31 ऑक्टोबर 2021- October 31
31 ऑक्टोबर 2021 - October 31 भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म . 31 ऑक्टोबर 1875 अल्पपरिचय सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री , उपपंतप्रधान व काँग्रेसचे प्रसिध्द नेते होते . भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले . स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून त्यांनी स्वातंत्र्यानंतरच्या दंगलींवर नियंत्रण मिळवले व तत्कालीन भारतात अस्तित्वात असणारी संस्थाने जसे की जुनागढ , हैदराबाद , जम्मू - काश्मीर या संस्थानांचे विलिनीकरण करण्यासाठी परिश्रम घेतले , प्रसंगी सैन्यकारवाई व पोलिसकारवाईही केली . भारताचे सार्वभौमत्व अखंडित ठेवून ही व अशी अनेक संस्थाने विलिनीकरण केल्यामुळे त्यांना भारताचे लोहपुरूष म्हणून संबोधण्यात आले . सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या . भारतात आलेल्या महाविध्वंसकारी चक्रीवादळात दोन लाखांहून अधिक जीवितहानी . 31 ऑक्टोबर 1876 1876 बंगाल चक्रीवादळ भारतात 29 ऑक्टोबर 1876 पासून सुरू झालेल्या बकरगंज , ब्रिटीश भारत सध्या बरीसल , ...