पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

31 मे - जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन विशेष

इमेज
 31 मे - जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन विशेष WorldNoTobaccoDay-31|May जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन. 31 मे 2021      आज 31 मे रोजी दरवर्षी जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन साजरा करण्यात येतो. 1987 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी तंबाखूसेवन विरोधी दिन साजरा केला. 1988 साली जागतिक आरोग्य संघटनेच्या एका ठरावानुसार 31 मे हा जागतिक तंबाखूसेवनविरोधी दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली. तंबाखूसेवन विरोधी दिवसाचा उद्देश तंबाखू सेवनामुळे होणारे आजार व त्याचा प्रसार प्रचार कमी करणे हा आहे. सध्या जगात सुमारे 70 लाखाहून अधिक मृत्यूंचे कारण तंबाखूसेवन आहे. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या घातक आजारांमध्ये कर्करोग,यकृताचे विविध आजार,फफ्फुसाचे आजार, पक्षाघात आशा अनेक आजारांचा समावेश होतो. भारतात साधरणत: 10 लाख लाख‍ लोकांचा तंबाखूसेवनामुळे मृत्यू होत असल्याचे निर्दशनास आलेले आहे. याच समस्येवर मात करण्यासाठी भारतात राष्ट्रीय तंबाखू निर्मुलन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असून केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगाने याचे आयोजन करण्यात येते यामध्ये जनजागृती व्यसनमुक्ती शिबीरे...

30 मे - May 30-Goa State Day-गोवा राज्य दिन

  30 मे - May 30-Goa State Day-गोवा राज्य दिन  फ्रेंच तत्वज्ञ व्हॉल्टेअर यांचे निधन. 30 मे 1778 अल्पपरिचय व्हॉल्टेअर हे प्रसिध्द फ्रेंच तत्वज्ञ होते. लेखक व कवीही असणारे व्हॉल्टेअर हे फ्रेंच लोकांच्या असंतोषाचे शब्दात रूपांतर करणारे साहित्यिक म्हणून ओळखले जातात. व्हॉल्टेअर यांनी आपल्या लेखणीतून राजकीय क्षेत्रातील हुकुमशाही, धार्मिक क्षेत्रातील धर्मगुरूंची जनतेवरील पकड व त्यामुळे जनतेची होणारी कुचंबणा यांवर असूड ओढले. व्हॉल्टेअर यांच्या याच लेखनकार्यामुळे फ्रेंच लोकांना आपल्या हक्कांची काही प्रमाणात जाणीव होऊ लागली जी पुढे जाऊन फ्रेंच क्रांतीत परावर्तीत झालेली आपल्याला दिसते. व्हाल्टेअर यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या. इंग्लीश क्रिकेटपटू बॉब विलिस यांचा जन्म. 30 मे 1949 अल्पपरिचय रॉबर्ट जॉर्ज डायलन विलिस तथा बॉब विलिस हे प्रसिध्द इंग्लीश क्रिकेटपटू व वेगवान गोलंदाज होते. जन्म 30 म े 1949 सुंदरलँड को- डरहॅम, इंग्लंड मृत्यू 04 डिसेंबर 2019 इंग्लंड कार्य प्रसिध्द इंग्लीश क्रिकेटपटू -वेगवान गोलंदाज क्रिेकेट कारर्किर्द इंग्लंडसाठी अंतरराष्ट्रीय क...

29 मेे 2021- ‍जागतिक पचन स्वाथ्य दिवस विशेष

  29 मेे  2021- ‍जागतिक पचन स्वाथ्य दिवस विशेष जागतिक पचन स्वास्थ्य दिवस- 29 मेे   2021      जागतिक पचन स्वाथ्य दिवस तथा वर्ल्ड डायजेस्टिव्ह हेल्थ डे हा दरवर्षी 29 मे ला साजरा केला जातो. उत्तम आरोग्य ही मानवी जीवनाची गरज आहे. आरोग्य म्हणजेच नुसती शारिरिक तंदरूस्ती नाही तर मानसिक तंदरूस्ती ही तितकीच गरजेची आहे. आरोग्यासाठी गरजेचे असते ते म्हणजे ग्रहण केलेल्या अन्नाचे योग्य पचन होणे. जवळपास 90% अजारांचे मूळ कारण हे अनियमित पचन हेच असते. हाच विचार घेऊन जागतिक स्तरावर पचनक्रियेसंबंधी जनजागृती करण्यासाठी या दिवसाची निर्मिती करण्यात आली आहे. जीवनशैलीतील अमूलाग्र झालेले बदल, खाण्याच्या अनियमित वेळा यामुळे पचनक्रिया बिघडते हीच पचनक्रिया व्यवस्थित राहिली तर अनेक अजारांचे निर्मुलन करता येते म्हणूनच पचनक्रिया चांगली असणे महत्वाचे असते. निरोगी आहार,चांगली जीवनशैली, नियमित व्यायाम, पाणी यांमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. किराणा घराण्याच्या प्रसिध्द शास्त्रीय गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म. 29 मे 1905 अल्पपरिचय      हिराबाई बडोदेकर या भारत...

