पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

30 एप्रिल 2021- April 30

  30 एप्रिल 2021 - April 30 जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. 30 एप्रिल 1789      जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. आजच्याच दिवशी म्हणजेच 30 एप्रिल 1789 ला त्यांनी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याबद्दल अधिक माहितीकरता येथे भेट द्या. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्म. 30 एप्रिल 1870 अल्पपरिचय धुंडिराज गोविंद फाळके तथा दादासाहेब फाळके हे निर्माते,लेखक, दिग्दर्शक,छायाचित्रकार होते. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. दादासाहेब फाळके यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे भेट द्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म. 30 एप्रिल 1909 अल्पपरिचय माणिक बंडोजी इंगळे तथा तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत व प्रवचनकार, किर्तनकार होते. अंधश्रध्दा निर्मुलन, जातीभेद निर्मुलन, राष्ट्रीय एकात्मता, सामाजसुधारणा यामध्ये तुकडोजी महाराजांनी भरीव असे कार्य केले,   भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले त्यांच्या याच प्रयत्...

29 एप्रिल 2021- अंतरराष्ट्रीय नृत्यदिन विशेष

  29 एप्रिल 2021 - अंतरराष्ट्रीय नृत्यदिन विशेष अंतरराष्ट्रीय नृत्यदिन 29 एप्रिल 2021      अंतरराष्ट्रीय नृत्यदिन हा दरवर्षी 29 एप्रिलला साजरा करण्यात येतो. युनेस्कोच्या संबंधित असलेली कौन्सिल ऑफ इंटरनॅशनल डान्स या   पॅरिस येथील संस्थेने 1982 पासून आंतरराष्ट्रीय नृत्यदिनाची सुरवात केली. लोकप्रिय फ्रेंच बॅले नर्तक जॉन जॉर्ज नोवेरे यांचा जन्मदिवस 29 एप्रिल 1927. या महान फ्रेंच नर्तकाच्या जन्मदिनाची निवड अंतरराष्ट्रीय नृत्यदिनासाठी करण्यात आली. अंतरराष्ट्रीय नृत्यदिनाचा मुख्य उद्देश जगभरात नृत्यकलेला प्रतिष्ठा मिळवून देणे, नृत्याच्या माध्यमातून विश्च एकरूप करण्यासाठी प्रयत्न करणे, सामाजिक भान जपत नृत्यकलेला व कलाकारांना मानसन्मान मिळवून देणे हे देखील हा दिवस साजरा करण्यामागचे महत्वाचे कारण आहे. भारतातही अनेक नृत्यसंस्थांव्दारे हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो. राजा रविवर्मा यांचा जन्म. 29 एप्रिल 1848 अल्पपरिचय राजा रविवर्मा हे प्रसिध्द भारतीय चित्रकार होते. हिंदू देवदेवतांची त्यांनी काढलेली चित्रे प्रमाण मानली जातात. वास्तववादी चित्रकला ही त...

28 एप्रिल 2021- April 28

  28 एप्रिल 2021 -  April  28 थोरले बाजीराव पेशवे यांचे निधन. 28 एप्रिल 1740 अल्पपरिचय      थोरले बाजीराव पेशवे तथा श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट हे मराठा साम्राज्याचे सर्वांत पराक्रमी पेशवे व प्रधान होते. थोरले बाजीराव पेशव्यांकडे पेशवेपद हे अवघ्या वीसाव्या वर्षी आले पण त्यानंतर त्यांनी जो वीस वर्षात पराक्रम गाजवला त्याने मराठा साम्राज्याचा इतिहास बदलून गेला. कारण उत्तर भारतात मराठा साम्राज्याची पाळेमुळे रोवण्याचे कार्य या पेशव्याने करून दाखविले. जन्म 18 ऑगस्ट 1700 श्रीवर्धन, मराठा साम्राज्य मृत्यू 28 एप्रिल 1740 रावेरखेडी, मराठा साम्राज्य कार्य अत्यंत पराक्रमी, धोरणी व धाडसी असे व्यक्तीमत्व असणारे थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्यातील पराक्रमी योध्द्यांपैकी एक नाव. उण्यापुऱ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात बाजीरावांनी पराक्रमाची शर्थ केली व मराठा सम्राज्याचा वारू चोहिकडे पसरवला. थोरल्या बाजीरावांनी केलेल्या महत्वाच्या लढाया माळवा-1723 धार-1724 औरंगाबाद-1724 पालखेड-1728 अहमदाबाद-1731 उदयपूर-1736 फिरोजाबाद-1737 दिल्ली...

