31 डिसेंबर 2021-31 December
31 डिसेंबर 2021-31 December ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना . 31 डिसेंबर 1600 ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी . ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ही खाजगी व्यापार कंपनी होती , ज्या कंपनीने सुरूवातीला भारतात आपला व्यापार विविध ठिकाणी विस्तारून आपले अस्तित्व तयार केले व नंतर भारतावर आपले एकहाती वर्चस्व स्थापन करून भारतात आपले शासन निर्माण केले . ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीची सुरूवात 31 डिसेंबर 1600 रोजी ब्रिटनची राणी एलिझाबेथ प्रथमने आपल्या एका घोषणापत्राव्दारे केली . ही कंपनी लंडनच्या व्यापाऱ्यांनी स्थापलेली व्यापार कंपनी होती व तिला शाही अधिकार पत्राव्दारे जगात पूर्व भागात व्यापार करण्याची परवानगी मिळाली होती . ईस्ट इंडिया कंपनीने 1608 साली भारतात सुरत येथे व्यापारासाठी आपले केंद्र स्थापन केले त्याआधी कंपनीला पोर्तुगीजांकडून प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला परंतू डच इस्ट इंडिया कंपनीशी ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने संधान साधून पोर्तुगीजांचा पराभव करत अनेक शाही अधिकार प्राप्त केले ज्यानुसार बंगाल , मद्रास , मुंबई इत्यादी ठिकाणी आपले अस्तित्व तयार केले सुरू...