दिनविशेष- मे 28

  दिनविशेष- मे 28 थोर स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यवीर   विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. मे 28 1883 अल्पपरिचय                      स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे प्रसिध्द स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक होते. अभिनव भारत सारखी क्रांतीकारी संघटना स्थापून तरूणांच्या मनात क्रांतीचे बीजरोपण करण्यासाठी 1857 चे स्वातंत्र्यसमर लिहिणारे दृष्टे क्रांतीकारी,अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगतानाही हजारो राजकीय कैद्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. सावरकरांविषयी अधिक वाचण्यासाठी येथे भेट द्या. प्रसिध्द उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म.  मे   28 1903 अल्पपरिचय शंतनुराव लक्ष्मणराव   किर्लोस्कर हे प्रसिध्द उद्योगपती व किर्लोस्कर उद्योगसमूहाचे प्रमुख होते. जन्म 28 मे 1903 किर्लोस्करवाडी, औंध संस्थान, सातारा,ब्रिटीश भारत   सध्या किर्लोस्करवाडी, जि. सांगली, महाराष्ट्र, भारत मृत्यू 24 एप्रिल 1994 पुणे, महाराष्ट्र, भारत ...

May 27 2021-27 मे दिनविशेष

  May 27 2021 -27 मे -  दिनविशेष महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली. 27 मे 1906 महाराष्ट्र साहित्य परिषद      महाराष्ट्र साहित्य परिषद अर्थात मसाप ही महाराष्ट्रातील प्रसिध्द साहित्यसंस्था आहे. मराठी भाषा संवर्धन प्रसार व प्रचार यासाठी कार्य करणारी ही प्रमुख संस्था आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना पुणे येथील चौथ्या ग्रंथकार संमेलनात 27 मे 1906 रोजी करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटकसंस्था आहे. मुंबई, विदर्भ तसेच मराठवाडा वगळून उर्वरीत महाराष्ट्र हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुख्यालय टिळक रोड पुणे येथे असून परिषदेच्या इमारतीत माधवराव पटवर्धन सभागृह,ग्रंथालय व कै. वा.गो. आपटे संदर्भ ग्रंथालय आहे. ग्रामीण साहित्यकार,स्थानिक कवी,लेखकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे अनेक साहित्य संमेलने आयोजित केली जातात. महाराष्ट्र साहित्य पत्रिका हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असून ते अंतरराष्ट्रीय मानांकित आहे. महाराष्ट्र साहित्य...

26 मे 2021-26 मे दिनविशेष

  26 मे 2021-26 मे दिनविशेष प्रसिध्द मराठी साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा जन्म. 26 मे 1885 अल्पपरिचय      श्री.  राम गणेश गडकरी हे मराठी लेखक,नाटककार,कवी होते. विनोदी अंगाने लेखन करणारे गडकरी गोविंदग्रज व बाळकराम नावाने लेखन करीत असत. एकच प्याला,पुण्यप्रभाव अशी प्रचंड यशस्वी सुप्रसिध्द नाटके त्यांनी लिहिली आहेत. राम गणेश गडकरी यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे भेट द्या . भारतीय कृषी वैज्ञानिक बेंजमिन पिअरी पाल यांचा जन्म. 26 मे 1906 अल्पपरिचय      डॉ. बेंजमिन पिअरी पाल हे प्रसिध्द भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ,कृषी वैज्ञानिक व संशोधक होते. तांबेरा रोगमुक्त अनेक गव्हाच्या जाती त्यांनी विकसित केल्या. जन्म 26 मे 1906 मुखंडपूर, पंजाब, ब्रिटीश भारत मृत्यू 14 सप्टेंबर 1989 शिक्षण रंगून विद्यापीठातून बॅचलर ऑफ सायन्स व मास्टर इन सायन्स पदवी केंब्रीज विद्यापीठ, इंग्लंड येथून पीएचडी कार्य राइस रिसर्च ऑफिसर म्हणून बर्मा-आताचा म्यानमार येथे कार्य वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून बिहारमधील पुसा येथे कार्य कृषी संशोधक म्हणून त्यांनी इ...

25 मे 2021- May 25

  25 मे   2021 - May 25 स्वातंत्र्य लढ्यातील प्रसिध्द कार्यकर्ते, महाराष्ट्राचे माजी मंत्री, विधानसभेचे माजी सभापती बाळासाहेब भारदे यांचा जन्म. 25 मे 1914 अल्पपरिचय बाळासाहेब भारदे तथा त्र्यंबक शिवराम भारदे हे प्रसिध्द राजकारणी,समाजकारणी व सामाजिक कार्यकर्ते होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणारे भारदे हे महाराष्ट्राचे माजी मंत्री व विधासभेचे माजी सभापती देखील होते. जन्म 25 मे 1914 शेवगाव,अहमदनगर, ब्रिटीश भारत मृत्यू 22 नोव्हेंबर 2006 पुणे,महाराष्ट्र, भारत कार्य महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बाळासाहेबांनी भाग घेतला व राष्ट्रीय काँग्रेसने आयोजित केलेल्या अनेक अंदोलनात सहभाग घेतला. 'संघशक्ती' नावाचे वार्तापत्र अहमदनगर काँग्रेसने सुरू केले होते त्याचे संपादकपद भारदे यांनी भूषविले व आपले विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे महत्वाचे कार्य केले. संघशक्तीच्या माध्यमातून नगर जिल्हा मराठी पत्रकार संघ ही संस्था त्यांनी स्थापिली. नगर येथे त्यांनी मराठी पत्रकार परिषदेचे अकारावे अधिवेशन आयोजित केले. महाराष्ट्राचे पहिले सहकारमंत्...