पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जून 30 2021- 30 June

  जू न 30 2021 - 30 June प्रसिध्द नेते व काँग्रेसचे एक संस्थापक दादाभाई नौरोजी यांचे निधन. 30 जून 1917 अल्पपरिचय दादाभाई नौरोजी हे भारतीय राष्ट्रवादी नेते,विव्दान,लेखक,राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक व काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष तसेच लिबरल पक्षाचे ब्रिटीश संसदीय सदस्य होते. जन्म 04 सप्टेंबर 1825 नवसारी, बॉम्बे प्रेसिडन्सी, ब्रिटीश भारत मृत्यू 30 जून 1917 बॉम्बे, ब्रिटीश भारत शिक्षण एलफिन्स्टन कॉलेज बॉम्बे, ब्रिटीश भारत कार्य प्रसिध्द भारतीय राष्ट्रवादी नेते,विव्दान,लेखक बडोदा संस्थानात दिवाण एलफिन्स्टन कॉलेज येथे गणिताचे प्राध्यापक युनिर्व्हसिटी ऑफ लंडन येथे गुजरातीचे प्राध्यापक दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केलेल्या संस्था व चालू केलेली नियतकालिके गाईड्स ऑन दि माध्यासन पाथ दि ट्रुथ टेलर-रास्ट गोफ्टर-वृत्तपत्र दि व्हाईस ऑफ इंडिया-वृत्तपत्र लंडन इंडियन सोसायटी दि झोरास्ट्रीयन ट्रस्ट फंड्स ऑफ युरोप दादाभाई नौरोजी ॲन्ड कंपनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दादाभाई नौरोजी फिन्सबरी सेंट्रलमधून ब्रिटीश संसदेवर निवडून गेले तेथे त्यांनी 1892 ते 1895 ...

29 जून 2021-June 29

  29 जू न 2021 -June 29 प्रसिध्द नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म. 29 जून 1871 अल्पपरिचय श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मराठीतील प्रसिध्द नाटककार व विनोदकार,लेखक,कवी व ज्योतिषतज्ञ   होते. 'बहु असोत सुंदर संपन्न की महा' या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते प्रसिध्द आहेत. जन्म 29 जून 1871 अकोला, ब्रिटीश भारत मृत्यू 01 जून 1934 जामोद,जळगाव, ब्रिटीश भारत शिक्षण एल.एल.बी. कार्य प्रसिध्द नाटककार,लेखक,कवी व समीक्षक तसेच ज्योतिषतज्ञ साहित्य नाटके परिवर्तन गुप्तमंजुषा जन्मरहस्य मतिविकार मायाविवाह मूकनायक वीरतनय श्रमसाफल्य वधूपरीक्षा सहचारिणी इतर लेखन श्यामसुंदर-कादंबरी सुदाम्याचे पोहे-विनोदी लेख अठरा धान्यांचे कडबोळे-विनोदी लेख संकलन ज्योतिषगणित-कादंबरी सन्मान 13 व्या मराठी साहित्य संमेलन-पुणे याचे अध्यक्ष -1927 पुणे येथील दुसऱ्या कविसंमेलनाचे अध्यक्ष तिसऱ्या जोतिषपरिषदेचे अध्यक्ष भारतीय संख्याशास्त्राचे जनक प्रसंत चन्द्र महालनोबिस यांचा जन्म. 29 जून 1893 अल्पपरिचय प्रसंत चन्द्र महालनोबिस हे भारतीय संख्याशास्त्र...

