://www.google.com/

https://www.wikipedia.org

https://www.inmarathi.com/53786/the-second-invasion-of-surat-by-shivaji-maharaj

https://vishwakosh.marathi.gov.in

https://azadi.me/profile-james-m-buchanan

https://maharashtranayak.in/paohanaerakara-narahara-saesaraava

 

 

 

आजचा-दिनविशेष-aajcha-dinvishesh-03-10-2020
संकल्पना,संकलन,संपादन
भालचंद्र माधव इनामदार
 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

13 ऑक्टोबर दिनविशेष-13 october dinvishesh-13-10-2020

ऑक्टोबर 14 2020-आजचा दिनविशेष- october 14 2020-aajcha dinvishesh

2020 ऑक्टोबर 21-2020 october 21