27 एप्रिल 2021-27 April

  27 ए प्रिल 2021 -27 April पुण्याहून मुंबईला तारयंत्राव्दारे पहिला संदेश पाठविला गेला. 27 एप्रिल 1854     तारयंत्रणेची भारतातील सुरूवात कलकत्ता ते डायमंड हार्बर या दरम्यान 05 नोव्हेंबर 1850 रोजी झाली. पहिला तार संदेश कलकत्याहून डायमंड हार्बर येथे पाठविण्यात आला. 1854 मध्ये जेव्हा सर्वसामान्यांना तारयंत्रणा सेवा सुरू करण्यात आली तेव्हा  आजच्याच दिवशी म्हणजेच  27 एप्रिल 1854 ला पुण्याहून मुंबईला तारयंत्रणेव्दारे पहिला संदेश पाठविला गेला. आग्रा हे तारयंत्रणेचे मोठे केंद्र होते. ब्रिटीशांनी तारयंत्रणेचा 1857 चे स्वातंत्र्ययुध्द मोडीत काढण्यासाठी मोठ्या खुबीने वापर केला. 1902 पर्यंत भाराततील तारयंत्रणा ही केबलव्दारेच म्हणजेच तारेव्दारेच चालविली जात होती नंतर त्याचे बिनतारी संदेशयंत्रणेत रूपांतर करण्यात आले. ॲलेक्झांडर ग्रॅहम बेलने टेलिफोनचा शोध लावल्यावरसुध्दा तारयंत्रणा आपले अस्तित्व टिकवून होती. भारतात अगदी अलीकडे म्हणजेच 160 वर्षाहून अधिक काळ सेवा बजाविल्यानंतर 15 जुलै 2013 रोजी तारयंत्रणा बंद करण्यात आली. 160 वर्षाहून अधिक काळ तार ही सर्वांत वेगवान सं...

26 एप्रिल 2021- एकत्रीकरण दिवस-टांझानिया

  26 ए प्रिल 2021- एकत्रीकरण दिवस-टांझानिया रशियातील मॉस्को विद्यापीठाची स्थापना. 26 एप्रिल 1755 मॉस्को विद्यापीठ      मॉस्को विद्यापीठाची स्थापना 26 एप्रिल 1755 साली करण्यात आली. मॉस्को विद्यापीठ हे मॉस्को मिखाईल व्हस्यील्येव्ह्यिच लमनॉसॉव्ह स्टेट युनिव्हर्सिटी या नावाने देखील ओळखले जाते. प्रख्यात रशियन रसायनतज्ञ मि. व्ह. लमनॉसॉव्ह हे या विद्यापीठाचे संस्थापक व प्रसिध्द तत्वज्ञ होते, त्यांचेच नाव   या विद्यापीठास दिलेले आहे. सुरूवातीला विद्यापीठात तत्वज्ञान, कायदा व वैद्यकशास्त्र हे तीनच विभाग होते नंतर त्यात गणित,भाषाविज्ञान,मानसशास्त्र,भूगोल,अर्थशास्त्र,वृत्तपत्रविद्या,अध्यापक प्रशिक्षण, इतिहास इत्यादी विषयांचा अंतर्भाव करण्यात आला. विद्यापीठात सुमारे तीसहून अधिक भाषांचे शिक्षण दिले जाते त्यात संस्कृत,हिंदी, पंजाबी अशा भारतीय भाषांचाही समावेश आहे.सुरूवातीला दहा प्राध्यापक व तीस विद्यार्थ्यांपासून सुरू झालेले विद्यापीठाचे कामकाज आज खूपच विस्तारलेले आहे. सप्टेंबर 1812 मधील आगीत विद्यापीठाची प्रचंड हानी झाली परंतू लवकरच त्याचे पुर्निनिर्माण करण्यात आले व व...

25 एप्रिल 2021-ऍन्झाक दिन विशेष-Anzac Day

  25 एप्रिल 2021-ऍन्झाक दिन विशेष-Anzac Day ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये ऍन्झाक दिन. 25 एप्रिल 2021 ऍन्झाक दिन      ऍन्झाक दिन हा ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये राष्ट्रीय दिन आहे. हा दिन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये जे युध्दात व युध्दजन्य परिस्थितीमध्ये मृत्यू पावले त्यांच्या सृतीप्रत्यर्थ साजरा केला जातो. या दिवसाची मूळ संकल्पना पहिल्या महायुध्दातील ऑस्ट्रेलियन अँड न्यूझीलंड आर्मी- ऍन्झाक ज्यांनी गलीपोलीच्या युध्दात सहभाग घेतला व त्यामध्ये वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रत्यर्थ केली आहे. दरवर्षी 25 एप्रिलला हा दिवस साजरा करून त्यांना श्रध्दांजली दिली जाते. हा दिवस ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडबरोबरच ख्रिसमस आइसलँड,कोकोज आइसलॅड,कुक आइसलँड,नॉर्टफोल्क आइसलँड,न्यूई,टोंगा, टोकेलाऊ येथेही साजरा केला जातो. गलीपोलीच्या   युध्दाचे उद्दिष्ट ऑटोमन साम्राज्याला युध्दातून माघार घ्यायला लावणे व कॉन्सॅनिटोपल ही ऑटोमन तुर्कांची राजधानी काबीज करणे हे होते. 25 एप्रिल 1915 रोजी हे युध्द सुरू झाले. ऑस्ट्रेलियन व न्यूझीलंडची एकत्रित ऍन्झाक फौज गलीपोली येथे तुर्कांबरोबर युध्दास तयार झ...