31 डिसेंबर 2020-31-12-2020
31 डिसेंबर 2020-31-12-2020 शास्त्रीय गायक पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. 31-12-1910 अल्पपरिचय पंडित मल्लिकार्जुन मन्सुर हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते. जयपूर-अत्रौली घराण्याचे ते जेष्ठ गायक होते.ते नीळकंठबुवा आलुरमठ यांचे शिष्य होते. जन्म 31-12-1910 मन्सुर,धारवाड,ब्रिटीश भारत मृत्यू 12-09-1992 धारवाड,कर्नाटक,भारत शिक्षण पंडीतजींचे कर्नाटक गायकीचे शिक्षण अप्पय्या स्वामींकडे झाले. तसेच हिंदुस्थानी शास्त्रीय गायकीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक नीळकंठबुवा आलुरमठ यांच्याकडे झाले तर उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेबांचे सुपूत्र मंजी खान व भूर्जी खान या त्यांच्या गुरूंचा त्यांच्या गायकीवर प्रभाव राहिला. कार्य हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक प्रसिध्द गायक मन्सुर यांचे शुध्द नट,असा जोगिया,हेमनट,लच्छसख खट,शिवमत,भैरवी,बिहारी,संपूर्ण मालकंस,लाजवंती,बहादुरी तोडी व आडंबरी केदार अशा अनेक अप्रचलित रागांवर प्रभुत्व होते. पंडीत मन्सुर यांनी नन्न रसयात्रे या नावाने आत्मचरित्र लिहिले.या मूळच्या कन्नड ...