30 सप्टेंबर 2021-September 30-जागतिक सागरी दिन विशेष
30 स प्टेंबर 2021 -September 30- जागतिक सागरी दिन विशेष जागतिक सागरी दिवस -World Maritime Day. 30 सप्टेंबर 2021 जागतिक सागरी दिन जागतिक सागरी दिन 30 सप्टेंबर रोजी जगभर साजरा केला जातो . लाखो नाविकांच्या त्याग , समर्पण व व्यवसायिकतेबद्दल कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो . जगातील नाविकांनी केलेल्या कार्यामुळे आज जगाच्या प्रत्येक भागात आपल्याला गरजेची औषधे , खाद्यपदार्थ , गरजेच्या वस्तू मिळतात . सागरी मालवाहतूक सुव्यवस्थीत व कोणत्याही अडथळ्याविना होण्यासाठी मर्चंट नेव्हीतील लोक रात्रंदिवस कार्यरत असतात . नाविक लोक आपल्या देशापासून , शहरापासून , कुटुंबापासून कित्येक महिने दूर राहत आपली सेवा निळ्याशार समुद्राच्या विविध जहाजांवर बजावत असतात . याच त्यांच्या त्यागामुळे आज जागतिक व्यापार सुनियोजित राहिलेला आहे . कोवीड -19 महामारीमध्येसुध्दा त्यात खंड न पडता अनेक महत्वाची उत्पादने जगातील कानाकोपऱ्यात पोहचविण्याचे महत्वाचे कार्य या लोकांनी केले आहे . सन 2021 साठी या दिवसाचा विषय हा ''seafarers at the core of shipping’s future. " म्हणजेच जहाज म...