28 जून 2021-28 June

  28 जू न 2021-28 June व्हिक्टोरिया राणीचा राज्याभिषेक 28 जून 1838 राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक      राणी व्हिक्टोरिया तथा ॲलेक्झांड्रिना व्हिक्टोरिया ही इंग्लंड व आर्यर्लंडची राणी होती. ब्रिटनचे राजे चौथे विल्यम यांचा 20 जून 1838 रोजी निधन झाले त्यांची मुले अकाली निधन पावल्यामुळे व्हिक्टोरिया राणीकडे राज्यकारभार आला व तिचा 28 जून 1838 रोजी विधिवत राज्याभिषेक करण्यात आला. व्हिक्टोरिया राणीचा राज्यकारभार सुमारे 63 वर्षे चालला, या इतक्या दीर्घकालीन कार्यामुळे या काळाला आदराने व्हिक्टोरियन युग असे संबोधले जाते. राणी व्हिक्टोरिया यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या . ॲडॉल्फी सॅक्स याने सॅक्सोफोनचे पेटंट घेतले. 28 जून 1846 सॅक्सोफोन      सॅक्सोफोन हे एक प्रसिध्द वाद्य असून त्याची निर्मिती ॲडॉल्फी सॅक्स याने 1840 साली केली. 28 जून 1846 रोजी सॅक्सोफोनचे पेटंट पॅरिस, फ्रान्स येथे घेतले. ब्रासपासून बनविलेले हे वाद्य अनेक प्रकारच्या बॅण्डमधील प्रमुख वाद्य असते. लष्करी बॅण्ड मध्येही याचा समावेश असतो. सॅक्सोफोन व ॲडॉल्फी सॅक्स यांच्याबद्दल अ...

27 जून 2021- June 27

  27 जून 2021- June 27 बंगाली कादंबरीकार,कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. 27 जून 1838 अल्पपरिचय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली कादंबरीकार,कवी व पत्रकार होते. वंदे मातरम चे रचनाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या आनंदमठ कादंबरीतून हे गीत घेतलेले आहे. जन्म 27 जून 1838 नैहाती,बंगाल प्रेसिडन्सी, ब्रिटीश भारत मृत्यू 08 एप्रिल 1894 कलकत्ता,बंगाल प्रेसिडन्सी, ब्रिटीश भारत शिक्षण प्रेसिडन्सी कॉलेज कलकत्ता मधून कलाशाखेत पदवी कायदा पदवी कलकत्ता विद्यापीठ 1869 कार्य ब्रिटीश भारतीय प्रशासकीय सेवेत उपदंडाधिकारी म्हणून सुरूवातीला जेसुर येथे कार्य ब्रिटीश भारतीय प्रशासकीय सेवेत सेवा समायोजन झाल्यानंतर उपदंडाधिकारी व उपजिल्हाधिकारी म्हणून कार्य प्रसिध्द बंगाली लेखक,कवी,पत्रकार वंदे मातरम चे रचनाकार प्रसिध्द साहित्य दुर्गेशनंदिनी कपालकुंडला देवी चौधुराणी आनंदमठ विशाभ्रिक्शा स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शिवराम हरी परांजपे यांचा जन्म. 27 जून 1864 अल्पपरिचय शिवराम हरी परांजपे हे स्वातंत्र्यसै‍निक,पत्रकार,लेखक होते. 'काळ' या नियतकालिकामुळ...

26 जून 2021-जागतिक मादक पदार्थ सेवनविरोधी दिन विशेष

  26 जू न 2021 -जागतिक मादक पदार्थ सेवनविरोधी दिन विशेष जागतिक मादक पदार्थ सेवनविरोधी दिन. 26 जून 2021      आजच्या जागतिक मादक पदार्थ सेवनविरोधी दिन 26 जून रोजी जगभर साजरा केला जातो. ज्या पदार्थाच्या सेवनाने धुंदी,नशा येते अशा पदार्थांचा समावेश मादक पदार्थात होतो त्यामध्ये अफू,गांजा,हेरॉईन,कोकेन अशा अनेक पदार्थांचा समावेश होतो. या पदार्थांचे अधिक सेवन केल्यास त्याची सवय लागून आरोग्यावर प्रचंड गंभीर दुष्परिणाम होतात. हा विचार व याची गंभीरता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांनी 07 डिसेंबर 1987 च्या आपल्या ठरावाव्दारे 26 जून हा दिवस मादक पदार्थ सेवनविरोधी दिन म्हणून घोषीत केला तेव्हापासून जागतिक पातळीवर हा दिवस साजरा करण्यात येतो. भारतात या प्रकाराचा झालेला शिरकाव व त्याचे भयानक परिणाम यांचा विचार करून भारत सरकारने संविधानाच्या कलम 47 नुसार 1985 सालीच यावर निर्बंध घातले तरीही चोरट्या मार्गाने होणारी याची तस्करी व प्रसार पहाता प्रत्येकाने सजग राहून या पदार्थाची विक्री व प्रसार व प्रचार थांबविला पाहिजे व जे याच्या विळख्यात आहेत त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी व्यसनमुक्...

