30 नोव्हेंबर 2021-30 November
30 नोव्हेंबर 2021-30 November सुप्रसिध्द मराठी कवी बा. भ. बोरकर यांचा जन्म. 30 नोव्हेंबर 1910 अल्पपरिचय बाळकृष्ण भगवंत तथा बा. भ. बोरकर हे मराठी व कोकणी भाषेतील प्रसिध्द कवीपैकी एक होते. कवितेसोबतच त्यांनी नाटक, अनुवाद, कादंबरी, कथा, चरित्र, ललित यांमध्येही मराठी तसेच कोकणी भाषेत विपुल साहित्यनिर्मिती केली. बाकीबाब या टोपणनावाने त्यांना ओळखले जाते. बा. भ.बोरकर यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या. बार्बाडोसला युनायटेड किंग्डम कडून स्वातंत्र्य. 30 नोव्हेंबर 1966 बार्बाडोस बार्बाडोस हा कॅरेबियन व्दीपसमूहातील एक देश असून बार्बाडोसला 30 नोव्हेंबर 1966 रोजी युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले. 30 नोव्हेंबर 2021 रोजी हा देश प्रजासत्ताक बनला. देश : रिपब्लिक ऑफ बार्बाडोस राजधानी : ब्रिजटाऊन राष्ट्रभाषा : इंग्लीश व बजन केरोल चलन : बार्बाडियन डॉलर सीमा : बार्बाडोसच्या सीमा पूर्वेस विंडवेड लेसर अंतीलिसचा भाग, सेंट लुसिया, सेंट व्हिनसेंट व ग्रनेड्स तसेच दक्षिणपूर्व मार्टीनेक तसेच उत्तर पूर्वेस त्रिनिदाद v टोबॅको ला मिळतातं. अर्थव्य...