25 जून -भारताचा पहिला क्रिकेट विश्वचषक विजय-1983 विशेष

25 जून -भारताचा पहिला क्रिकेट विश्वचषक विजय-1983 विशेष  लॉर्ड माउंटबॅटन यांचा जन्म. 25 जून 1900 अल्पपरिचय      लॉर्ड लुई माउंटबॅटन तथा लुई फ्रान्सिस अॅल्बर्ट व्हिक्टर निकोलस ऑफ बॅटनबर्ग  हे भारताचे शेवटचे व्हाइसरॉय व स्वतंत्र भारताचे पहिले गर्व्हनर जनरल होते. जन्म 25 जून 1900 विंडसर, इंग्लंड, युनायटेड किंग्डम मृत्यू 27 ऑगस्ट 1979 कौंटी स्लिगो, रिपब्लिक ऑफ आर्यलँड शिक्षण रॉयल नेव्ही कॉलेज ऑझबर्न कार्य ब्रिटीश नौदलात संदेशवहन व दूरसंदेश क्षेत्रात कार्य पहिल्या महायुध्दात कॅडेट म्हणून नौदलात कार्य दुसऱ्या महायुध्दात केली जहाजाचे कॅप्टन चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून पंतप्रधान चर्चिल यांच्याव्दारे नेमणूक-1941 ब्रह्मदेश,सिंगापूर येथील दोस्त राष्ट्रांच्या दुसऱ्या महायुध्दातील विजयात मुख्य कामगिरी भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कार्यकाळ- 21 फेब्रुवारी 1947 ते 15 ऑगस्ट 1947 भारताचे पहिले गर्व्हनर जनरल कार्यकाळ-15 ऑगस्ट 1947 ते 21 जून 1948 लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्यसाठी लॉर्ड वेव्हेल व राजाजी योजना अयशस्वी ठरल्यानंतर भारतातील प्रत्येक प्रमुख राजकीय नेत्याशी चर्चा करून...

24 जून 2021-24 June

  24 जू न 2021-24 June रँडचा वध करणारे क्रांतीकारी दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म. 24 जून 1869 अल्पपरिचय दामोदर हरी चाफेकर हे प्रसिध्द क्रांतीकारी होते. पुण्याजवळील पिंपरी चिंचवड येथे हरीपंत चाफेकर यांच्या जेष्ठ पुत्राच्या रूपात त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांना आदर्श मानणाऱ्या चाफेकर बंधूंना क्रांतीकार्याची आवड होती.   रँड या प्लेग निर्मुलनासाठी नेमण्यात आलेल्या जुलमी अधिकाऱ्याच्या वधाबद्दल त्यांना तसेच त्यांचे बंधू वासुदेव,बाळकृष्ण यांना इंग्रज सरकारने 18 एप्रिल 1898 रोजी फाशीची शिक्षा सुनावली. दामोदर चाफेकर व चाफेकर बंधूंनी केलेल्या कार्याबद्दल अधिक जाणून घेण्यसाठी येथे भेट द्या. गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म. 24 जून 1897 अल्पपरिचय पंडित ओंकारनाथ ठाकूर हे संगीत गुरू व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक होते. जन्म 24 जून 1897 जहाज, बडोदा, ब्रिटीश भारत सध्या जि. आनंद, गुजरात, भारत मृत्यू 29 डिसेंबर 1967 बॉम्बे, महाराष्ट्र, भारत शिक्षण पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याकडून संगीतशिक्षण घेतले. ...